साहित्य -
चार ते पाच कच्चे टोमॅटो
चार ते पाच हिरव्या मिरच्या
ओले खोबरे (पाव वाटी तुकडा)
दोन ते ३ चमचे दाण्याचे कूट
१ ते २ चमचा दही
थोडा गूळ (एक छोटा खडा )
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी एक चमचा तेल, मोहरी , जिरे , कडीपत्ता
कृती
कच्या टोमॅटोच्या छोट्या फोडी करून घ्याव्यात , त्यात मीठ, मिरच्या , खोबरे, थोडे जिरे , दही घालून मिक्सरला वाटून घ्यावे . वाटून झालयावर त्यात दाण्याचे कूट आणि गुळ बारीक करून घालावा. वरून जिऱ्या , मोहरी कडीपत्त्याची फोडणी करून ओतावी .
चव अतिशय अप्रतिम लागते . फोटो काढण्याचा सोस नसल्याने फोटो काढला नाही.
वाचने
8428
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्या....
फोटोसाठी पुन्हा करा ना!
हो ना
In reply to फोटोसाठी पुन्हा करा ना! by कंजूस
हो हो करते, कित्येक पदार्थ
सहमत
In reply to हो हो करते, कित्येक पदार्थ by जेडी
+ १
In reply to सहमत by सविता००१
या पद्धतीने पण करुन बघेन
आवडती चटणी!
फोटो टेम्प्लेट
मायबोली वर दुसरं कोणीतरी आहे,
In reply to फोटो टेम्प्लेट by कंजूस
अरेच्या होय.
आवडली. बायको नेहमीच करते.