मुंबई जयपूर अजमेर पुष्कर उदयपूर चित्तोडगड - 1

विकास...'s picture
विकास... in भटकंती
4 Oct 2018 - 8:26 pm

जयपूर विमानतळावरून ओला कॅब लगेच मिळतात. . जयपूर ते सिंधी कॅम्प रुपये १५० - २००. सिंधी कॅम्प येथे बरीच हॉटेल आहेत. Hotel Arco Palace त्यापैकी एक बुक केले होते ९९९ मध्ये AC rooms आहेत. Online आणि app वर बुकिंग करता येते
मोठ्या रूम्स आहेत. फॅमिली साठी एकदम व्यवस्थित सोय आहे. लिफ्ट आहे, सकाळी सहा ते उद्या संध्याकाळी सहा असे बुकिंग होऊ शकते (30 Hours). गरम पाणी, Tea/Coffee maker चालू होता coffee / tea kit दिले होते
सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन हॉटेल मधूनच दिसते. सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन वरून udaipole ला मेट्रो ने जाता येते. Udaipole पासून छोटी चोपड ला रिक्षा मिळते. तिथे बरीच मोठी दुकाने आहेत . छोटी चोपड पासून जलमहाल WATERPALACE ला रिक्षा किंवा खासगी बस मिळतात

जयपुर हे राजस्थान राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. शहराची स्थापना 18 नोव्हेंबर 1727 रोजी राजा जयसिंह २ यांनी केली त्यामुळे जयपूर असे नाव आहे.
इमारतींच्या लालसर रंगामुळे जयपूरला गुलाबी शहरही म्हटले जाते. इमारतीसाठी लाल दगड वापरला जातो, आणि रंग पण तसाच दिला जातो. जयपूर पासून नवी दिल्ली 280 किमी, आग्रा 240 किमी आहे. राजस्थान मधील जयपूर शहर सर्वात आधी पाहायला हरकत नसावी.
सार्वजनिक वाहतूक: रिक्षा, खासगी बस, सिटी बस आणि मेट्रो अशी जयपूर सिटी मधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. खरे तर कशाचा कशाचीच मेळ नाहीये. स्वतःची गाडी असली तरीही गर्दी आणि बेजबाबदार ड्रायविंग मुळे वैताग येऊ शकतो.

English मध्ये वापरलेले शब्द जशेच्या तसे google map वर वापरून अंतर मोजता येईल.

1. Jaipur Airport>Sindhi Camp

2. Jaipur Railway Station > Sindhi Camp Bus Stand/Metro Station>Udaipole>Nahargarh Fort

3. Jaipur Railway Station > Sindhi Camp Bus Stand/Metro Station>Udaipole>Market (Downtown )

4. Jaipur Railway Station > Sindhi Camp Bus Stand/Metro Station>Udaipole>Choti Chopad>Water Palace (जलमहाल)

5. Jaipur Railway Station > Sindhi Camp Bus Stand/Metro Station>Udaipole>Choti Chopad>Water Palace> Amer Palace/Fort

6. Jaipur Railway Station > Sindhi Camp Bus Stand/Metro Station>Udaipole>Choti Chopad>Water Palace> Fort Jaigarh Fort

इतर: चोकी धानी, जंतर मंतर, हवा महाल, सिटी पॅलेस जयपूर, राजमंदिर
आवडलेले पदार्थ - गरम दूध, लस्सी, परोठे, पंजाबी डिशेस, घेवर, मुंग दाल हलवा, रोटी.

1. Sindhi Camp सिंधी कॅम्प: लहान मोठी स्वस्त महाग हॉटेल, चार राज्यांतील बस असणारे स्थानक, खासगी लोकल बस, खासगी इंटरस्टेट बस, ऑटो रिक्षा, इलेक्ट्रॉनिक रिक्षा, टुरिस्ट ऑफिसेस, आणि ट्रॅफिक जॅम आणि यासगळ्यावरून गेलेली मेट्रो

2. Nahargarh Fort नाहरगड: सगळ्यात सोप्पा आणि शहरापासून जवळचा किल्ला. Jaipur Railway Station > Sindhi Camp Bus Stand > Chandpole > असा मेट्रो ने प्रवास करून चांदपोल पासून पुढे पायी फक्त २ किमी चालावे लागेल.
अगदी सकाळी ६:०० ला या किल्ल्यावर जाण्यास हरकत नाही. सकाळी सकाळी अजिंक्यतारा किंवा पर्वती वर जावे असाच का किल्ला वाटला. (ऑटो वाले नाहरगड १५ किमी म्हणाले आणि रुपये १५०) सरळ google map लावून चालायला सुरुवात करा. सकाळी सकाळी काही विक्रेते भुट्टा विकताना दिसतात. (वरून दिसणारे पॅनारॉमिक दृश्य Nikon १६ MP आणि Xperia २३MP मध्ये बसत नव्हते मग काही व्हिडिओ शूटिंग चे काही प्रयोग करून मी खाली उतरायला सुरवात केली).
Fort चा रस्ता पायथ्यापासून मजबूत दगडामध्ये बांधलेला आहे. दोन्ही बाजूला भिंत आहे. आणि सगळं परिसर हिरवागार आहे. कमानींमधून आत गेल्यावर डाव्या बाजूला मोठी बावडी आहे. तटबंदी मजबूत आणि मोठी आहे. त्यावरून आणखी उंचीवर जात येते. Fort च्या पूर्वेकडील बुरुजावरून जयपूर दिसते. जंतर मंतर आणि इतर ठिकाणे दिसतात. पूर्वेकडे जलमहाल, आमेर पॅलेस आणि जयगड दिसतो. नाहरगड मध्ये जयपुर वॅक्स संग्रहालय आहे. किल्ल्याच्या तटबंदी दूरपर्यंत अगदी जयगड पर्यंत दिसतात. राजा महाराजा सवाई माधो सिंह यांनी हा किल्ला १७३४ मध्ये बांधला. इतिहासामध्ये या किल्ल्यावर कधीही हल्ला झाला नाही.

