मोदी सरकार एक वरदान !!
भारतातले शेतकरी गेले दोन दशक आत्महत्या करत आहेत. वेगवेगळ्या काळातल्या सरकारने ह्या आत्महत्यांची कारण मिंमांसा व मुळ कारण शोधुन त्यावर उपाय करण्याएवजी आत्तापर्यंत सोप्पा मार्गच निवडला व तो म्हणजे शेतकर्यांना काहीतरी पैश्याची मदत करायची. शेतकर्यांच्या मालाला योग्य दर मिळाला नाही तर शेतकर्यांनी काय करायच ? शेतमाल पावसा मुळे वा पावसाच्या आभावामुळे नाश पावला तर शेतकर्याला कोण मदत देणार ?
शेतकर्याला योग्य दर का मिळत नाही ह्याच कारण , पुर्ण बाजार आडत्याच्या, एजंटच्या व्यापार्याच्या हातात ! शेतीमाल उत्पादन करणार्या पेक्षा विकणार्या चेन मध्ये सर्वात जास्त नफा आहे. म्हणजे ५ रु / किलोचा लासल गावचा कांदा आसाम मध्ये पोहोचेपर्यंत २५ रु / किलो होत आहे. लासलगाव ते आसामपर्यंत पोहोचण्यासाठी वहातुकीची साधने सुद्धा महागच आहेत. त्यामुळे भारतात जर विकास करायचा असेल तर योग्य मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देणे हे सुद्धा गरजेचे आहे. जागतीक मानकानुसार वस्तुच्या किमतीच्या जास्तीत जास्त १० ते १२% खर्च हा वस्तुच्या वहातुकीवर झालेला असला पाहीजे. युरोप मध्ये हा दर १० ते १२ % आहे पण चीन मध्ये हा दर ८% पर्यंत खाली आहे. भारतात हाच देशांतंर्गत खर्च १८ ते २० % आहे. ह्यामुळे देशात व विदेशात भारतीय माल महाग होतो. त्यामुळे भारतात महागाई व विदेशात भारतीय मालाला आंतर्देशीय बाजारपेठ मिळत नाही.
वहातुकीत जल मार्गाची वहातुक सर्वात स्वस्त असते. जलमार्गात सर्वात जास्त माल सर्वात स्वस्त दरात वहातुक करता येते. एका बोटीत एकाच वेळेला ४००० ट्न ते २०००० टन माल नेता येतो. ४००० ट्न माल न्यायला अन्यथा ४०० ट्रकची गरज पडते. ४०० ट्रक्सना किती डिझेल लागेल ह्याची कल्पनाच करा. त्यानंतर क्रमांक येतो रेल्वेचा. रेल्वेसुद्धा खुप किफायतशीर होते. भारतात सर्वसाधारण पणे वहातुक ही रस्त्यावरुन ट्र्कने होते. रस्त्यावर केलेली वहातुक ही सर्वात महाग असते. व त्याला जास्त वेळही लागतो. उदा. दररोज ३०० ते ४०० टॅकर दुध हे वेगवेगळ्या जिल्ह्यातुन मुंबईच्या दुध डेअरी मध्ये येत असते. हे ३०० ते ४०० टँकर दुध फक्त १ ते ३ रेल्वे मालगाडीने मुंबईला पोहोचु शकते ते सुद्धा खुप खुप स्वस्तात व जलद.
भारतात ट्रांसपोर्ट विकासासाठी जलमार्ग , रेल्वे मार्ग व रस्ते निर्माण करण्याच आव्हान सरकार समोर होत. जर असे ईंन्फ्रास्ट्रकचर उपलब्ध असेल तरच देशाच्या ईकॉनॉमीला वेग देता येतो. म्हणुनच मोदी सरकारने ईंन्फ्रास्ट्रकचर विकासावर भर दिलेला आहे. त्या नुसार डेडिकेटेड कॉरीडोर ईस्ट कॉरीडोर व वेस्ट कॉरीडोर निर्माण होत आहेत. ह्या कॉरीडोर मध्ये फक्त माल वहातुकीसाठी १०० किमी च्या वेगाने मालगाडी / रेल्वे धावेल. ह्यात रोरो सर्विस सुद्धा असेल .
