Skip to main content

देशाविरुद्ध कारस्थान

लेखक ट्रेड मार्क यांनी शनिवार, 15/09/2018 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबरच्या १४ तारखेला नांबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अशी पेपरात बातमी आली आहे. बऱ्याच लोकांना नांबी नारायणन कोण याबद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे, तर ते कोण हे आधी जाणून घेऊ. देशाचे लाडके राष्ट्रपती कलाम यांच्या जोडीने काम करणारे आणि त्यांच्या सारखेच प्रतिभावान म्हणून नांबी नारायणन ओळखले जातात. १९९० साली इसरो मध्ये हे दोघेही एकाच प्रोजेक्टच्या दोन भागांवर काम करत होते. श्री. कलाम हे रॉकेटसाठी लागणाऱ्या घनरूप इंधनावर तर नांबी नारायणन हे द्रवरूप इंधनावर काम करत होते. याच प्रोजेक्ट मध्ये क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होता. त्या काळात जगातील अमेरिका, फ़्रान्स, रशिया, चीन व जपान या ५ देशांकडे हे तंत्रज्ञान होते आणि ते या देशांसाठी पैसे कमावण्याचे साधनही होते. यातल्या रशियाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दाखवली होती पण त्यात अमेरिकेने खोडा घातला. त्यामुळे मग हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करावे असे ठरवले गेले आणि त्यात नांबी नारायणन याची महत्वाची भूमिका होती. अचानक एके दिवशी केरळच्या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांनी मालदिवच्या दोन महिलांना भारताची गुपिते विकल्याचा आरोप ठेवून नारायणन यांना अटक केली. नंबींच्या मते त्यामागचा खरा सुत्रधार आयबी या गुप्तचर खात्याचा सहसंचालक श्रीकुमार होता. त्यानेच खोटेनाटे पुरावे उभे करून नंबींना त्यात गुंतवले आणि त्यांच्यासह सहा शास्त्रज्ञांना तुरूंगात डांबले.ही बातमी प्रथम लोकल पेपर मध्ये आली मग तिथून ती राष्ट्रीय माध्यमात गेल्यावर नांबी नारायणन हे कसे देशद्रोही आहेत हे सिद्ध करण्याची स्पर्धाच चालू झाली. नांबी नारायणन ५० दिवस कोठडीत होते आणि त्यांच्यावर इसरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण यात गोवावे म्हणून दबाव आणण्यात आला, पण नांबी नारायणन त्याला बळी पडले नाहीत. खूप गाजावाजा झाला आणि इसरो सारख्या संस्थेचे नाव आले म्हणून शेवटी सीबीआयने ही केस हातात घेतली. त्या चौकशीत नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झालेच. पण त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोटे पुरावे निर्माण करून हे कुभांड रचल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पुढली चारपाच वर्षे गेली आणि नंबी आयुष्यातून उठलेले होते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आलेली होती. कोर्टाने त्यांना दहा लाखाची भरपाई देण्याचा आदेशही दिला. पण नंबींना तो मान्य नव्हता. कारण या गडबडीत त्यांची पत्नी निराशेच्या गर्तेत लोटली गेली व कुटुंबही उध्वस्त होऊन गेलेले होते. अन्य पाच शास्त्रज्ञही बरबाद झालेले होते. शिवाय या व्यक्तीगत नुकसानापेक्षाची देशाच्या महत्वपुर्ण संशोधनाची पुरती वाताहत होऊन गेलेली होती. त्यामुळेच नंबी यांनी हायकोर्टाच्या निकालावर अपील केले. त्यांनी मुळात हायकोर्टात आपल्या विरोधात आरोप करणारे व अन्याय करणारे, यांच्या चौकशीची मागणी केलेली होती. ती पुर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलेले होते. आता शुक्रवारी त्याचा निकाल आला आहे आणि त्यासाठी खास निवृत्त न्यायमुर्तीची समितीही नेमली गेलेली आहे. त्यामुळे त्या चौकशीत अनेक चेहर्‍यांवरचे मुखवटे फाटतील व देशाच्या राजकारणात व व्यवस्थापन, शासनात कोण देशद्रोही दबा धरून बसले आहेत, त्यांचा पर्दाफ़ाश होऊन जाईल. या प्रकरणातील सहसंचालक श्रीकुमार यांचे नाव कदाचित तुम्हाला ओळखीचे वाटले असेल. तर ही व्यक्ती २००२ मध्ये गुजराथचे पोलिस महासंचालक होती आणि मोदींना दंगलीच्या आरोपात गोवण्याच्या कारस्थानाचेही श्रीकुमार हेच सूत्रधार होते. या दोन्ही केसेस मध्ये खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करून तसेच माध्यमांना हाताशी धरून देशाविरुद्ध कारस्थान रचले गेले. यात मोदी हे राजकारणातच असल्याने आणी कणखर स्वभाव असल्याने राजकारणात टिकून राहिले. पण शास्त्रज्ञ असलेल्या नांबी नारायणन यांनी कणखरपणे लढा जरी दिला तरी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द संपली. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले. यात श्रीकुमार, संजीव भट्ट सारख्या देशद्रोह्यांबरोबरच भारतातील काही प्रमुख मिडिया हाऊसेस सुद्धा सामील आहेत. कदाचित काही राजकारणीही सामील असण्याची किंबहुना पडद्यामागचे सूत्रधार असण्याची पण शक्यता आहे. येत्या काही काळात ही नावे आपल्यासमोर येतील अशी आशा करू. आज सुद्धा पेपरमध्ये आलेल्या या आणि या दोन बातम्यातील फरक बघा. तसेच भाऊ तोरसेकरांचा हा लेखही वाचावा. अश्या परिस्थितीतही क्रायोजेनिक इंजिन आणि इतर अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल इसरोचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. =============== संदर्भ : "डॉ. कलाम आणि नंबी नारायणन" : जागता पहारा (ब्लॉग) दुवा : https://jagatapahara.blogspot.com/2018/09/blog-post_14.html

