खराडी ... कुठं रहायचं? कसं रहायचं?
लोकांनो, जरा मदत कराल का. खराडीमधल्या इऑन मध्ये इथून पुढे काम करावे लागणार आहे. त्यासाठी कुटुंबासहित शिफ्ट व्हायचे आहे. तर कोठे राहणे सोयीचे पडेल ते सांगाल का. जमेल तितक्या जवळ राहता यावे असा उद्देश आहे. पण आर्थिक क्शमता मर्यादित आहे. टू बी एच के नसला तरी चालेल. वन बी एच के अथवा अगदी वन आर के असला तरी चालेल पण शक्यतो ऑफिसाच्या जवळ हवाय. वाघोली, केशव नगर, विमान नगर वगैरे एरिया काही लोकांनी सुचवले आहेत. पण मला वाटतं वाघोलीतला बहुतांश भाग दहा बारा किलोमीटर तरी दूर पडेल. विमाननगरचेही तेच. बहुतेक केशव नगर जास्त जवळ आहे. शिवाय सोसायटी फार काही हाय फाय नसली तरी चालेल. (शक्यतो नकोच हाय फाय. भाडे फार पडेल. ) हाय फाय म्हणजे अशी सोसायटी जिच्यात व्यवस्थित चालणारे स्विमिंग पूल, जिम अशा अॅमेनिटीज असतात त्यावाल्या सोसायट्या. शक्यतो साध्यावाल्या हव्या आहेत. इथे कोणाला त्या भूभागाची माहिती व अनुभव आहे का. full furnished घेतल्यास कितपत खर्च येउ शकतो किंवा unfurnished चा किती ह्याचाही अंदाज आल्यास बरे. खरेतर unfurnished असलेलाच बरा. कारण सगळे सामान उपलब्ध आहे. राहत्या घरातूनच तिकडे शिफ्ट करायचे आहे. शिवाय पन्नासेक किमीसुद्धा होणार नाही.
याद्या
4989
प्रतिक्रिया
11
वर्गीकरण
मिसळपाव
इऑन च्या आसपास ज्या इमारती
लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी
थेंक्यू
खराडी/वडगांवशेरी
येस वडगाव शेरि सेफ अँड स्वीट
In reply to खराडी/वडगांवशेरी by तुषार काळभोर
खराडी ,चंदन नगर, वडगांव शेरी ,थिटे वस्ती, साईनाथ नगर
हेचं म्हणतो.
In reply to खराडी ,चंदन नगर, वडगांव शेरी ,थिटे वस्ती, साईनाथ नगर by शुभां म.
मगरपट्टा सीटी ??
Nobroker.com, magicbricks.com
मस्त...
In reply to Nobroker.com, magicbricks.com by सस्नेह
आभार