लेखक : कोणी का असेना.
स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय
पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे)
पिता ( श्री. फा.र. चतापलेले)
पुत्र ( संदर्भास)
इतर सोयीनुसार
पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत.
( पडदा वर जातो. सरकारी बाबू कार्यसिद्धी करताहेतसे दाखवून समयप्रलाप करीत आहेत. तेवढ्यातच धाडकन दार उघडून श्री. फा.र. चतापलेले तावातावात आत शिरतात.)
फा.र.च. : अरे, काय चाललंय काय ह्या जगात? काही न्याय-बीय जिवंत आहे का नाही? किती ते सहन करायचं आम्ही?
स. बाबू : अहो, पण झालंय काय ते तरी सांगाल की नाही?
फा.र.च. : काय झालंय? काय झालंय? अहो, अन्याय झालाय अन्याय.. माझ्या लाडक्या पुत्रावर, नाजूकराज सुकुमारवर,त्या गोजिऱ्या इशान्य-भारतसुपुत्रावर घोर अन्याय होतोय त्या भारतभुमीत.. तरी मी त्याला सांगत होतो..
स.बाबू : अहो, पण काय झालंय ते स्पष्टपणे वदाल का?
फा.र.च. : ठिक आहे. सांगतो. आता अन्यायाला वाचा फोडायची म्हणजे भावनांच्या वारुंचे वेग आवरायलाच हवेत मला.. सांगतो.
माझ्या मुलाला दक्षिण भारतातील एका प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार. किती आनंदात होतो आम्ही सगळे ! पुत्रवियोगाचे दु:ख आणि मनातील अनेक किंतु दुर सारुन आम्ही त्यास भारतात धाडले. पण आता, पण आता त्यास...
स. बाबू : आता काय?
फा.र.च. : अहो, आता त्याला त्रास देताहेत हो त्या महाविद्यालयातील लोक.. काय तर म्हणे, तो बारावीत भौतिकशास्त्रात अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यास अभियांत्रिकी शिकता येणार नाही त्यांच्या राज्याच्या नियमानुसार. अरे, काय बोलताहेत हे?
स. बाबू (अचंब्याने) : अहो, काय बोलताय तुम्ही? बारावीत भौतिकशास्त्रात अनुत्तीर्ण झालाय तो, तरीही Engineering करतोय?
फा.र.च. (तडफेने) : तर काय झालं? झाला अनुत्तीर्ण भौतिकशास्त्रात, तर काय? अहो, गेले ते दिवस तुमचे PCM चे मार्क्स बघण्याचे.. केंद्रीय शिक्षण बोर्डानेच उत्तीर्ण केलाय त्याला, कारण की बाकीच्या विषयातले गुण मिळून Passing Percentage च्या वर आहेत त्याला..
स. बाबू ( कळवळून स्वगत) : हा हंत हंत ! अरे, जेव्हा नुस्ते तीन मार्क कमी पडले एका विषयात ऑक्टोबरची वारी करवलीस मला, तेव्हा कुठे रे गेला होता बोर्डा तुझा धर्म !?
फा.र.च.: तर आता तुम्ही लवकरात लवकर ह्या समस्येचे निराकरण करा..
स. बाबू : अहो, पण जर त्याला बारावीत भौतिकशास्त्रात उत्तीर्णही होता येत नसेल, तर तो Engineering..
फा.र.च. : (मधेच त्याला कापत) ते तुम्ही काही शिकवू नका.. त्याला बोर्डाने उत्तीर्ण केलाय, आणि मग त्याला इशान्य-भारतपुत्र असल्याने जागादेखील मिळालीय त्या प्रख्यात महाविद्यालयात. त्याच्यावर आता कुणीही कसलीही सक्ती करु शकत नाही..
(रुद्ध कंठाने) अहो, किती त्रास देताहेत ते माझ्या गोजिऱ्या पुत्रास! त्याला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पाचारण केले त्यांच्या कक्षात. त्यास त्याच्या अपयशाची आठवण करुन दिली. किती यातना झाल्या असतील त्याच्या कोमल, सुकुमार मनास? आणि कोण म्हणतो तो अनुत्तीर्ण झालाय म्हणून? त्याला बोर्डाने स्वत:हूनच उत्तीर्ण केलंय ना! मग?