वाचने 34706
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by ट्रेड मार्क

गुजराथमध्ये २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी दंगल उसळत असे. २००२ मध्ये एकदाच धडा शिकवल्यावर पुढची १२-१३ वर्ष एक तरी दंगल झाली का? झाली असेल तर उदाहरणाने दाखवून द्या.
हे वाक्य ट्रेड मार्क यांचेच आहे. मिपावरती कुठल्याही दंगलीबद्दल असे वाक्य धडधडीतपणे कोणी केले नसावे कदाचित! इथे त्यांचा पूर्ण प्रतिसाद पाहता येईल. दंगलीला "धडा शिकवण्याची" उपमा देऊनही मी त्याचे समर्थन करत नव्हतो असे म्हणायला मोकळे! आणि इथे "कोण पुरोगामी" वगैरे सांगत बसलेत. ज्यांना दंगलीत मरणाऱ्या कोणाच्याही जीवाची किंमत नाही आणि जेव्हा स्वतः किंवा स्वतःच्या नातलगांपैकी कोणीही अशा दंगलीमध्ये दगावण्याची शक्यता वाटत नसते तेव्हाच माणूस दंगलीसारख्या गोष्टींचे समर्थन करू शकतो. आणि असल्या विचारांची माणसे हल्ली उजळ माथ्याने इतरांना उपदेशाचे डोस पाजत असतात आणि "पुरोगामी" ठरवत असतात. तुमच्यासाठी तरी मी पुरोगामीच आहे आणि तुमच्यासारख्या विचारांच्या माणसांना विरोध करणारच आहे.

In reply to by शब्दबम्बाळ

दंगलीला "धडा शिकवण्याची" उपमा देऊनही मी त्याचे समर्थन करत नव्हतो असे म्हणायला मोकळे! अशा लोकांनी प्रत्यक्ष दंगलीचा अनुभव घेतला तर चुकूनही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

बरंच उत्खनन केलंत की! पण अजून तुमची ठराविक वाक्य घेऊन बोलायची सवय सुधारली नाही वाटतं. एवढे कष्ट करून इथे तो प्रतिसाद आणण्यापेक्षा मी तिथेच जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं द्या की. मी अजूनही माझ्या वाक्यावर ठाम आहे - २००२ आधी गुजराथ मध्ये किती दंगली झाल्या याचा आकडा बघा आणि नंतर किती झाल्या हे सांगा. बरं हे २००२ च्या दंगलीमध्ये फक्त मुस्लिमांवर हल्ले झाले हे तुम्हाला म्हणायचं असेल तर दंगलीची सुरुवात कुठून झाली? ट्रेनच्या डब्यांची दारं बाहेरून बंद करून आग कोणी लावली? त्यात जिवंतपणी कोळसा होऊन मेलेले लोक कोण होते? तर मी पुरोगामी त्यांना म्हणतो जे दंगलीचा ट्रिगर असणारी ही घटना सोयीस्करपणे डोळ्याआड करून फक्त नंतर झालेल्या दंगलीकडे बोट दाखवून फक्त मुस्लिम कसे बिच्चारे हे सांगत बसतात. मी आधीही म्हणलं आहे की मी दंगलीचे समर्थन केलेलं नाही आणि करत नाहीये. पण जर एक समाजगट सतत काही ना काही कारण काढून अशांतता पसरवत असेल, दंगली करत असेल तर एकदाच धडा शिकवणे हेच त्यावरचे उत्तर आहे असे माझे मत आहे. तुमच्या मते काय वाटेल तेव्हा मुस्लिमांनी दंगली कराव्या आणि हिंदूंनी मारले जावे हे योग्य आहे का? हिंदू दहशतवाद म्हणून ओरडणाऱ्यांची लक्तरे कोर्टानीच काढली आहेत. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना उगाच खोट्या खटल्यात गोवण्यात आलं हे सिद्ध झालं आहे. २००२ मध्ये मोदींनी मुस्लिमांना मारण्यासाठी पोलिसांना मोकळे सोडले या आरोपाचीही कोर्टाने लक्तरं काढली आहेत. याउलट जगभर झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात मुस्लिमांचा हात सतत सिद्ध झालेला आहे. मला फक्त हेच दाखवून द्यायचं आहे. झाडून सगळे मुस्लिम दहशतवादी असतात असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. पण तुलनात्मक संख्या बघितली तर मुस्लिम जास्त आक्रमक आहेत. तुम्हाला आणि गोडसे साहेबांना एक सांगतो - माझा जन्म मुंबईचा आणि नंतरची २०-२२ वर्षे मी मुंबईत दादर मध्ये राहिलो आहे. त्यामुळे मुंबईतल्या दंगली आणि बॉम्बस्फोटसुद्धा प्रत्यक्ष पहिले आहेत. ४ दिवस कर्फ्यू नंतर संध्याकाळी २ तास बाहेर जायची परवानगी दिल्यावर ८ पदरी आंबेडकर रोडच्या डिव्हायडर वर जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत जीपवरच्या तोफा घेऊन सैनिक उभे असलेले पण बघितलं आहे. एवढंच नव्हे तर गॅंगवॉर आणि त्यावेळची दहशत सुद्धा अनुभवली आहे. त्यामुळे मी स्वतः दंगलीचा आणि दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यामुळेच माझे असे मत आहे की या लोकांना डोकं वर काढून दिलं नाही तर शांतता राहते. आता शब्दबंबाळ किंवा गोडसे यापैकी कोणी दंगलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय का सांगा बघू?

In reply to by ट्रेड मार्क

दंगलीचा आणि दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यामुळेच माझे असे मत आहे की या लोकांना डोकं वर काढून दिलं नाही तर शांतता राहते. ठीक आहे. तुमच्या ओळखितले किती निरपराध ह्यात मारले गेले? किंवा दंगलीत नेमके किती निरपराधांचे बळी गेले? नेमका धडा कोणाला शिकवला गेला? भिवंडीत १९९२ नंतर एकही जातीय दंगल घडली नाही. आयपीएस सुरेश खोपडे ह्यांनी नेमके काय केले ह्याचा जरा अभ्यास करा, तुमच्या डोक्यातील 'धडा' शिकविण्याचे भूत उतरायला मदत होईल.

