Skip to main content

(मारझोड)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 14/03/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : धरपकड आणि घोरपड चाळी-फ्लॅटातील घरात नवराबायकोंमधे मारझोड होउन पूर्ण होतेय घरेलू हिंसा मार बसला पण हिंसेचे काय? काही म्हणतात, मारझोड ही तर एक व्यथा कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, अतिव्यक्त गाढवी प्रेमाचे म्हणून सांभाळा रे कधीमधी बेल वाजवून नाही थांबणार मारझोड कारण बेल वाजवणारे येतील आणि जातील पण ठणकत राहील , आठवत राहील मनामनात ... तीच मारझोड ============================ आंबोळी ---------- १४-०३-२००९
लेखनविषय:

वाचने 2194
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, अतिव्यक्त गाढवी प्रेमाचे
लईच फार्मात हाय रे आंबोळी.... --अवलिया

छान आहे . पण ठणकत राहील , आठवत राहील मनामनात ... ......................... सुंदर !

" स्त्रीने पुरुषांना मारहाण केली तर त्यांनी काय काय करावे " याविषयीची जालावर नुकतीच चर्चा वाचली होती ती आठवली... मारझोड कोणीही केली तरी वाईटच... प्रोफेसर आंबोळे यांचे घरेलू हिंसेबद्दलचे मौलिक विचार फार आवडले... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रोफेसर आंबोळे यांचे घरेलू हिंसेबद्दलचे मौलिक विचारानुभव फार आवडले...

आंबोळीशेठ उर्फ कंदीलकुमार बरेच दिवसांनी लिव्हलेत. अजुन येउ दे!!

कविता मस्त रे ! पण त्या कंदिलाच्या मरणाचे किस्से येऊ दे यार ! -दिलीप बिरुटे