Skip to main content

कटर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 01/11/2018 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
. डेक्कन वर जागा मिळेल तिथे स्कुटर पार्क केली व चालायला सुरवात केली डेक्कन पेट्रोल पंपाजवळ एक जण टोस्ट सॅन्डविच बनवणारा आहे तो कांदा कापत होता चॉपिन बोर्ड वर नाजूक बारीक कापलेल्या चिरलेल्या कांद्याचा ढीग होता त्याच्या हातून सूरी घेत मी ब्लेड च्या थिकनेस चा पाते चिमटीत धरुन अंदाज घेतला खिश्यातुन पैसे काढत विचारणा केली सूरी कुठून विकत घेतली -मला मिळेल का इत्यादी पण तो माहिती देण्यास नाखूष दिसला -"साब वो सूरी बनाने वाला गाव को गयेला है -वापस नाही आने वाला "ठीक आहे" म्हणत मी रुपाली ला आलो चहा घेतला थोडक्यात ब्लेड चे पातळ पाते हे कांदा बारीक कापण्याचे सिक्रेट होते डोक्यात विचार होते --अन क्लिक झाले रुपालीच्या बोळात व्हीनस चे स्टेशनरी दुकान होते तिथून कटर घेतला बोटाच्या चिमटीत पकडून ब्लेड ची थिकनेस चेक केली ती मला हवी तशी होती घरी आल्यावर कटर च्या साहाय्याने कांदा कापला बारीक नाजूक कापला गेला कांदा कापायाला मी हल्ली कटर वापरतो जरूर एकदा ट्राय मारा

वाचने 9804
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कांदा बारीक कापायला हे यंत्र वापरतो. किंमत कमी , वापरायला एकदम सोपे , बारीक कांदा कापण्यासाठी खूपच उपयोगी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वापर झाल्यावर धुऊन ठेवणे पण खूपच सोपे आहे.

In reply to by उगा काहितरीच

लिंक गंडली वाटते Pigeon Handy Vegetable & Fruit Chopper http://dl.flipkart.com/dl/pigeon-handy-vegetable-fruit-chopper/p/itmemr…

In reply to by उगा काहितरीच

त्यापेक्षा कटर उत्तम.हातासरशी धूउन होतो.

In reply to by मुक्त विहारि

हं मान्य करतो की , चाकू धुण्यासाठी जितका वेळ आणि श्रम लागतात त्याच्या फार फार तर २ पट वेळ लागेल पण तेही फार नव्हे. हे ही हातासरशी धुऊन ठेवता येतं . त्याबदल्यात फायदे पण खूप मिळतात . डोळ्यातून पाणी न येणे वगैरे .

In reply to by उगा काहितरीच

Pigeon Handy Vegetable & Fruit Chopper हे यंत्र मीही वापरते. कांदा छान बारीक चिरला जातो. पण मध्यम किंवा किंचित जाड हवा असेल तर काही उपयोग नाही. धुवायला अवघड नाही, पण त्यातून चिकटलेला कांदा बाहेर काढताना फार वैताग येतो आणि वेळ लागतो.

In reply to by सस्नेह

कांदा कापल्यानंतर मग मी नंतर टोमॅटो काढतो. आहे नाही तोही कांदा फोडणीत टाकल्या जातो. प्लस टोमॅटो चाकूने कापताना जो भाग (पाणी) वाया जातो तेही वाया जात नाही. मला भाजीत वगैरे मोठा मोठा कांदा अजिबात आवडत नाही व अंडा भुर्जी वाल्यांसारखा सफाईदार पणे कापताही येत नाही म्हणून माझ्यासाठी तरी हे कटर खूपच उपयोगी आहे.