In reply to by ट्रेड मार्क

संपादक महोदय, मिपावरती असे विखारी विचार चालणार आहेत का ते बघून घ्या! इथे सरळ सरळ एकदाच धडा शिकवायची( दंगलीच्या माध्यमातून) उघडपणे भाषा केली जात आहे. उद्या जर अश्या चिथावणीतून काही अप्रिय घटना घडली तर सदर व्यक्ती त्याची जबाबदारी घेणार आहे का हे बघून घ्या. नाहीतर मिपावर नसते बालंट यायचे. असेही देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना देशातल्या कायद्यांनी फारसा फरक पडत नाही त्यामुळे कृपया देशातल्या लोकांनी असल्या विचारांपासून आणि ते पसरवण्यापासून लांबच राहावे. हिंदू/मुस्लिम/पुरोगामी/सेकुलर अशी वेगवेगळी भुते तयार करून नेहमीच लोकांना घाबरवण्यात येत, आता तर निवडणूक तोंडावर येत आहेत... कुठल्याही ठरला जाऊ शकतात लोक! नोकऱ्या, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते हे विषय सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असायला हवेत पण त्यापासून त्याला भटकवून नेहमीच तो धोक्यात कसा आहे आणि कोणीतरी त्याला मारायलाच कसे बसलेले आहे हे सतत बिंबवत राहायचे चालले आहे... मला या विषयावर अश्या विखारी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीशी चर्चा करण्यात काहीही रस नाही. मी आधीपण म्हणालो आहे, देशात न्यायालये आहेत आणि कोणीही कायदा मोडला तर त्याला शिक्षा करण्यास ती समर्थ आहेत! लोकांनी कायदा हातात घेऊन "निवाडा" करण्याचा किंवा "धडा शिकवण्याचा" प्रयत्न कृपया कधीही करू नये...

In reply to by शब्दबम्बाळ

असल्या चिथावणीखोर प्रचाराचा निषेध करून संपादक मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतो, नका हो कुणा पक्षाचे अथवा विचारसरणीचे मुखपत्र बनवू देऊ मिपाचे.

In reply to by शब्दबम्बाळ

लोकांनी कायदा हातात घेऊन "निवाडा" करण्याचा किंवा "धडा शिकवण्याचा" प्रयत्न कृपया कधीही करू नये... अगदी बरोबर

In reply to by शब्दबम्बाळ

कशाला उगाच कांगावा करताय? मी काय म्हणतोय हे तुमच्या अजूनही लक्षात आलं नसेल तर अवघड आहे. मी काही हिंदूंनी उगाच दंगल करून इतरांना कापून काढावे हे सांगत नाहीये, तर दुसऱ्या बाजूने जर गोध्रा ट्रेन कांडासारखे काही घडले तर गप्प बसू नये हे म्हणतोय. तुमची अपेक्षा काय इतर धर्मियांनी हिंदूंना काही पण करावे आणि हिंदूंनी गप्प बसून राहावे अशी आहे काय? तिघांनी सारखेच प्रतिसाद दिले आहेत, त्यामुळे तिघांनाही एकत्रच उत्तर देतो. मार्मिक गोडसे - भिवंडीत १९९२ नंतर एकही जातीय दंगल घडली नाही. भिवंडीत मुस्लिम लोकांची लोकसंख्या किती प्रमाणात आहे हे बघा. बाकी हे मॉडेल जर एवढा यशस्वी आहे तर बाकी ठिकाणी का लागू केलं नाही? बाकी तुम्ही दंगल अनुभवली आहे का याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. शब्दबम्बाळ - इथे सरळ सरळ एकदाच धडा शिकवायची( दंगलीच्या माध्यमातून) उघडपणे भाषा केली जात आहे. तुमचे आकलन कमी पडतेय हे परत एकदा सिद्ध केलंत. विषय गुजराथ दंगलीचा आहे आणि त्यासंदर्भात मी म्हणलंय की २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी धार्मिक दंगल होणाऱ्या गुजराथ मध्ये, २००२ नंतर किती दंगली झाल्या याचा शोध घ्या. हेच मुंबईत किती दंगली झाल्या आणि दहशतवादी हल्ले झाले? गुजरातची हद्द पाकिस्तानला जोडून आहे. तशीच राजस्थान आणि पंजाबची पण आहे. पण २००२ नंतर गुजराथमध्ये एकदम शांतता कशी काय नंदू लागली? बरं तिथे काही मुस्लिम रहात नाहीत असं नाहीये. असेही देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना देशातल्या कायद्यांनी फारसा फरक पडत नाही मला वाटलंच हा विषय येणार. माझ्यामते फक्त एकाच ठिकाणी राहिल्यामुळे तुमचे बाहेरील परिस्थितीविषयीचे ज्ञान कमी आहे. बाहेरच्या देशात काय चाललंय ते जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही उत्खनन करून काढलेल्या या धाग्यावरील माझे प्रतिसाद नीट लक्ष देऊन वाचा. हिंदू/मुस्लिम/पुरोगामी/सेकुलर अशी वेगवेगळी भुते तयार करून नेहमीच लोकांना घाबरवण्यात येत, आता तर निवडणूक तोंडावर येत आहेत गंमत ही आहे की पुरोगामी/ सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या काळात भरपूर दहशतवादी हल्ले झाले. पण आता हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर गेल्या ४.५ वर्षात एक तरी झाला का? हेच २०१४ च्या आधी काँग्रेसच बोंबलत होती की नरेंद्र मोदी सत्तेवर आले तर देशभर दंगे होतील आणि त्यांना तथाकथित सेक्युलरांची पण साथ होती. कित्येकानी मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सोडून जाऊ असे म्हणले होते. तर सेक्युलर सरकारांच्या काळात दंगे, दहशतवादी हल्ले होतात पण कट्टर म्हणवल्या जाणाऱ्या सरकारच्या काळात एक पण होत नाही हे कसं काय याविषयी तुमचं आकलन सांगा बघू. नोकऱ्या, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते हे विषय सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असायला हवेत पण त्यापासून त्याला भटकवून नेहमीच तो धोक्यात कसा आहे आणि कोणीतरी त्याला मारायलाच कसे बसलेले आहे कायदा व सुव्यवस्थेबद्दल वर सांगितलेलं आहे. आता तुमचा रोख जर बीफ वरून झालेल्या काही हत्यांकडे आहे तर मग तुम्ही झापड लावून फक्त दाखवलं जातंय तेवढंच बघताय. आरोग्य/ रस्ते यावर मोदी सरकारने गेल्या ४.५ वर्षात बरंच काम केलं आहे. जरा गुगलून बघितलं तर कळेल (फक्त cache क्लिअर करा). मला या विषयावर अश्या विखारी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीशी चर्चा करण्यात काहीही रस नाही. माझ्या सरळ स्पष्ट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत हे या आधीही सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही चर्चा तर करत नाहीच. मी आधीपण म्हणालो आहे, देशात न्यायालये आहेत आणि कोणीही कायदा मोडला तर त्याला शिक्षा करण्यास ती समर्थ आहेत! अरे वा! याच न्यायालयांनी मोदींना निर्दोष सोडलंय तर राजमाता आणि राजपुत्र यांना ५००० कोटींच्या घोटाळ्यात बेल दिलाय. त्यामुळे पुढेमागे शिक्षा झालीच तर तुमचे हे बोल लक्षात असुद्या. लोकांनी कायदा हातात घेऊन "निवाडा" करण्याचा किंवा "धडा शिकवण्याचा" प्रयत्न कृपया कधीही करू नये... मी असं कुठेही म्हणलेलं नाहीये. दंगल होते तेव्हाची परिस्थिती आणि मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. जर तुमच्यावर कोणी हत्यार घेऊन धावून आला तर तुम्ही पोलिसांची वाट बघणार का प्रतिकार करणार? म्हणूनच मी विचारलं की तुम्ही दंगल कधी अनुभवली आहे का? त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. अभ्या - असल्या चिथावणीखोर प्रचाराचा निषेध करून संपादक मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतो, नका हो कुणा पक्षाचे अथवा विचारसरणीचे मुखपत्र बनवू देऊ मिपाचे. कसला प्रचार? कसली चिथावणी? उगाच अर्थाचा अनर्थ करू नये ही विनंती. माझे सर्व प्रतिसाद एकदा तटस्थपणे वाचावेत, तरी जर चूक वाटत असेल तर काय चूक ते स्पष्ट करावे. मी कुठल्याही पक्षाचे मुखपत्र चालवत नाही तसेच मी कुठल्याही एका विचारसरणीला बांधील नाही. मला जे योग्य वाटेल तेच मी बोलतो/ लिहितो. आता ते लिहायला पण बंदी आहे का? माझ्या विचारस्वातंत्र्यावर बंदी आणायचा प्रयत्न का करताय?