स.बाबू : पण मी काय म्हणतो...
फा.र.च. : काही म्हणू नका.. ही बघा, मी तक्रार आणलीय माझ्या पुत्रावर तो इशान्य-भारतीय असल्याने पक्षपातीपणाने अन्याय होत असल्याची. जर त्याला कोणी काही बोललं ना, तर न्यायालयात खेचेन एकेकाला..
स. बाबू : अरे, भा$खा&, I mean, भावा, दम खा की जरा वाईच.. च्यायची, मी बघतो वरीष्ठांशी चर्चा करुन काय करता येईल ते..
फा.र.च. : बघाच, आणि करा लवकरात लवकर काहीतरी.. माझा लाडका सुपुत्र, इशान्य-भारतपुत्र वगैरे वगैरे...
(सरकारी बाबू, श्री. ना. पा. सघोडे सगळी घटना सांगायला आपल्या वरीष्ठांकडे जातात.)
वरीष्ठ : आँ ! Failed in physics in 12th and still studying Engineering?
स.बाबू : होय, सर.. (आणि त्यांना पुर्ण कहाणी सांगतो.)
वरीष्ठ : हम्म.. फारच वटवटतोस तू.. मला एक सांग. त्याने सगळ्या प्रक्रिया योग्यपणे पार पाडल्या होत्या का?
स.बाबू : होय, महोदय..
वरीष्ठ : आपल्या कार्यालयाने सगळ्या बाबी आणि प्रक्रिया पाळल्या होत्या का?
स. बाबू : होय, महोदय..
वरीष्ठ : झालं तर मग.. एक खरमरीत निषेध खलिता धाड, कि सदर व्यक्तीने परीक्षेची व प्रवेशाची सगळी प्रक्रिया पाळलेली आहे आणि केंद्रीय प्रक्रियेचे सुयोग्य पालन केल्यावर सदरहू दाक्षिणात्य राज्याचे नियम इशान्य-भारतातून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याला लागू नसावेत.
आता व्यवस्थेतच ही त्रुटी आहे, त्याला तू तरी काय करणार आहेस, बाबा?
स. बाबू : जशी आपली आज्ञा, महोदय..
(मग सरकारी बाबू श्री. ना. पा. सघोडे दुरभाष, यांत्र-पत्र, पत्र इत्यादी सर्व पद्धतीने भौतिकशास्त्रात अनुत्तीर्ण झालेल्या नाजूकराज सुकुमार ह्याच्या अभियांत्रिकी शिकण्याच्या अधिकाराचा पाठपुरावा करतात, व महाविद्यालयाच्या नाकावर टिच्चून इशान्य-भारतपुत्र शिकत राहतात.)
नाट्यपद :
‘असेच आमचे जन्मस्थळ आणि ग्रहमानही असते थोडे
अम्हीही Engineer झालो असतो, वदले नापासघोडे..’
(पडदा पडतो.)
वाचने
7509
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सगळं
सरकार आणि त्याने बनवलेले
खरं आहे. आरक्षणाच्या सीटबाबत
In reply to सरकार आणि त्याने बनवलेले by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम
हे सगळं काय आहे?
लेख छान आहे
In reply to हे सगळं काय आहे? by चिगो
आता मात्र
In reply to हे सगळं काय आहे? by चिगो
ईशान्य भारतीयांना आपण भारतीय
हे वाक्य..
In reply to ईशान्य भारतीयांना आपण भारतीय by यशोधरा
विषय ईशान्य भारतीय लोकांना
In reply to हे वाक्य.. by चिगो
मला बोललं नाही..
In reply to विषय ईशान्य भारतीय लोकांना by यशोधरा
ओके :)
In reply to मला बोललं नाही.. by चिगो
ब-याच वर्षापूर्वीचा अनुभव आहे
ईशान्य भारत - एक वेगळा अनुभव
नाट्य छटा आवडली...
प्राध्यापकांची नावे आवडली
नाही नाही...सरकारी बाबू व
In reply to प्राध्यापकांची नावे आवडली by विनिता००२
नाट्यछटा आवडली.