Skip to main content

इंद्रधनू

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H
इंद्रधनू
रक्तकेशरी सूर्यदिशा मी समजून घे रे कधी मलाही, कसा कळेना तुला आवडे मावळतीचा रंग गुलाबी.. अवखळ हसरा झरा होऊनी बागडते मी तुझ्यासभोती, निळी जांभळी कोसळते मी शोधतोस तू शब्द गुलाबी.. हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून, मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी.. धम्मक पिवळी होऊन येईन, बंध जगाचे तोडून येईन, अंतर सारे मिटवू जाता होईन मी आरक्त गुलाबी.. मृद्ग़ंधासम हळवे नाते, सांभाळाया तुझ्याच हाती. सोपवून मी विश्वासाने मिटता डोळे, स्वप्न गुलाबी.. H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 11929
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छान खूप सुंदर. गुलाबी रंगाच्या दिशेने होणारा प्रवास आवडला.

छान कविता. हि कविता वाचताना स्क्रीन वर इंद्रधनुतले जवळपास सगळेच रंग दृष्टीस पडत होते त्यामुळे जास्त रिलेट करता आली.

_/\_

हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून, मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी..
क्या बात!!