In reply to by ट्रेड मार्क

माझ्या प्रतिसादात मोदी, काँग्रेस, बीफ, राजमाता असल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या एकाच दिशेने जाणाऱ्या विचारांमुळे किंवा "दिव्य दृष्टीमुळेच" दिसले असावे कदाचित! कारण सामान्य वाचकाला किंवा खुद्द मलाही बरेच शोधून असे काही दिसायचे नाही. असो, तुमचे असले विचार जरा स्पष्टपणे दाखवून देणे इतकेच मला करायचे होते बाकी संपादक मंडळ बघून घेईल... वाढदिवसाच्या शुभेच्छा!

In reply to by शब्दबम्बाळ

तुम्हाला तुमचे प्रतिसाद स्पष्टपणे कळले किंवा मांडता आले तरी खूप झालं. हा विषयच काय पण माझ्या इतर विषयांवरच्या प्रतिसादांवर तुम्ही किंवा इथे कांगावा करणारे कोणी मुद्देसूद उत्तरं देऊ शकलेलं नाहीये. संपादक मंडळ बघून घेईल हे तुम्हाला आत्ता कळलं काय? आधी उगाच संपादक मंडळ इकडे बघा आणि तिकडे बघा म्हणून कशाला सांगत होतात? संपादक मंडळाला त्यांची जबाबदारी माहित आहे, त्यांना जर माझे प्रतिसाद आक्षेपार्ह वाटले तर उडवायला माझी काही हरकत नाही हे या आधीही मी स्पष्ट केलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुमचा जन्म कधी होणार आहे हे कळलंय का?

In reply to by ट्रेड मार्क

भिवंडीत मुस्लिम लोकांची लोकसंख्या किती प्रमाणात आहे हे बघा. १९९२ पूर्वी भिवंडीत दंगली झाल्या तेव्हा मुस्लिम लोकसंख्या प्रचंड होती का? काहीही लॉजिक लावताय. बाकी हे मॉडेल जर एवढा यशस्वी आहे तर बाकी ठिकाणी का लागू केलं नाही? तुमच्या विचारसरणी सारखे असतात प्रत्येक सरकारमध्ये ,हाच मोठा अडथळा असतो. जेव्हा राज्यसरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात कमी पडते तेव्हाच जातीय दंगली होतात. बाकी तुम्ही दंगल अनुभवली आहे का याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. तुमच्या ओळखितले किती निरपराध ह्यात मारले गेले? किंवा दंगलीत नेमके किती निरपराधांचे बळी गेले? नेमका धडा कोणाला शिकवला गेला? ह्यांचे उत्तर तुम्ही दिले नाही. तूम्ही तर कपडे संभाळणाऱ्यांपैकी दिसतात.

In reply to by मार्मिक गोडसे

माझे जवळचे किती लोक मारले गेले यात तुमचा भलताच इंटरेस्ट दिसतोय. मी आकडा सांगितला तर उद्या प्रूफ मागाल. मृत्यू प्रमाणपत्र दाखवलं तर याच दंगलीत मारले गेले हे सिद्ध करा म्हणाल. मूर्खपणाला आणि पुरोगामीत्वाला काही सीमा नसते म्हणतात. मूळ मुद्दा गुजराथ दंगलीचा आहे आणि त्यात दंगल कधी अनुभवली आहे का याची मला विचारणा झाल्यावर मी फक्त सांगितलं की माझा जन्म मुंबईचा असल्याने मी मुंबईच्या दंगली बघितल्या आहेत. अजून एक मुद्दा स्पष्ट करतो - माझा दंगलींना किंवा कुठल्याही मारहाणीला किंवा अतिरेकाला पाठिंबा नाही. तुमच्या विचारसरणी सारखे असतात प्रत्येक सरकारमध्ये ,हाच मोठा अडथळा असतो १९९२ नंतर किती काळ कुठल्या राज्यांमध्ये पुरोगामी (पक्षी: काँग्रेस आणि सहयोगी) सरकारे होती आणि किती राज्यांमध्ये प्रतिगामी (पक्षी: भाजप आणि सहयोगी) सरकारे होती हे जरा नीट तपासून बघा. फक्त महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर १९६० पासून थे १९९५ पर्यंत सलग (१९८० सालातील ११२ दिवसांची राष्ट्रपती राजवट सोडता) काँग्रेसचे राज्य होते. त्यानंतर १९९५ ते १९९९ शिवसेना+ आणि नंतर ऑक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २०१४ पर्यंत काँग्रेस+ चे सरकार होते. माझ्या सारखी विचारसरणी असलेले काँग्रेसमध्ये कोण आहेत हे स्पष्ट करावे. अजून एक म्हणजे या काळात महाराष्ट्रात किती दंगली आणि दहशतवादी हल्ले झाले हे बघावे. आता माझा मुद्दा परत एकदा स्पष्ट करतो - याच काळात गुजराथमध्ये कोणाची किती सरकारे होती बघा. १९९५-९६ मधला काळ वगळता आधी सगळी काँग्रेस+ ची सरकारे होती, नंतर मार्च १९९८ पासून सलग भाजपचे सरकार आहे. यात २००२ च्या दंगली नंतर एकतरी दंगल किंवा अतिरेकी हल्ला गुजराथ मध्ये झाला का? याचं कारण तुमच्या मते काय असावं? करताय थोडा विचार? सांगू शकाल कारण? दंगल करणाऱ्यांना धडा मिळाला का हेडमास्तर कडक असला की शाळेतली टगी पोरं गप्प बसतात त्यातला प्रकार असावा? का दोन्हीचा एकत्रित परिणाम असावा? तूम्ही तर कपडे संभाळणाऱ्यांपैकी दिसतात. तुम्ही तर नंतर व्हिडिओ बघून स्वतः अनुभव घेतला म्हणणाऱ्यातले दिसताय!

In reply to by ट्रेड मार्क

अजून एक मुद्दा स्पष्ट करतो - माझा दंगलींना किंवा मारहाणीला किंवा अतिरेकाला पाठिंबा नाही. गुड. मग धडा शिकविण्याच्या कोणत्या पद्धतीला तुमचा पाठिंबा आहे?किंवा गुजरातमध्ये कोणती पद्धत वापरली गेली होती?

In reply to by मार्मिक गोडसे

माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता तुम्ही माझ्या प्रतिसादातली निवडक वाक्य उचलून मलाच प्रतिप्रश्न करताय. याचा अर्थ असा की तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीयेत किंवा उत्तर देणे अवघड वाटत आहे. असो. मला असा प्रॉब्लेम नसल्याने मी नक्कीच उत्तर देऊ शकतो. मग धडा शिकविण्याच्या कोणत्या पद्धतीला तुमचा पाठिंबा आहे? मी स्वतःहून कोणाला उगाच त्रास द्यायला जात नाही. पण समोरचा त्रास देत असेल तर एकदा, दोनदा सांगून समजावून बघतो आणि तरीही नाहीच ऐकलं तर मग योग्य वेळ बघून असा धडा शिकवतो की परत माझ्या नादी लागणार नाही. धडा कोणता द्यायचा आणि कसा द्यायचा हे मला दिल्या गेलेल्या त्रासावरून आणि तत्कालीन परिस्थितीवरून मी ठरवतो. गुजरातमध्ये कोणती पद्धत वापरली गेली होती? २००२ दंगल हा पुरोगाम्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुले त्यावर बराच अभ्यास झाला असेल. तुम्ही सांगा बघू अशी कुठली पद्धत वापरली गेली की सर्वधर्मीय तिथे शांततेने राहू लागले? गुजराथमध्ये २००२ नंतर मोठी म्हणावी अशी एकही दंगल झाली नाही हे खरं आहे ना? मग आता तुम्ही हे कसं साध्य झालं असावं याच तुमचं आकलन सांगा टीप: मी मला वाटलेले कारण माझ्या प्रतिसादांमधून आधीच सांगितलेले आहे, ज्यावर तुम्ही आणि अजून १-२ जणांनी एवढा कांगावा केला. त्यामुळे परत तोच प्रश्न मला विचारू नये.

In reply to by ट्रेड मार्क

२००२ दंगल हा पुरोगाम्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुले त्यावर बराच अभ्यास झाला असेल. तुम्ही सांगा बघू अशी कुठली पद्धत वापरली गेली की सर्वधर्मीय तिथे शांततेने राहू लागले? पुरोगाम्यांचे जाऊद्या ,गुजरात दंगलीचा तुमचा अभ्यास जास्त दिसतोय. छातीठोकपणे गुजरातमध्ये ' धडा ' शिकवला इतकंच तुम्ही सांगताय. म्हणून नक्की काय धडा शिकवला ह्याबद्दल उत्सुकता आहे. गुळमुळीत बोलू नका, बिनधास्त बोला, कोणी काय कांगावा केला ह्याकडे दुर्लक्ष करा. कर नाही त्याला डर कशाला?

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क , इथं पण दुर्लक्ष करा !!! गोडसे भाऊ , पन्नास वेळा सांगून सुध्दा तेच तेच विचारले जात आहे . एव्हढी जर हौस आहे तर जा गुजरात मध्ये आणि विचारा ' त्या 'लोकांना काय धडा शिकवला ? कसा धडा शिकवला ? कुऱ्हाडीचा दांडा नका बनू राव ! तिकडे स्लीपर सेल वाले आतेरिकी लोकांना ब्लास्ट होई पर्यंत मस्त सांभाळतात . आज पर्यंत एक ही केस अशी नाही की मुस्लिम लोकांनी स्वतः पुढे येऊन सांगितलंय ' आमच्या वस्ती मध्ये अमुक एक व्यक्ती सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे किंवा आमच्या तरूणांची माथी भडकवत आहे ' . झालंय का कधी असं ? मग तुम्हाला का एव्हडा पुळका आलाय ? शीख हत्याकांड नंतर राजीव गांधींनी सुद्धा ' बडा पेंड गिरता है तो धरती हिलती है ' हा डायलॉग मारला होता तसं गुजरात मधील एकूण एक हिंदू तुम्हाला ' चांगला धडा शिकवला , त्यामुळे 2002 नंतर एक ही दंगल झाली नाही ' हेच ऐकवणार . मग तुम्ही त्या तमाम हिंदू लोकांना या विधानाचे स्पष्टीकरण मागू शकता का ?

