तुळजा भवानी - घाणीतले कमळ
चंद्रपूर हे शहर जसे कोळश्याच्या निखाऱ्यावर आहे तसे तुळजापूर हे शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे आहे !
आणि हा अनुभव मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेत आहे! प्रशासनापेक्षा मला तुळजापूरकरांचे आश्चर्य वाटते , याच घाणीत ते नांदतात, संसार होतात, लेकरं मोठी होतात ! कुणाला काही काही वाटत नाही !
ती जगज्जननी मात्र या साऱ्या कोलाहळापासून शेकडो मैल दूर आहे ! ती यात आहे पण आणि नाही पण ! तिच्या त्या दोन - अडीच क्षणांच्या दर्शनासाठी हे सारे सहन करायचे ! त्यातून आपली ऊर्जा साठवायची ! देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।
यावर्षी एक नवीन प्रकार ! प्रत्येक दर्शनार्थी ला तिकिटाची सक्ती आहे , विनाशुल्क आहे पण अनिवार्य आहे . पण त्यामुळे पूर्वी मंदिरात, केळाच्या साली , कागदाचे कपटे, तेलाच्या रिकाम्या बाटल्या या कचऱ्यामध्ये आता या तिकिटाच्या कपत्यांची भर पडली ! भाविक लोकांचा स्वच्छतेचा सेन्स अफाट आहे
अगदी दर्शनाच्या बारीत देखील लोक पान खाऊन थुंकले आहेत ... केळाच्या साली , चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक च्या पिशव्या, आणि असंख्य कागदाचे कपटे त्या संपूर्ण दर्शन रांगेत पसरले आहेत, गेल्या २ आकटोबर नंतर तिथे झाडू फिरला नसावा !
दर्शनाच्या बारीची ही कथा तर अभिषेकाची वेगळीच ! रात्री पावणेबारा पासून अभिषेकाच्या पाससाठी उभा आहे , अभिषेक पास किती वाजता मिळणार याबाबत वाचमन आणि अन्य स्टॅफ यांच्यात प्रचंड मतमतांतरे आहेत, कोण म्हणतो १ वाजता , कोण म्हणतो ३ वाजता ! अभिषेक पहाटे ५ पासून सुरू होणार !
प्रशासनाने कोठेही कसलाही फलक लावलेला नाही , माहिती सांगण्यासाठी कोणीही अधिकारी व्यक्ती उपलब्ध नाही , आपल्या क्षेत्र पुजाऱ्याने जी माहिती दिली , त्याआधारे आम्ही रांगेत उभे आहोत !
आम्हाला आता तिकिट मिळाले , रात्री १ वाजून १० मिनिटानंतर ! आम्हां चौघांचे फोटो काढले आणि दोन पास दिले ! सिस्टीम चांगलीय पण रात्री १ वाजता ज्यांना अभिषेकाला यायचे आहे त्या सर्वांनी तिथे उपस्थित रहायचे ??? काय हा अन्याय ! ,आम्ही दिवसभर पुण्यातून गाडी हाणत पोचलोय , थकलोय, आता रात्री विश्रांती होणार नाही , उद्या सकाळी मंदिरात जायचे आहे अभिषेकासाठी ! आमचे जाऊदे, आबालवृद्ध या अभिषेकाच्या रांगेत आहेत .. त्या सगळ्यांची हीच स्थिती आहे ...मुकी बिचारी कुणीही हाका !
अभिषेक फक्त १००० होणार , आत्ताच रांगेत तितके लोक आहेत म्हणजे यानंतर येणाऱ्या कोणालाही आज पहाटे अभिषेक करता येणार नाही !
असले तुघलकी निर्णय कोण घेते ? पूर्वी पुजारी मंडळींचा खूप उपद्रव असे , अतिरिक्त पैसे घेऊन ते लोकांना अभिषेक रांगेत लोकांना घुसवत असत ! त्याला चाप बसावा म्हणून कदाचित हा उपाय योजला असावा ! पण हे तर व्याधीपेक्षा औषध जालीम झाले !
मला शंका आहे की मंदिर व्यवस्थापनाचा पुरेसा अभ्यास केलेले आणि अनुभव असणारे लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात का?
मंदिरातील आणि आसपासच्या गल्ल्यांच्या स्वच्छतेचे दायित्व कोणाचे आहे ?
या सगळ्याची तक्रार कोणाकडे करावी ?
याद्या
23916
प्रतिक्रिया
67
वर्गीकरण
मिसळपाव
तुळजापूर
सहमत
In reply to तुळजापूर by तुषार काळभोर
अरेच्या
In reply to सहमत by सविता००१
धन्यवाद
In reply to सहमत by सविता००१
अशी सरकारी पोच आली आहे
In reply to धन्यवाद by विटेकर
तुळजापूर फक्त
In reply to तुळजापूर by तुषार काळभोर
अगदी ज्वलंत प्रश्न
माझे (मर्यादित) निरीक्षण असे
सवयी
In reply to माझे (मर्यादित) निरीक्षण असे by यशोधरा
एकूण भयानक प्रकार वाटतो आहे.
बळीची प्रथा
In reply to एकूण भयानक प्रकार वाटतो आहे. by कंजूस
हायला.
