Skip to main content

बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 13/12/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे. भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू. या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत. १. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल. २. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू. ३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू. म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे. याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच. या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते. अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत. मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की. बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे. माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?

वाचने 116564
प्रतिक्रिया 254

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

मुम्बै अहमदाबाद ए सी स्लीपर बसने १५०० रु लागतात. विमानाने गेल्याच आठवड्यात १८०० रुत आलो. बुकिंग १५ दिवस आधी केले होते. लगेज ७ किलो. सँडविच पेप्सीचे २५० अलग.

In reply to by रॉजरमूर

मुंबई मेट्रो १० रुपये तिकीट हे "सुरुवातीचे" दर आहेत असे स्पष्ट म्हटले होते. इतके कमी दर असतील हि अपेक्षा करणेच चुकीचे आहे घाटकोपर ते अंधेरी बसचेच तिकीट २५ रुपये आहे.टिनपाट रिक्षावाला सुद्धा आत बसण्याचे १८ रुपये घेतो तर मेट्रो ने वातानुकुलीत प्रवास करण्यासाठी दहा रुपये अपेक्षा करणे हि चूकच गोष्ट आह. दर वाजवी असावेत. उगाच सवंग लोकप्रियतेच्या नादाला लागणे चूकच आहे.

In reply to by अभिजित - १

या अहवालानुसार रेल्वेला बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला किमान ८८ हजार प्रवासी वाहून न्यावे लागतील अथवा बुलेट ट्रेनने दिवसाला १०० फेऱ्या मारल्या पाहिजेत. ‘डेडिकेटेड हायस्पीड रेल्वे नेटवर्कस इन इंडिया: इश्यूज इन डेव्हलपमेंट’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ही बातमी दिल्याबद्दल धन्यवाद. प्राध्यापक रघुराम यांनी नक्की कोणती गृहितके आधारभूत धरली आहेत हे तो अहवाल वाचल्यावरच समजेल. रघुराम हे पायाभूत क्षेत्रातले मान्यवर आहेत. किंबहुना या लेखासाठी मी पाकिटाच्या मागे आकडेमोड केली (back of the envelope) त्याची प्रेरणा रघुराम यांच्याच क्लासमधून होती. बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला १०० बुलेट ट्रेन सोडाव्या लागतील हे याच चर्चेतील एका प्रतिसादात म्हटले होते :) तेव्हा I am feeling vindicated :) इकॉनॉमिक टाईम्समधील बातमीनुसार रघुराम यांनी externalities चा उल्लेख केला आहे. त्याविषयी या अहवालात काही लिहिले आहे का हे तपासून बघायला हवे. मला वाटते की या externalities चा अजिबात उल्लेख नसेल तर तो अहवाल अपूर्णच असेल.

वरती बुलेट ट्रेन यशस्वी (अर्थदृष्ट्या) करायला दिवसाच्या 100 फेऱ्या की 88,000 प्रवासी हे आकड़े दिले आहेत ते पाहून मला एक अजुन प्रश्न पडला आहे , तो म्हणजे फीडर सर्विसेजचा एक शक्यता म्हणून जर आपण दिवसाला किमान 88,000 प्रवासी प्रवास करतील हे ग्राह्य धरले तरी त्या सकल 88,000 कस्टमर्स ना बीकेसी मधे बुलेट ट्रेन स्टेशन पर्यंत पोचण्यात जी काही सोय/गैरसोय होईल तो एक महत्वाचा डीसाइडिंग फॅक्टर असेल असे वाटते. प्रचंड आकार अन वस्तुमान असलेल्या उदाहरण म्हणून पाहता येण्यालायक प्रकल्प म्हणजे DMRC उर्फ़ दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन हा होय , दिल्ली मेट्रो सक्सेसफुल आहे कारण त्यांनी फीडर बसेस वर सुद्धा लक्ष दिले होते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा ह्या बाबतीत काही रोड मॅप आहे का?? अहमदाबाद बद्दल तर काही कल्पना नाही पण मुंबई मधे ट्रॅफिक जॅम म्हणजे ताप असतो.

In reply to by नाना स्कॉच

नानासाहेब Thane handles as many as 6.54 lakh passengers daily. Every day, more than 1,000 trains pass through Thane, which has 10 platforms catering to two corridors each for the fast and slow tracks and the Trans-harbour network. As many as 55-60 long distance trains halt at the station. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Thane-is-busiest-railway… या तुलनेत ८८ हजार म्हणजे फार नाही असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

From a modest beginning as a two-platform terminus about two decades ago, LTT (also known as Kurla Terminus) quickly leapfrogged Dadar and Bandra as one of the busiest railway stations on the Central Railway. Lack of space – on an average 80,000 commuters use the station daily हि २०१२ ची स्थिती आहे. म्हणजे आज त्यात नक्कीच बरीच वाढ झालेली असेल. तेंव्हा प्रवासी संख्या ८८००० काही फार जास्त वाटत नाही. http://epaper.timesofindia.com/Default/Scripting/ArticleWin.asp?From=Ar…

In reply to by सुबोध खरे

ते बुलेट ट्रेन स्टेशनबद्द्ळ बोलत नाही आहेत. जवळच्या कुर्ला घाटकोपर सांताक्रुज स्टेशनातुन बीकेसीत असलेल्या बुलेट ट्रेन स्टेशनात रोज लाखभर लोक रिक्षा ट्याक्सी कार बस यातून जाणार. ते त्या ट्राफिकबद्दल बोलत आहेत.

सरजी मी मेन स्टेशन हैंडलिंग कैपेसिटी किंवा इंफ्रा बद्दल बोलत नाहीये तर फीडर सर्विसेज बद्दल बोलतोय. If u know what I mean sir. :)

अर्धवटराव ५ वर्षांनी बी.एम.डब्ल्यु अफोर्‍ड करेल कि नाहि याचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा त्याने ५ वर्षाने बी.एम.डब्ल्यु घ्यावीच याचे प्लान करावे. चटणी-भाकरीचं गावजेवण देण्याची सोय होतपर्यंत वाट बघण्याऐवजी २ वर्षाने लाडुजिलबीची पंगत कशी बसेल याचं प्लॅनींग करावं. १५ वर्षांत चीन आखाती देशातला कदाचीत सर्वात मोठा तेल आयातदार असेल. दक्षीण चीन समुद्रात ड्रॅगनने दात खुपसले असतील. त्याच्याच शक्तीवर पाकिस्तान पुष्ट झाला असेल. आज बलवान असणारे देश अधिक बलवान झाले असतील. अशावेळी भारताने १ लाख कोटींच्या कर्जाची काळजी करावी हे फारच दयनीय असेल. १५ वर्षानंतर एक बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती म्हणुन पस्तावा करण्याऐवजी अगोदरच अशा १० बुलेटट्रेन का सुरु केल्या नाहित याचा पस्तावा व्हावा, अशी परिस्थिती निर्माण करावी भारताने. आपण हे मेण्टेनन्स मोड ची मेण्टॅलिटी सोडुन डेव्हलपमेण्ट मोड चं धाडस जितक्या लवकर अंगी बाणवु तेव्हढं चांगलं. तसं करायचं नसल्यास हा लोकशाहीतुन समाजहीत वगैरे फार्स बंद करुन रहुल गांधी वा तत्सम नेत्याच्या हाती कम्युनिस्टांच्या टेकुवर उभी केलेली सत्ता द्यावी व जनतेने चारा खायला मोकळं व्हावं.

In reply to by अर्धवटराव

वेगवान सेवांचं जाळं हवेच आहे. पण बु ट्रे पेक्षा विमानं परवडतील. ... नेहरु गांधींच्यामुळे आमचा देश समर्थ बनुन तुम्ही आम्ही दिवसभर राबुन हफिसात चटणीभाकर खातो व रविवारी घरच्यांबरोबर लाडुजिलेबी खातो.

In reply to by mugdhagode

अंत्योदय योजनेअंतर्गत पशुपालनाकरता सरकारी अनुदानं देऊन घोडागाडीने प्रवास करणे सर्वात किफायतशीर उपाय आहे. उगाच विमानांचा खर्च करु नये. चटणी भाकर देऊन हाफीसात राबवलं जाणं हे देखील गुलामीचं प्रतीक आहे. कल्याणकारी राज्यात हे चालणार नाहि. गांधी नेहरुंना हलवाई बनवुन मिठाई विकायला लावणार्‍या मानसीकतेचा तीव्र निषेध.

In reply to by अर्धवटराव

भाजप्याच्या लोकानी घोड्याचे पाय मोडले तर लोकांची पंचाइत होइल. विमानेच बरी. वैदिक विमानसुद्धा चालेल.

In reply to by mugdhagode

तुम्ही कशाला काळजी करताय कुणाचा पाय मोडण्याची? आणि वैदीक विमानांना देखील जपानी अर्थसहाय्यने मेक इन इंडीयाअंतर्गत डेव्हलप करायचा प्रोग्राम आहे युपीए सरकारचा.

In reply to by अर्धवटराव

+१. हा धागा पहिल्यांदा वाचल्यावर असच काही वाटलं होतं. पण शब्दात मांडता येत नव्हते. हा तर पायलट प्रोजेक्ट असेल. पुढे पूर्ण देशभरात बुलेट ट्रेनचं जाळे होईल २०५०-६० पर्यंत.