In reply to by मार्मिक गोडसे

कसली गुळमुळीत उत्तरं देताय राव! मला जे सांगायचंय ते मी माझ्या प्रतिसादांमध्ये आधीच सांगितलंय. पण तुम्हाला काहीच उत्तर देता येत नाहीये त्यामुळे गोलगोल फिरणं चाललंय. ट्रम्प साहेब सांगत आहेत तसं जरा गुजराथमध्ये फिरून चर्चा करून घ्या. खरी परिस्थिती तुम्हाला तिथून कळेल, पुरोगामी वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेल बघून असंच गोलगोल फिराल. कोणी काय कांगावा केला ह्याकडे दुर्लक्ष करा. कर नाही त्याला डर कशाला? कोण सांगतंय? हाहाहा

In reply to by ट्रेड मार्क

मला जे सांगायचंय ते मी माझ्या प्रतिसादांमध्ये आधीच सांगितलंय तुमचा ' तो ' प्रतिसाद इथे डकवायला इतके आढेवेढे कशाला? उपाय इतका प्रभावी आहे तर का लपवत आहात?

In reply to by शब्दबम्बाळ

तथाकथित पुरोगाम्यांनी एक फुल जरी गोध्रा जळीतां साठी वाहिले असते तर त्यांचे पुरोगामीत्व जातिवादावर वरचढ ठरले असते . दंगली भडकण्यास काही अंशी पुरोगामी सुध्दा जबाबदार असतात . गोध्रा हत्याकांड झाले तेंव्हा पुरोगाम्यांना सर्वधर्म समभाव आठऊन गोल गोध्रा हल्लेखोरां बद्दल अवाक्षर न काढता उंदराच्या बिळात जाऊन बसले , त्यावेळी कुठल्याही पुरोगाम्यांनी गोध्रा जाळीत लोकां बद्दल आपुलकी दाखवून मुस्लिम लोकांचे कान उपटण्याची हिंमत दाखवली नाही . उलट गोध्रा केस कशी बनावट आहे या बद्दल कथा रचण्यात मशगुल झाले . शेवटी क्रिये ची प्रतिक्रिया उमटल्या नंतर तमाम भाजप कार्यकर्त्यांना नेत्यांना जातीयवादी ठरवून मोकळे झाले . पुरोगामी लोकांचा ही जी भेदभाव ठेवण्याची वृत्ती आहे तीच जातीयवादाला खतपाणी घालत आहे .

In reply to by ट्रम्प

" अशा लोकांनी प्रत्यक्ष दंगलीचा अनुभव घेतला तर चुकूनही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाहीत. " याचा अर्थ " 65 वर्ष काँग्रेस बरोबर काळ्या पैशाची फळे चाखणारे पुरोगामी चुकूनही काँग्रेस ला विरोध करणार नाही " असा ही होऊ शकतो . भाजप सरकारने म्हणूनच सगळ्या एन जी ओ नां ( फक्त पुरोगाम्यांच्याच असतात हे ही विशेष ) देणग्या बद्दल ऑडिट करायला सांगितले व ज्यांनी नाही केले त्यांची मान्यता रद्द केली .

In reply to by शब्दबम्बाळ

....तुमच्यासाठी तरी मी पुरोगामीच आहे आणि तुमच्यासारख्या विचारांच्या माणसांना विरोध करणारच आहे....
माणसांना विरोध करण्याबद्दलची समस्या माणसांना विरोध करुन सोडवणे रंजक असावे.

त्यांच्या वैयक्तीक आयुश्याशी आपल्याला काहि घेणंदेणं नसावं. राहिला त्यांचा धर्म. मग जानवी घालून वेगवेगळ्या मंदिरांना भेट देणारे लोक कोण हो? किंवा हिरवी टोपी घालून इफ्तार पार्टी ला जाणारे लोक कोण असतात? आणि त्यांनी आपली संपत्ती कशाला जाहीर करायला हवी आहे निवडणुकी पूर्वी ते सुद्धा शपथपत्र देऊन. ते सर्व बंद करा म्हणजे एका एकरात पाच कोटी रुपये उत्पन्न देणारी जगातील सर्वात फायद्याची शेती पण करायला लागणार नाही. एकदा तुम्ही खिडकीत बसलात कि लोक शुक शुक करणारच. लोकांनी शुकशुक करू नये हि अपेक्षा साफ चुक आहे. वर https://www.misalpav.com/comment/1010716#comment-1010716 लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल लोकांना काहीच म्हणायचे नाहीये. दांभिक सुडोसेक्युलर पेक्षा शुद्ध मुसलमान किंवा किरिस्ताव हा हिंदूंना जास्त जवळचा वाटतो.

In reply to by सुबोध खरे

लोकांनी शुकशुकच काच, अवघा हलकल्लोळ करावा... पण या सगळ्या खटाटोपाने आपल्या पदरी काय पडणार याचा विचार प्रथम करावा. सिस्टीम राबवणार्‍यांची कुवत आणि कर्म बाजुला ठेऊन नुसतं त्यांच्या कुंडल्याच बघतो म्हटलं तर ते लोकं हिरव्या टोप्या आणि जानवीच दाखवतील.