3. Market (Downtown): राजस्थानी - मोजडी / मोजरी, चप्पल, बूट, कापड, कपडे, कुर्ता, कुर्ती, बांगड्या, बॅग्ज, टोप्या, (बहुतेक दुकानात कार्ड पेमेंट घेत नाहीत)

4. Water Palace जलमहाल : काय नाय तिथं नावापरमानं पाण्यात हाय.
लाल दगडांमध्ये बांधलेला हा महल पाच माजली आहे चार मजले पाण्याखाली गेलेत पाचवा मजला मुख्य रस्त्यावरून दिसतो. मुख्य रस्त्याच्या कडेला फेरीवाले, राजस्थानी ड्रेस मध्ये फोटो काढणारेभरपूर भेटतील. लहान मुलांसाठी गाड्या गाड्या आहेत. समोर हॉटेल्स आहेत
इथे फोटो काढण्या पलीकडे काही दिसले नाही. थोडावेळ वेळ रेंगाळून आमेर पॅलेस कडे जाणारी बस पकडावी. खासगी बस रुपये १० प्रत्येकी.

पुढील भागात ...

5. Amer Palace/Fort: तोपर्यंत पहा - Best Fight scene of Salman Khan from Veer Movie - https://youtu.be/IJO4iN49oSk

for Photos please click

https://photos.google.com/photo/AF1QipNWLZRiTsPlOa0VnCsi-1rpOh6FSYRDCbVK...

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

4 Oct 2018 - 8:45 pm | प्रसाद_१९८२

अतिशय माहितीपूर्ण लेख.
या लेखात फोटो टाकले आहेत का ? मला दिसत नाहीत.
--
for Photos please click याच्या खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक केल्यास, खालील मेसेज येतो.
--
404. That’s an error.

The requested URL was not found on this server. That’s all we know.

चौथा कोनाडा's picture

4 Oct 2018 - 10:46 pm | चौथा कोनाडा

फोटो पायजेल,
फोटो पायजेल,
लेखा मध्ये
फोटो पायजेल !

जयपूरमधली जंतरमंतर वेधशाळा पाहणे हे माझे ध्येय होते आणि ते मी शांतपणे पाहिले.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2018 - 2:32 pm | चौथा कोनाडा

कंजूस साहेब,

+१

इतक्या उदासीन पद्धतीने का लिहिला आहे भटकंती वृत्तांत?
फिरण्यात तुमचं मन नव्हतं का?

अथांग आकाश's picture

5 Oct 2018 - 7:04 pm | अथांग आकाश

+१००

.

रॉयल राजस्थानची माहिती पण रॉयली येउद्यात! वाचायला मजा येईल!

चौथा कोनाडा's picture

6 Oct 2018 - 1:11 pm | चौथा कोनाडा

@यशोधरा, मी अगदी हेच लिहिणार होतो.
साधी साधी भटकंती सुद्धा मिपाकर किती रसाळपणे लिहितात, मजा येते वाचायला ! चर्चापण रंगतात !
हे विकास... साहेब तर राजस्थान भटकून आलेत, मग भटकंती वृतांत कसा आला पाहिजे !
अन विकास...साहेब तर आठ वर्षांचे जुनेजाणते आहेत मिपावर !

ते कै नै विकास...साहेब, जरा ऐसपैस वेळ काढा, बैठक मारा, अन येऊ द्या झकास भटकंती वृतांत !

(टिपः मी विकास...साहेब असं मी लिहिलंय, कारण त्यांच्या नावापुढेच असे डॉट डॉट आहेत)

लोनली प्लॅनेट's picture

6 Oct 2018 - 11:24 am | लोनली प्लॅनेट

माफ करा पण हा लेख भटकंती चा नसून टुरिस्ट विभागाची मार्गदर्शिका वाटतेय

सर्व प्रतिक्रियांची नोंद घेतलेली आहे.. शांतपणे लिहावे लागेल (बायको घरात नसताना)

अभ्या..'s picture

7 Oct 2018 - 1:14 pm | अभ्या..

कौतुक वाटले ;)

Nitin Palkar's picture

7 Oct 2018 - 6:16 pm | Nitin Palkar

... तरीही आवडला. पुढील भाग अधिक रंजक, सविस्तर लिहाल.....

थोडी ईतर प्रवासवर्णने डोळ्याखाली घाला आणि मग लिहा. मि.पा.वर एकसे बढकर एक प्रवास वर्णने आहेत. आणखी छान लिहू शकाल. पु.ले.शु.

तिता's picture

19 May 2022 - 9:22 am | तिता

कुणालाही जायचे असेल तर उत्तम माहिती दिली आहे. इतकी सुंदर माहिती professional tourist कंपन्या पण देत नाहीत. पुढील भाग सापडले नाहीत. Comments मुळे discourage झाले का?