वर्ष झाले असेल मी पाल बघून. परवा पालीवर माझी नावडती मैत्रिण हा लेख वाचला आणि पालीची खूप आठवण आली -
कसा मी रोज सकाळी उठून अर्ध्या झोपेत धडपडत धडपडत बेसिनपाशी जायचो आणी पालीला बघुन दचकायचो. नंतर आपली रोजची पालच आहे ते बघुन कसा सुखावायचो वगैर वगैरे सगळे आठवून दाटून कंठ आला
एवढी आठवण आली की मग कविता करण्याशिवाय पर्याय नव्हता.
*किळसवाण्या सहित्यप्रकाराची ज्यांना किळस आहे त्यांनी कृपया वाचू नका
महाश्वेता
ओसरला हा संधिप्रकाश,
दिनकरास करकच्च रजनीपाश
झाल्या शुभंकरोत्या,
अन् आटोपली स्तोत्रे
लावल्या खिडक्या
आपटली दारे,
घाबरल्या ताई, माई, अक्का
अन् हादरले बाळूचे पप्पा,
फटीतून घुसले
भिंतीवर बसले,
चिलट म्हणावे का डास?
बघून त्या गट्ट्या बाळूस
पिपासूने बेत बनवला खास
अहा, ते गोबरे गाल
होतील कसे लाल
चावण्यास कडकडून
सर्वसज्ज हा डास
पण...
कडाडल्या वीजा
थरारली धरणी
चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज भिंतीवरून
चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज ट्यूबमागून
शक्ती ही दैवी कोणी
घोर ही रणरागिणी
रोखुन शीत हरितनेत्र
फुलवुनी लिबलिबीत गात्र
अवतरली ही महाश्वेता
पांढरीफट्ट, पांढरीफट्ट
रोवूनि पाय घट्ट
आली एक सुपाल
लांबवून जिव्हा चपळाईने
क्षणार्धातच हा घेतला घास,
पालोदरी विसावला पापी डास
पालोदरी विसावला पापी डास
*
यडपट कसा हा बाळू
मंद म्हणावे का द्वाड
पसरून भोकाड
म्हणतो आईगं, आईगं
आली पाल,
आली पाल
***
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3126
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी खी खी
वा!!
बिच्चारी पाल!
भयानक!!!!!!!!!!!!!!
जबरा
कडाडल्या
खूप
बापरे!!
वा!
असंच म्हणते..
In reply to वा! by विसोबा खेचर
वावावा ....
धमाल !
लोल...तू
महाश्वेता
मस्त
कविता वेगळ्याच विषयाची आहे.
:-)
+१
In reply to :-) by सहज
सर्वांचे