देशांतर्गत जल मार्ग निर्माण करण्याच काम सुद्धा ह्या सरकार ने केलेले आहे. ह्या कामासाठी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण नावाची संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्यापुर्व देशात बराच माल हा नदीच्या पात्रातुन होडीच्या मार्फत होत असे. आता भारतातल्या वहातुक योग्य नदी नाल्या वॉटर बॉडीची गणना , निरीक्षण पुर्ण झालेल आहे. वहातुकीला सुयोग्य अश्या नदीची खोली वाढवुन त्या नद्या मोठ्या बोटींच्या वहातुकीला योग्य बनवण्याच काम सुरु आहे. ह्या बोटींसाठी योग्य बंदरे बनवण्याच काम सुद्धा सुरु आहे.
१. अलाहाबाद हलदीया कोलकत्ता जल मार्ग सुरु झालेला आहे.
२. भद्रचलम ते पाँडेचेरी हा मार्ग निर्माणाधीन आहे.
३. कासरगोड ते त्रीवेंद्रम हा मार्ग प्रपोज केलेला आहे.
ज्या गतीने ईंन्फ्रास्ट्रकचर भारतात बनत आहे त्या गतीने नविन रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.
इनाम योजना : शेतकर्यांना देशात एक खुली बाजार पेठ मिळवुन द्यायच्या ईराद्याने बनवलेली योजना आहे. ह्या योजने अंतर्गत कोणताही शेतकरी आपला माल ईनाम योजने खाली देशातल्या खुल्या बाजार पेठेत लिलावा द्वारे विकु शकतो. आपल्या मालाची गुणवत्ता तपासुन त्याच प्रमाण पत्र ह्या ईनाम वेब वर टाकाव लागत. त्या मुळे खरेदी करणार्याला मालाची खात्री होते. खरेदी करणारा व शेतकरी आपली पुर्ण माहीती ईनाम वेब साईटला पुरवतो स्व तःला रजिस्टर करतो व सर्व व्यवहार हा बँके एकॉऊट थ्रूच होतो त्यामुळे व्यवहार कायदेशीर ठरतो. कारटेल ग्रुप बनवुन शेतमालाची किंमत खाली उतरवुन शेतकर्यांना लुबाडणार्या व्यापारांना ह्या प्रकारा मुळे आळा बसणार आहे.
ईनाम योजनेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचणे आवश्यक होते व ते अगोदरच साध्य झालेले आहे. ६००० गाव व दुर्गम गाव ऑप्टीक फायबर व मोबाईल डेटाने जोडली गेली आहेत.
ईनाम खाली स्वयं रोजगार संधी :
१. शेतमालाची तपासणी, प्रमाण पत्र देण्या साठी तालुका जागी लॅब बांधणे .
२. शेत मालाची पॅकीग करणे,
३. शेतमाला ला कोल्ड स्टोरेज उभारणे
४. शेतमालाची वहातुक.
५. ईनाम योजनेसाठी शेतकर्याला बेव साक्षर बनवणे, शेतकर्याला बेवसाईटवर मदत करणे
याद्या
7505
प्रतिक्रिया
17
वर्गीकरण
मिसळपाव
डिस्लेमरः वर दिलेले दुध
इनाम योजनेची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद....
जल मार्ग विकास फायदे व
प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते त्याचे काय?
आय्यो... राहूल गांधी _/\_
In reply to प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते त्याचे काय? by कापूसकोन्ड्या
आय्यो... राहूल गांधी _/\_
In reply to प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते त्याचे काय? by कापूसकोन्ड्या
देशांतर्गत जलवाहतूक
प्रत्येकाच्या खात्यात पंधरा
आम्हाला पंधरा लाख मिळालेच पाहिजेत.
दंडवत!
In reply to आम्हाला पंधरा लाख मिळालेच पाहिजेत. by कापूसकोन्ड्या
आपल्याच मोदीमय VR जगात
In reply to आम्हाला पंधरा लाख मिळालेच पाहिजेत. by कापूसकोन्ड्या
" मेक ईन ईंडीया "
<strong>Farmers getting hooked on eNAM to reap benefits</strong>
https://www.business-standard
Modi government has targeted to double farmer's income by 2022.
https://www.businesstoday.in
India's first container vessel on inland waterways: