आंबा काजूकतली

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

आंबा काजूकतली

एकदा नेटसर्फिंग करताना 'बिनापाकाची, बिना गॅसची काजूकतली' असे वाचून ती क्लिप उघडली, तर एकदम मस्त रेसिपी मिळाली. त्यात माझे काही बदल केले आणि ही आंबा काजूकतली तयार केली.

साहित्य -
२ वाट्या काजू, पाऊण वाटी मिल्क पावडर, ३ ते ४ टेबलस्पून दूध, अर्धी वाटी साखर, चमचाभर साजूक तूप,
१ लिंबाएवढा आंब्याचा आटवलेला गोळा. आंब्याचा गोळा उपलब्ध नसेल तर नुसती काजूकतलीही करता येईल. तेव्हा साखर पाऊण वाटी लागेल, कारण आंब्याच्या गोळ्यात साखर असते. स्वादासाठी रोझ किवा केवडा इसेन्स चमचाभर.

कृती -
काजूची पूड करताना मिक्सरमधून एकदम फिरवायचे नाही. थांबून, थांबून फिरवायचे, म्हणजे त्यातले तेल सुटत नाही व कोरडी पावडर होते. ही पूड चाळणीतून चाळून घ्या.
साखर मिक्सरमधून फिरवून घ्या व चाळून घ्या. (हो.. पिठीसाखरही चाळून घ्यायची.)
मिल्क पावडर चाळून घ्या.
आंब्याचा गोळा मिक्सरमधून फिरवून तोही चाळून घ्या.
सर्व मिश्रण एका परातीत एकत्र करा आणि एक एक चमचा दूध घालत कालवा. ३-४ चमचे दूध लागते. एका प्लास्टिक शीटला तुपाचा हात लावून तीत हा कालवलेला गोळा ठेवा व मळून घ्या. प्लास्टिक शीटमध्ये तो गोळा ५ मिनिटे तसाच ठेवा.
नंतर ती शीट उघडून गोळा त्यावर ठेवा. वरून दुसरी शीट ठेवा आणि लाटा.
हवे तितके पातळ लाटून झाले की मोठ्या सुरीने वड्या पाडा.
हवा असला तर वरून वर्ख लावता येईल.

.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

सुरेख दिसते आहे काजू-कतली! कातील एकदम!

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 1:55 pm | तुषार काळभोर

चितळेंच्या आंबाबर्फीची आठवण झाली.

सविता००१'s picture

6 Nov 2018 - 6:56 pm | सविता००१

कसल्या क्यूट दिसतायत वड्या..
असा एखाद्याचा मानसिक छळ करणं बरं नाही

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 10:48 pm | मुक्त विहारि

मागच्या आठवड्यात, दिवाळीसाठी म्हणून, शेंगदाणे, काजू आणि मिल्क पावडर वापरून वड्या केल्या होत्या.त्या दिवाळी पुर्वीच संपल्या...

नूतन सावंत's picture

7 Nov 2018 - 10:15 am | नूतन सावंत

मस्त दिसताहेत.इंधनबचठी साधली.

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 12:41 pm | टर्मीनेटर

इंटरेस्टिंग रेसीपी...

जुइ's picture

10 Nov 2018 - 11:15 pm | जुइ

आंबा काजूकतली अगदी नवीन प्रकार नक्कीच करून पाहणार. खूप सुंदर दिसत आहेत या वड्या.

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 2:36 am | पद्मावति

खुप मस्तं. नक्की करुन पाहणार.

फ्रेनी's picture

11 Nov 2018 - 9:49 am | फ्रेनी

तोंपासू