दिवाळी किल्ला: दगड, माती न वापरता !!! (पुनः प्रकाशित)
नमस्कार मंडळी,
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचं जस फराळ, आकाशकंदील, फटाके, नवीन कपडे , गुलाबी थंडी, उटणं यांच्याबरोबर अतूट नातं आहे तसंच नातं आणखीन एक गोष्टीबरोबर आहे. किल्ला !!!
आपण प्रत्येकानेच लहानपणी किल्ला केलेला आहे. अगदी स्वतः नाही तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किल्ल्याच्या निर्मितीत भाग घेतलेला आहेच. ज्यांचं बालपण वाड्यात किंवा जुन्या सोसायटीत गेल आहे त्यांनी तर हा आनंद मनमुराद लुटलेला आहे.
परंतु सध्याची पिढी या बाबतीत थोडी कमनशिबी आहे अस म्हणायला लागेल. कारण किल्ला करायला लागणाऱ्या जागेची उपलब्धता, मऊ चिकणमाती दगड, विटा या गोष्टी तितक्या सहजपणे उपलब्ध होत नाहीत. त्यातून पुन्हा किल्ला तयार करायला घेतल्यावर होणारा चिखल, आकारामध्ये वारंवार करावा लागणारा बदल यामुळे गोष्टी त्रासदायक होत जातात. त्याहूनही मोठा त्रास म्हणजे दिवाळी संपल्यानंतर किल्ल्यातील दगड मातीची विल्हेवाट लावणे. या सगळ्या गोष्टी गोळा करून बाहेर टाकून येणे व घरात साफसफाई करणे. या कारणांमुळे किल्ला करणे ही कितीही आनंददायी गोष्ट असली तरी नंतर ती काहीशी नकोशी होऊन बसते.
पण आता मात्र ह्या अडचणींवर मात करून एक सहज सोपी, झटपट, घरातील साहित्य वापरून हि आपण घरी किल्ला करू शकाल अशी एक पद्धत मी आपल्याला सांगणार आहे.
किल्ला करण्यासाठी लागणार साहित्य:
किल्ल्यावर साधारण 7 ते 8 सखल भाग तयार करावेत जेणेकरून त्यावर मावळे, तोफा, बुरुजांसाठी जागा होईल. महाराजांसाठी सर्वात उंच आणि प्रशस्त जागा तयार करावी.
बुरुज तयार करणे
निळ्या कागदाचा साधारण आयताकृती तुकडा कापून घ्यावा. त्याच्या 2 सामान घड्या घालून एका बाजूने वरून साधारण 2 cm अंतरावर उभे काप घ्यावेत. मग पूर्ण घडी उघडून बघावी. (फोटो क्रमांक 2)
आता विषम संख्या असलेले काप म्हणजे 1,3,5,7... दुमडून टाकावेत म्हणजे फोटोत दाखवल्याप्रमाणे बुरुजाची तटबंदी तयार होईल.आता यावर खडूने अथवा व्हाइटनर पेनाने दगडी विटांचे डिझाईन काढावे कि बुरुज तयार!!! (फोटो क्रमांक ३)
याच पद्धतीने बाकीचे बुरुज व तटबंदी , दरवाजा तयार करून किल्ल्यावर चिकटवावे.
खाली गाव तयार करण्यासाठी हिरव्या रंगाचा पातळ पतंगाचा कागद चुरगाळून (क्रश) करून पसरवा. कडेने चॉकलेटी रंगाच्या कागदाची जाड बॉर्डर करून घ्या.
पांढऱ्या कागदावर ढगांचे चित्र काढून फोटोत दिल्या प्रमाणे रंगावावे. (फोटो क्रमांक ४)
हे सर्व चिकटवून झाले की झाला आपला किल्ला तयार!!! मग त्यावर छानपैकी चित्र आणून किल्ला सजवावा. (फोटो क्रमांक ५)
हा झाला बेसिक किल्ला. याउपर आपली कल्पनाशक्ती आणि हाताशी असलेला वेळ वापरून आपण सहज निर्मितीचा आनंद आपल्या मुलांना देऊ शकता.
- साधारण 10 ते 15 निरनिराळ्या आकाराचे प्लास्टिकचे डबे
- चॉकलेटी रंगाचे कपडे टेबलक्लाथ
- ग्रे, पांढरा आणि चॉकलेटी रंगाचा जाड पेपर
- हिरव्या रंगाचा पातळ पतंगाचा कागद
- पांढरा खडू किंवा व्हाइटनर पेन
- पट्टी, पेन्सिल
- कात्री, चिकट पट्टी
किल्ल्यावर साधारण 7 ते 8 सखल भाग तयार करावेत जेणेकरून त्यावर मावळे, तोफा, बुरुजांसाठी जागा होईल. महाराजांसाठी सर्वात उंच आणि प्रशस्त जागा तयार करावी.
