समाधान कुठे सापडेल हो ?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
समाधान कस कुठे सापडेल सांगता येत नाही राव. कधी ते निसर्गात सापडत तर कधी पार निर्मानुष्य नसलेल्या देवळात मिळत. हे समाधान खुप वेगळे असते. नाकात उदबत्ती धूप कर्पूर मिश्रीत सुगंध, डोळ्याला पार गाभारा भरून राहीलेली मूर्ती शितल, कानात येते वेळी वाजवलेल्या घंटेचा रेंगाळणारा नाद ब्रम्ह, मध्येच छेदणारा दूर कुठल्यातरी पक्षाच्या किलकिलाट अगदी अकृत्रिम, पायाला स्पर्शणारा दगडी फर्शीचा ठंड़ावा, जिभेवर कर्पूर मिश्रीत तीर्थाचा शिडकावा कान, डोळे, नाक, स्पर्श, चव सर्व एकाच वेळी सुखावतात. आणि तुम्हाला समाधानाचा शोध नव्याने लागतो
कधी बाजारातून जाउन किंवा घराच्या कुंडीत रोवलेली छानशी पालेभाजी आणावी, घरी आणून लगेच ती निवडावी, चिरावी, शिजवावी, गरम गरम भाता बरोबर ती पानावर घ्यावी आणि तिची चव जिभेवर पसरवावी. पुन्हा त्या भाजीचा खुडतानाचा स्पर्श, भाजी शीजताना येणारा गंध आणि तो मटमट आवाज आणि पुन्हा डोळे ठंड करणारा तो भाजीचा ओलावा आणि जिभेवर विरघळणारी ती चव आणि समाधानाचे वर्तुळ पुन्हा एकदा पूर्ण
हे इतक सगळ डीटेल मध्ये लिही णयाचे प्रयोजन इतकेच की समाधान आपल्या आत असते आणि आपण ते बाहेर शोधत रहातो. आपली पंचेन्द्रिय आपल्याला समाधानाचा अर्थ सांगू पहातात पण आपण तो अर्थ ऐकतही नाही आणि समजतही नाही. शेजारच्याने हुँदै आणली तर आपण टोयोटा आणली पाहीजे, एक बी एच के लहान पडतोय दोन बी एच के घ्या, परवडते आहे तर वीकेंड होम घ्या भले ते रीकामे राहूदया. महिन्द्रा हॉलीडेज ची मेम्बरशिप भरा, घराचे हप्ते भरण्यासाठी सोळा सतरा तास काम करा. जॉब स्वीच करा . पेपरवर तुमची नेट वर्थ वाढते खरी पण समाधान मात्र व्यर्थ जाते.
समाधान आपल्या आत असते पण आपण ते बाहेर शोधत रहातो. समाधान खुप महाग गोष्ट आहे सर्वाना परवड़तेच असे नाही
केदार अनंत साखरदांडे
प्रतिक्रिया
खूप सुंदर लिहले आहे."तुझ आहे
खुप मनापासुन लिहले आहे आणि
अगदी बरोबर आहे समाधान मानले
भाजी हा भाताबरोबर खाण्याचा पदार्थ आहे हे मला अजिबात मान्य
दवणीय!
समाधान कुठे सापडेल हो ?
जावेद अख्तर यांनी लिहून ठेवलंच आहे...
छान लिहील॑ आहे. पण लेख सुरु
सॉरी, पटलं नाही.