पगार, स्त्री-पुरुष समानता आणि जॉर्डन पीटरसन
जॉर्डन पीटरसन हे नाव कधी जास्त ऐकलेलं नव्हतं. कुठुन तरी युट्युबबाबाने सजेस्ट केलं आणि त्याचे काही विडिओ पाहण्यात आले. या बाबाचे काही मुद्दे मस्त पटले तर काही अजिबात नाही. खरंतर काही ठिकाणी तो अगदी इथल्या अजोसारखा पण वाटला. माणूस अगदी शांतपणे मुद्द्याला धरुन जे शब्दच्छल अथवा गोळीबंद रचना करतो ती खरंच इंप्रेसिव वाटली.
आता या इथे शेअर केलेल्या वरच्या लिंकमध्ये कॅथीबाईंनी यांची मस्त तासू अशा ठरावाने घेतलेली मुलाखत पहा. काका काही म्हणाले की 'म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का...' अशा सुरुवातीने बाई त्यांची अतर्क्य अशी कंन्क्लुजन फेकतात. कधी कधी तर पुस्तक अथवा आधी कुठे म्हटलेली वाक्ये देखील या अशा भडिमारासाठी त्या वापरतात. काका मात्र शांतपणे मुद्देसूद बोलायचा प्रयत्न करतात (बाईंनी बोलू दिले तर अर्थात.)
मुलाखतीतला मुख्य मुद्दा पगारासंदर्भातल्या स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा आहे आणि काका त्या फेवरमध्ये नाहीत हा बाईंचा निष्कर्ष आहे (काकांचा मुद्दा त्याच अर्थाचा पण जास्त सविस्तर आहे). कॅथीबाईंनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी काका जमले तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत हे चित्र चाललेय आणि ट्रांस लोकांसाठी वेगळ्या संबोधनाची चर्चा सुरु होते तेव्हा काकांना एक भन्नाट फुलटॉस मिळतो, त्यावर काकांनी जे फुल टॉस लावलाय तो वाद विवादासाठी अगदी उत्तम नमुना ठरावा (ही चर्चा या इथे सुरु होते.).
एकंदरीत पगारासंदर्भातल्या स्त्री-पुरुष समानतेबद्दलतरी काकांची मतं ६०-७०% सेन्सिबल वाटली. काही बाबतीत ते उगीच ओढून ताणून उत्तरे जुळवत आहेत अथवा तकलादू प्रतिवाद करत आहेत असं वाटलं पण त्याला त्या कॅथीबाईंचा स्वत:चे मत रेटण्याचा अग्रेसिवपणा झाकून टाकत होता.
एकंदरीत डावे उजवे यात काहीच पटत नसले तरी हे असले फड रंगलेले पहायला मजा येते हे नक्की. :)
[संपूर्ण मुलाखत या इथे ]
याद्या
3185
प्रतिक्रिया
4
वर्गीकरण
मिसळपाव
काकांच्या या चर्चेतल्या काही
पीटरसन यांचे म्हणणे मुद्देसूद
पीटरसन बऱ्यापैकी आक्रमक आहेत,
In reply to पीटरसन यांचे म्हणणे मुद्देसूद by sagarpdy
आक्रमक म्हणजे आक्रस्ताळे नाही
In reply to पीटरसन बऱ्यापैकी आक्रमक आहेत, by अस्वस्थामा