बुरुज तयार करणे
निळ्या कागदाचा साधारण आयताकृती तुकडा कापून घ्यावा. त्याच्या 2 सामान घड्या घालून एका बाजूने वरून साधारण 2 cm अंतरावर उभे काप घ्यावेत. मग पूर्ण घडी उघडून बघावी. (फोटो क्रमांक 2)
आता विषम संख्या असलेले काप म्हणजे 1,3,5,7... दुमडून टाकावेत म्हणजे फोटोत दाखवल्याप्रमाणे बुरुजाची तटबंदी तयार होईल.आता यावर खडूने अथवा व्हाइटनर पेनाने दगडी विटांचे डिझाईन काढावे कि बुरुज तयार!!! (फोटो क्रमांक ३)
याच पद्धतीने बाकीचे बुरुज व तटबंदी , दरवाजा तयार करून किल्ल्यावर चिकटवावे.
खाली गाव तयार करण्यासाठी हिरव्या रंगाचा पातळ पतंगाचा कागद चुरगाळून (क्रश) करून पसरवा. कडेने चॉकलेटी रंगाच्या कागदाची जाड बॉर्डर करून घ्या.
पांढऱ्या कागदावर ढगांचे चित्र काढून फोटोत दिल्या प्रमाणे रंगावावे. (फोटो क्रमांक ४)
हे सर्व चिकटवून झाले की झाला आपला किल्ला तयार!!! मग त्यावर छानपैकी चित्र आणून किल्ला सजवावा. (फोटो क्रमांक ५)
हा झाला बेसिक किल्ला. याउपर आपली कल्पनाशक्ती आणि हाताशी असलेला वेळ वापरून आपण सहज निर्मितीचा आनंद आपल्या मुलांना देऊ शकता.
वाचने
7294
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
छान झाला आहे किल्ला!
+१
कलाकार आहात,
आवडले काम.
लहानपणी आजोळी भिंतीशेजारी किल्ला बांधलेला त्या भिंतीवर काढलेले महाराजांचे चित्र 10-12 वर्षे तसेच होते. त्यानंतर आजोबांनी भिंत रंगवून घेताना तेवढी चौकट पेंटरला सोडून रंगवायला सांगितले होते.
.
आजोबा, ते चित्र आणि ति भिंत, काहीच नाही राहीले.
मस्त दिसतोय किल्ला. कल्पना पण छान आहे. कारण तुम्ही सांगितलेल्या अडचणी आहेतच.
तरीपण ते चिखलात माखणं, बॉलपेनच्या रिफिल चं कारंजं,ज्याच्याकडे शिवाजी असेल त्याच्या मर्जीनुसार वागणे (पर्यायच नाही), ते अळीव उगवतात कसे हे सतत पहाणे , तासंतास त्या किल्ल्यापाशी बसणे, शिवाय आमच्याकडे एका मित्राकडे खेळातली रेल्वे आणि खूप कार होत्या. त्या पण आमच्या किल्ल्यापुढे असायच्याच. त्यासाठी त्या मुलाच्या आईबाबांना साकडे घालणे ...... घरी कितीही ओरडत अस्तील तरीही त्या किल्ल्यापाशीच घुटमळणे...
आणि दिवाळी संपली की एके दिवशी त्याच किल्ल्यातल्या गुहेत अॅटम बॉम्ब नाहीतर सुतळी बाँब लावून तो उडवून टाकणे. त्यासाठी सगळ्या घरांमधल्या सगळ्या लोकांचा ओरडा खाणे... काय काय आणि काय काय आठवले
धमाल म्हणजे आपणच खपून केलेला किल्ला आपणच उडवून टाकताना ही तेवढीच मजा करायचो. हे कसं काय कोण जाणे.
माती न वापरता ज्यांना किल्ला करायचा आहे त्यांच्या साठी हा धागा पुन्हा वर काढत आहे.
मजा आली पुन्हा वाचताना
माती न वापरता ज्यांना किल्ला करायचा आहे त्यांच्या साठी हा धागा पुन्हा वर काढत आहे.
दोन वर्ष घरात उबलेल्या आमच्या बाळांना यंदा काहीतरी नवीन करायचे आहे. तुम्ही दाखवल्याप्रमाणे कपडा अंथरल्या नंतर त्यावर मातीचा थर लिंपला तर कसे??
In reply to धन्यवाद by शेर भाई
हो. चालेल की. तेही छानच दिसेल.
छान झाला आहे किल्ला!