Skip to main content

मसाला मिर्च-मकई

लेखक योगेश कुळकर्णी यांनी गुरुवार, 25/10/2018 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
- एक मोठं मक्याचं कणीस (मधुमका/ स्वीट कॉर्न) - २ मोठ्या शिमला मिरच्या (साधारणपणे २५० ग्रॅम) - २ मध्यम टोमॅटो - २ मध्यम कांदे - ४/६ लसणीच्या पाकळ्या - धणेपूड + जिरेपूड + हळद + लाल तिखट मिळून १ ते १.५ टेबलस्पून - मीठ, चवीला जराशी साखर - फोडणीकरता तेल आणि जिरं अशीच कुठेतरी पाहीलेली रेस्पी पण एकंदरीत प्रकरण चवीला फार जमलंय म्हणून शेअर करतोय इथे. - सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. सिमला जरा मध्यम आकारात चिरावी. - तेलाची फोडणी करून जिरं फुलवावं आणि त्यात कांदा जरा सोनसळू द्यावा; तो तसा झाला की मगच टोमॅटो घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावं - यात आता कोरडे मसाले घालून मिनिटभर होऊ द्यावं. त्याचा कचवट वास निवला की मक्याचे दाणे घालावे आणि जरा परतावं - मसाला दाण्यांना नीट माखला की यात पाव वाटी पाणी घालून वर झाकण घालावं आणि मक्याचे दाणे जरा शिजू द्यावे; लागेल तसं पाणी घालावं पण नंतर अजिबात पाणी राहाता कामा नये. - मका ऑलमोस्ट शिजला की यात चिरलेली मिरची, मीठ आणि अगदी हवीच असेल तरच चिमटीभर साखर घालावी (मी साखर वापरली नव्हती); सगळं नीट हलवून झाकण घालून भाजी पूर्ण शिजवून घ्यावी. - शेवटी जरा मोठ्या आचेवर ठेवून खरपूस करावी सारखी परतत राहून - गरमागरम भाजी फुलक्यांसोबत सुरेख लागते. - भाजीप्रमाणे वाढणी प्रमाण; २ लोकांना पुरेल - कांदा टोमॅटो ची वेगवेगळी पेस्ट करूनही वापरता येइल. पण पेस्ट वेगवेगळी करणं आणि वेगवेगळी परतणं आवश्यक आहे - तिखट जरा चढं हवं कारण कॉर्न ची गोडी - हिंग; आलं आणि कसूरीमेथी, आपले हे ते; ते हे आणि इतर मसाले वापरायचे नाहीत

वाचने 8086
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हा प्रकार, मुलांसाठी करावा म्हणतो..

तिन्ही रेसिपी साठी फोटो दिल्याबद्दल कंजूस काकांचे आभार आणि योकू आपण अजून पाककृती टाकत राहा. छान असतात

आजच करून बघते