In reply to by अर्धवटराव

क्त समान न्याय इतरांनाही लावावा हे आमचं मागणं आहे. पण या सगळ्या खटाटोपाने आपल्या पदरी काय पडणार याचा विचार प्रथम करावा तटस्थ नजरे बघायला गेलं तर जे काही चांगले वाईट निर्णय त्या त्या वेळेला तत्कालीन नेत्यांनी घेतले त्याची चर्चा करून आपल्या पदरी फार काही पडणार नाही. पण काही निर्णय त्यावेळेला फार मोठी उलथापालथ करणारे तर काही दूरगामी परिणाम करणारे असतात. जसे की आणीबाणी हा त्यावेळेला फार मोठी उलथापालथ करणारा निर्णय होता. दुसरा म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार ज्याची परिणीती शिखांची नाराजी ओढवून घेण्यात झाली . जर नेहरू-गांधी परिवाराची लीगसी फक्त कर्तृत्वाच्या बाजूने बघायची झाली आणि फाळणीच्या काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला प्रगतीपथावर नेण्याचे श्रेय जर त्यांना दिले जात असेल तर फाळणीच्या वेळेला परिस्थिती नीट न हाताळणे, हिंदूंची झालेली फरफट, काश्मीर प्रश्न, चीनची घुसखोरी, अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन, हिंदूंना देण्यात आलेली दुय्यम वागणूक, बांगलादेशचा सीमाप्रश्न नीट न हाताळणे, लायसन्सराज आणून लाचखोरीची कुरणे तयार करणे, एकूण भ्रष्टाचाराला पाठिंबा मिळेल अशी इकोसिस्टिम तयार करणे, उत्तरपूर्व राज्यांकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष (ज्यामुळे तिथे सीमाप्रश्न निर्माण झाले) ईई. अशी बरीच यादी लांबवता येईल. दुसऱ्या बाजूने विचार करता, हे सगळं होऊन गेलं, ज्याचे परिणाम जनतेने भोगले किंवा भोगत आहेत. पण मग पुढील नेत्यांची निवड करताना तरी काळजी घ्यायला पाहिजे ना? ज्याच्या हातात आपण सिस्टिम द्यायला बघतोय त्याची कुवत आणि आत्तापर्यंतची कर्म काय आहेत? केवळ गांधी परिवारात जन्मला म्हणून ज्याला पंतप्रधान बनवण्यासाठी सगळे काँग्रेसी कष्ट करत आहेत त्या राहुल गांधींची कुवत काय आहे? आतापर्यंत एक संसद सदस्य म्हणून किंवा अगदी काँग्रेस उपाध्यक्ष/ अध्यक्ष म्हणून त्याची कर्म काय आहेत? ज्या अमेठीने पूर्वापार गांधी परिवाराला निवडून दिलं त्या अमेठीची परिस्थिती काय आहे? आपल्या मतदारसंघाला जे इतक्या वर्षात सुधारू शकले नाहीत ते देश काय सुधारणार हा प्रश्न गैरवाजवी आहे का?

In reply to by ट्रेड मार्क

युवराजांच्या पुर्वजांची कर्मं बघितली तर देशाचा थोडाफार हालहवाल कळेल. त्यांची बायोग्राफी बघितली तर मनोरंजनाचा मसाला मिळेल. त्याचा उपयोग आपला आपण ठरवायचा. असो.

25 Sep 2018 - 11:02 pm | अभ्या.. असल्या चिथावणीखोर प्रचाराचा निषेध करून संपादक मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतो, नका हो कुणा पक्षाचे अथवा विचारसरणीचे मुखपत्र बनवू देऊ मिपाचे. -- मला या माणसाची कमाल वाटते. इतरांनी शिवसेना व त्या पक्षाच्या नेत्यांविरोधात काही जरी मिपावर लिहिले तर हा माणूस त्या प्रतिसादाचा/प्रतिसादकर्त्याचा, प्रतिकार हिरहिरिने करतो मात्र इतरांनी असेच काही केले/लिहिले तर तो माणूस मात्र एकाद्या पक्षाचा भक्त, प्रचार/प्रसार करणारा ठरतो ? -- या असल्या लोकांमुळे राजकिय विषयांवर अभ्यासू लिहिणारे, अनेक लेखक मिपापासून दूर झाले.

In reply to by प्रसाद_१९८२

कमाल तर आहेच, पन गंमत काय आहे ना की जितके शिवसेना विषयावर प्रतिसाद दिलेत त्याच्यपेक्षा कितीतरी जास्त लेखन कथा आणि इतर विषयावर लिहिले आहे. फक्त राजकारण आणि त्यातल्या त्यात विशिष्ट पक्षाला वाहून घेन्यासाठी आयडी नाही माझा. मुंबई पुण्याच्या शिवसेनेपेक्षा माझ्या भागातले शिवसेनेचे मला दिसलेले काम वेगळे आहे आणि फक्त तेच नोंदवलेले आहे. तेही धागे वगैरे न काढता. विरोध झाला की त्याला कुठल्यातरी पक्षाचे नाहीतर करंट फॅशननुसार देशभावनेचे लेबल लावायची पद्धत तुमची तुम्हाला लखलाभ. बादवे जरा ते अभ्यासू लिहिणारे कोण आयडी दूर गेले ते कळले तर बरे होईल. त्यांना प्रत्यक्ष विचारता तरी येईल माझा काय त्रास झाला ते.

राग मानू नका !!! पण खास करून जयंत कुलकर्णी साहेब कुठल्याही राजकीय वादात न पडता ध्रुव ताऱ्यासारखे मिपावर अढळ आहेत , व आपल्या नवनवीन लेखा द्वारे सर्वांच्या ज्ञानात भर घालत आहेत . त्या प्रमाणे राजकारण सोडून इतर विषयावर लिहणार्यांनी स्वतः ला राजकीय विषयावर प्रतिसाद देताना मर्यादा घालून घेतल्या म्हणजे ते अचानक ट्रोल न होता आदरणीय स्थानावर विराजमान होतील .

In reply to by ट्रम्प

वोव ट्रम्पतात्या, एकच नंबर. राग आज्याबात नाय. माझी खूप इच्छा आहे ध्रुव ताऱ्या प्रमाणे मिपावर अढळस्थानी विराजमान होण्याची. जयंतकाका त्यांच्या सकस लिखाणाने झाले आहेत त्यांच्याबद्दल आदर आहेच पण ते राजकारणावर काही मत नोंदवत नाहीत म्हणून त्यांना अढळस्थान मिळाले आहे हे माहीत नव्हते. येनिवे तुमचा फंडा आवडला आहे फक्त थोड्या शंका आहेत. म्हणजे इतर विषयावर लिखाण करायचं पण राजकारणावर गप्प बसायचं, असा की, इतर विषयावर लिहून राजकारणात फक्त मोदिसमर्थनार्थ लिहायचे, की इतर काहीही लिहा पण मोदींविरोधात काही लिहू नका. म्हणजे तुम्ही म्हणताहात त्या लेखनाच्या मर्यादा स्पष्ट कळल्या म्हणजे त्या फॉलो करून लवकरात लवकर अढळस्थानी विराजमान व्हावे म्हणतो. जरा लवकर सांगितले तर बरे.