नका हो, नका असं तोडून बोलू!!
In reply to हायला. by अभ्या..
हो, हो कराच.
In reply to हायला. by अभ्या..
तुम्ही हाडाचे कलाकार असल्याने
In reply to हायला. by अभ्या..
तुमचा उपहास पोचला ! " तुम्हां
In reply to हायला. by अभ्या..
तुम्हां पुण्या-मुंबई कडल्या
In reply to तुमचा उपहास पोचला ! " तुम्हां by विटेकर
तोल
In reply to तुम्हां पुण्या-मुंबई कडल्या by अभ्या..
अवघड आहे
In reply to तुम्हां पुण्या-मुंबई कडल्या by अभ्या..
कारंज्यात नाणं टाकलं की
अभ्याशेठ
तुळजाभवानी देवस्थानाच्या
हम्म
In reply to तुळजाभवानी देवस्थानाच्या by डँबिस००७
किती मस्त
In reply to हम्म by अभ्या..
किती मस्त
In reply to हम्म by अभ्या..
मस्त.
In reply to हम्म by अभ्या..
अभेंद्र शेठ...!!
In reply to हम्म by अभ्या..
खिक्क
In reply to अभेंद्र शेठ...!! by विशुमित
पुन्हा एकदा ..
In reply to हम्म by अभ्या..
अगदीच खरे!
In reply to तुळजाभवानी देवस्थानाच्या by डँबिस००७
https://maps.google.com/?cid
एक उपाय करण्यासारखा आहे.
शेगाव धार्मिक स्थळ कमी आणि
In reply to एक उपाय करण्यासारखा आहे. by खटपट्या
माहिती वाचल्यास लोकांच्या
In reply to शेगाव धार्मिक स्थळ कमी आणि by विशुमित
ओ मोदी भक्त तुम्हाला सापट
In reply to माहिती वाचल्यास लोकांच्या by डँबिस००७
२००८ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्र राज्यात काँग्रेस सरकार होते !!
In reply to माहिती वाचल्यास लोकांच्या by डँबिस००७
महाराजांच्या दर्शनापेक्षा
In reply to शेगाव धार्मिक स्थळ कमी आणि by विशुमित
महाराजांच्या दर्शनापेक्षा लोकांचा आनंद सागर कडेच ओढा जास्त असतो.साफ चूक. एक फरक आहे. शेगाव संस्थान सरकार चालवत नाही. त्यांचे वेगळे मंडळ आहे. स्वयं स्फूर्ती ने बिनपगारी लोक तिथे काम करतात. तिथला पैसा बघून सरकार मागे ते खिशात घालायला बघत होते. तिथल्या लोकांनी ते होऊन दिले नाही.असेल
In reply to महाराजांच्या दर्शनापेक्षा by अभिजित - १
ते उस्फूर्त आहे.
In reply to असेल by नाखु
You are not in traffic. You
वरील प्रतिसादात शेगवचे नाव
जवळपास तसेच असावे. पुढील
In reply to वरील प्रतिसादात शेगवचे नाव by दिगोचि
गावातील गटारे साफ करणें
In reply to जवळपास तसेच असावे. पुढील by विशुमित
काही अंशी मान्य पण गावाला
In reply to गावातील गटारे साफ करणें by अभिजित - १
गावाची स्वच्छता ही कमीत कमी
In reply to काही अंशी मान्य पण गावाला by उगा काहितरीच
भातुकली
आमचे बाबा महाराज म्हणतात....
विटुकाका,
आपल्या कडची बरीच शहरं (ती दोन
अभ्याशेठ
काल लेख वाचताना गोंदवल्याचीच
In reply to अभ्याशेठ by नाखु
श्री क्षेत्र गोंदवले...
In reply to अभ्याशेठ by नाखु
देवी देवळातुन बाहेर येऊ शकत
गावातल्या लोकांनी देवस्थानात
लेख आणि अभिजित यांचे डायलॉक
मिपाकर म्हणजे सुशिक्षित जमात
मिपाकर म्हणजे सुशिक्षित जमात असं मी तरी समजतो !!!!
In reply to मिपाकर म्हणजे सुशिक्षित जमात by ट्रम्प
इयत्ता चौथी शिकलं तरी लिहता
In reply to मिपाकर म्हणजे सुशिक्षित जमात असं मी तरी समजतो !!!! by मुक्त विहारि
मूळ श्रेणी तीन आहेत.
In reply to इयत्ता चौथी शिकलं तरी लिहता by ट्रम्प
१) एखाद्या छोट्या गावात किती
श्री देवी तुळजा भवानीच्या
In reply to १) एखाद्या छोट्या गावात किती by कंजूस
प्रवेश शुल्क नकोच.
In reply to श्री देवी तुळजा भवानीच्या by सुबोध खरे
फारतर पिवळे रेशन कार्ड घेऊन
In reply to प्रवेश शुल्क नकोच. by अभ्या..
फार न पटणारा जालीम उपाय - कुलदैवतच बदलणे.
In reply to १) एखाद्या छोट्या गावात किती by कंजूस
कधी काळी आपल्या कुळातील एक
लाख मोलाची बात !!!
In reply to कधी काळी आपल्या कुळातील एक by कंजूस
सही