Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विवेकपटाईत on Tue, 10/02/2018 - 08:06
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो गुरुनाथ: हं, बोल राधिका राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे. गुरुनाथ: का! म्हणून? राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही. सुखानी नांदू आपण सर्व एकत्र घरात. गुरुनाथ (कोर्टाचा निर्णय ऐकून, हिचे डोके तर फिरले नाही ना. काहीबाही बडबडते आहे - तिचे बोलणे मध्ये तोडत): राधिका, तू थकलेली वाटते, ऐक माझे, घरी ये मग आपण निवांत बोलू. राधिका: अहो, तसे काही नाही, मी तर आज एकदम जोश मध्ये आहे. फोन करण्याचे मुख्य कारण म्हणजे, आज रात्री फाईव स्टार हॉटेल मध्ये आपल्या बिजिनेस पार्टनर सोबत रात्र भर मजा करणार. गुड नाईट, माय डियर हसबंड. मजा कर शयाना सोबत.सकाळी भेटूच. गुरुनाथ भोवळ येऊन पडतो....
  • Log in or register to post comments
  • 4054 views

प्रतिक्रिया

Submitted by palambar on Tue, 10/02/2018 - 20:21

Permalink

हा हा हा , कुठलाही कायदा

हा हा हा , कुठलाही कायदा इतक्या लगेच लागू होतो काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 10/02/2018 - 21:28

Permalink

शयाना नव्हे, शनाया. अर्थात

शयाना नव्हे, शनाया. अर्थात तुम्हीच पुढे शयना लिहीलं आहे त्यामुळे असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/12/2018 - 11:18

In reply to शयाना नव्हे, शनाया. अर्थात by सतिश गावडे

Permalink

असो असो

हे तर आहेच शिवाय "अहो, मला तुझी माफी मागायची आहे" हे संबोधन काही कळले नाही बुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Wed, 10/03/2018 - 00:03

Permalink

मला हे समजले नाही

सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार हा अपराध नाही असे म्हटलेले नाही. त्यांनी तो फौजदारी गुन्हा न मानता त्याला सिव्हिल गुन्हा असे ठरवले आहे. म्हणजे या निर्णयांनंतरही राधिका घटस्फोटाची सध्याची केस लढु शकते
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Sat, 10/06/2018 - 02:33

Permalink

झक्कास.... शेरास सव्वाशेर...

झक्कास.... शेरास सव्वाशेर... कायदा आणि नियम गेले तेल लावत. जर मला असा कोणीतरी मनापासून पटला असेल तर मी देखील उगाच लग्न... एकपतित्व वगैरे मानणार नाही हे राधिकाने दाखवून दिलंय. एकदम आवडेश
  • Log in or register to post comments

Submitted by Ganesh Dwarkan… on Mon, 10/08/2018 - 17:34

Permalink

छान

पश्चिमी संस्कृती कडे एक पाऊल ....
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Fri, 10/12/2018 - 10:53

Permalink

म्हणजे पुरुषाने केलं तर चालेल

म्हणजे पुरुषाने केलं तर चालेल; स्त्री ने केलं तर पश्चिम संस्कृती अस का? पण मुळात जिथे पुरुष affair करतो तिथे स्त्री आहेच की. एका हाताने टाळी नाहीच न वाजत. माझ्या मते आपलं सुख आपला आनंद कोणावरही अवलंबून नसावा हे महत्वाचं. बाकी affair किंवा लग्ना बाहेरील संबंध हे सगळं वयक्तिक दृष्टिकोनातून पाहावं
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com