In reply to by अभ्या..

ख्या !! ख्या !!! डोळे पाणावले बघा आमचे ! मिपावर असं आमच्या बद्दल आदरयुक्त शब्द येत नाही वो कधी, तुम्हाला चार गोष्टी सांगायला मला ज्ञान असते तर मी सुद्धा लेखांचा रतीब लावला नसता का ? मिपावर कथा , कविता , इतिहास वरील लेखन किंवा पर्यटन अश्या विषयावर लिहून मिपाला समृध्द करणारे आयडी कमी झाले आहेत अस वाटतंय . मग जे काही सेनापती शिल्लक आहेत ते आमच्या सारख्या क्षुल्लक सैनिकांच्या हल्ल्याला बळी पडून मिपावर येण्याचे टाळतात , म्हणून जयंत काका प्रमाणे ' आपुला मार्ग वेगळा ' ध्येया प्रमाणे वाटचाल ठेवली तर ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहून वेळप्रसंगी इतरांना मार्ग दाखवताल . सध्या मिपावर मोदींभक्ता चे पीक जोरात आहे , पाऊस वेळेवर नाही पडला तर ते पीक / गवत वाळून जाणार आहेच . ते गवत कापण्या साठी तुमच्या सारख्या धुरंधर सेनानी तलवार घेऊन उतरू नये असं या गरीबाला वाटले , एव्हढच .

देशाविरुद्द कारस्थान करुन देशाअंतर्गत दुफळी माजवुन देशाला कमकुवत करण्याच काम करणार्या पाच अर्बन नक्षल लोकांविरुद्द सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज आलेला आहे. गेल्या महीन्यात देश भरातुन पाच लोकांच्या धर पकडीवर सर्वोच्च न्यायालयात रोमिला थापर व ईतर चार लोकांनी (अर्बन नक्षल) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. ह्या याचिकेची सुनावणी करता अर्बन नक्षल गँग कडुन प्रशांत भुषण नावाचा अजुन एक अर्बन नक्षल कंबर कसुन काम करत होता. आज आलेल्या निकाला मुळे ह्या अर्बन नक्षल गँग चे तोंड पडलेले आहे. पण ह्या अर्बन नक्षल गँग कडुन देशाला किती मोठा धोका आहे हे अजुन प्रकर्शाने समोर आलेले आहे.

Elgar Parishad Probe: पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री फडणवीस नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई करत केलेल्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील असा विश्वास व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पुणे पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिलं जात असेल तर आपण कोणाला समर्थन देत आहोत याचा विचार केला गेला पाहिजे असंही मुख्यमंत्री बोलले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे देशाच्या विरोधातील कट, वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करुन, अंतर्गत वाद निरमाण व्हावा हा प्रयत्न उघड होत आहे असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे गजाआड जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुणे पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हा वादाचा विषय असू शकतो. त्यावेळी अनेकजण ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप करत असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले होते. मात्र यामुळे देशाविरोधात कट रचला गेला हा मुद्दा दुर्लक्षित करु शकत नाही’. न्यायालयाने काय निर्णय दिला ? सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यासोबतच पाचही जणांच्या स्थानबद्धतेत चार आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने पाचही जणांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित नसल्याचं सांगताना पोलिसांकडून बळाचा वापर झाला नसल्याचं स्पष्ट केलं. सोबतच आरोपी कोणत्या तपास संस्थेने तपास केला पाहिजे याची निवड करु शकत नसल्याचं सांगत एसआयटीन नेमण्यास नकार दिला. आरोपी कनिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाने या पाच जणांविरुद्ध

सकृत दर्शनी पुरावा आहे

असे स्पष्ट म्हटले आहे. (म्हणूनच याना जामिनावर सोडण्यास किंवा विशेष तपास आयोग नेमण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.) म्हणजेच यांची अटक हि राजकीय हेतूंनी प्रेरित नाही हे स्पष्ट होते. शिवाय त्यांना खालच्या कोर्टाने जामीनावर न सोडता अटकेत टाकले तर न्यायालये पक्षपाती आहेत किंवा सरकार न्यायालयावर दबाव टाकत आहे असा आरोप करणे पुरोगामी लोकांना कठीण जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने पण जरा बिचकत बिचकत च निर्णय दिला आहे की , स्थानबद्धतेत वाढ करून . सरळ पोलीस कोठडी द्यायला हवी होती .

सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत (original) न्यायसन नाही तर आव्हान देण्याचे न्यायासन(appelate) आहे. म्हणजेच सामान्य फौजदारी खटला थेट सर्वोच्च न्यायालयात नेता येत नाही. मूलभूत हक्कांचा प्रश्न असेल तर (भारतीय घटना कलम ३२) त्यात सर्वोच्च न्यायालय लक्ष घालू शकते. अगदी रीट अर्ज सुद्धा ऐकण्याचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार नाही तर तो उच्च न्यायालयाला आहे.(भारतीय घटना कलम २२६) त्यामुळे त्यांनी जामीन हवा असेल तर खालच्या कोर्टात जा असेच याचिका कर्त्यांना सांगितले आहे तसेच सरकारला सुद्धा जर पोलीस/न्यायालयीन कोठडी हवी असेल तर परत खालच्या कोर्टातच जावे लागेल.

ह्या सर्वोच्च कोर्टाच्या निकालानंतर अर्बन नक्षल ईंदिरा जयसींग नावाच्या वकिलांने सरळ सरळ चीफ जस्टिस श्री दिपक मिश्रायांच्या वरच टिकास्त्र सोडल आहे. अर्बन नक्षल आता हताश होत आहेत हेच आता पुढे येत आहे . खरोखरच देश द्रोही लोक आहेत ही अर्बन नक्षल गँग !