In reply to by अर्धवटराव

चीन / अमेरिका या लोकांशी बरोबरी करण्याची दिवास्वप्ने उगाच बघू नका. जर का काही natural calamity येउन हे देश खाली गेले तरच आपण बरोबरी करू शकतो. नाहीतर नाही. बाबू शाही / नोकरदार वर्गाचा भ्रष्टाचार / सर्वसामान्य भारतीय लोक - मला काय त्याचे mentality / सरकारी अधिकारी आणि नेते यांचा काहीही निर्णय न घेण्याचा स्वभाव . चीन मधल्या अति सामान्य माणसाचे पण देशावर अफाट प्रेम असते. आहे का भारतीय लोकांचे असे ? तुम्हीच विचार करा.

In reply to by अभिजित - १

मग काय. आहेच तर? फक्त भारतीय मुस्लिमांचे देशावर प्रेम नाही, तेवढे सोडून प्रत्येक नागरिकाचे देशावर अखंड प्रेम आहे.

In reply to by अभिजित - १

प्रत्येक प्रगत देश हे सगळं पचवुनच पुढे गेला आहे. त्यात काहि नवीन नाहि. शिवाय, भारताला कोणाची बरोबरी वगैरे करण्याचं कारण नाहि. आपलं हीत साधावं बस. आणि भारतीयांचे भारतावर प्रेम आहेच. गरज प्रेमाची नाहि तर भारताची काळजी घेण्याची आहे.

In reply to by अर्धवटराव

इतर देशांना ते प्रश्न सोडवायची इच्छा होती म्हणून ते सुटले . अशीच जादूची कोणती तरी कांडी फिरवून नाही. आपल्या देशाला ( थोडक्यात राज्य कर्ते ) करप्शन , बाबूशाही , लोकांवर होत असलेले अन्याय .. कोणताही प्रश्न सोडवायची इच्छा अजिबात नाही हे 100 टक्के सत्य .. अजून 100 वर्षांनी पण हे प्रश्न असेच असणार आहेत. ज्यांना या प्रश्न पासून मुक्तता हवी असेल , त्यांनी देश सोडून जाणे हाच एकमेव पर्याय आहे. आता जर का " यदा यदा हि धर्मस्य ..." झाले तर आणि फक्त तरच हा प्रश्न सुटेल नाहीतर कदापि नाही .. चीनमधील केएफसी, ऍपल आऊटलेट्‌सवर हल्ला... गुरुवार, 21 जुलै 2016 - 02:25 PM IST Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=WA5R9T बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन चीनच्या फीलिपीन्स व इतर देशांशी असलेल्या वादचा फटका केफसी व ऍपल यांसारख्या कंपन्यांच्या चीनमधील शाखांस बसला आहे! "चिनी जनता विशेषत: चिनी तरुण अत्यंत राष्ट्रभक्त व राष्ट्रवादी आहेत. केएफसी व ऍपल यांचा अमेरिकेशी अर्थातच घनिष्ठ संबंध आहे. तेव्हा येथील जनसमूहाच्या आवाक्‍यात असलेल्या केएएफसी व ऍपल आऊटलेट्‌सविरोधात हे तरुण हिंसक आंदोलन करत आहेत,‘‘ असे चीनमधील एका संशोधन कंपनीत कार्यरत असलेल्या जेम्स रॉय यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले. साऊथ चायना सी प्रश्न बहुतेक मिपा कर लोकांना माहित असेलच !! कुठलातरी बादरायण संबंध लावून चीन प्रचंड मोठा एरिया खायला बघतोय. परत apple आणि KFC यांचा काय इथे संबंध ? त्याच्या वरून हि चिनी जनता इतकी पेटली आहे. नाहीतर भारताच्या बुडाखाली चिक्कार वेळा आगी लावून पण पाकिस्तान ची चाटायला इथले खूप लोक कायम पुढे. असो .. पण हो .. भारतीय सैनिक नेहमीच लढाऊ असतात आणि बलिदान द्यायला मागे पुढे बघत नाहीत हे नक्की.

In reply to by अभिजित - १

ज्यांना या प्रश्न पासून मुक्तता हवी असेल , त्यांनी देश सोडून जाणे हाच एकमेव पर्याय आहे.
शुभस्य शीघ्रम्. लवकर निघा. सावकाश जा. सुरक्षित पोहचा.

In reply to by अभिजित - १

असला प्रकार राष्ट्रवाद नव्हे तर भिकारचोटपणा आहे. अमेरिकेने कुरापत काढली (असेल तर) असताना, अमेरिकेशी टक्कर घ्यायला जीएमडी नाही. म्हणून अमेरिकन दुकानांवर हल्ले करणे, हा राष्ट्रवाद असूच शकत नाही.

In reply to by तुषार काळभोर

जीएमडी कोनात नाही ते दिसतेच आहे. CHina is doing Naval exercises. ALso they are talking about closing Air traffic also ...

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bullet-train-loan-state-… finance department led by BJP leader Sudhir Mungantiwar has raised objections over the state acting as guarantor for the loan of Rs 79,087 crore being secured from the Japan International Cooperation Agency (JICA) at a nominal interest rate of 0.1%. हि ट्रेन आहे गुजरात करता. आणि त्याची कर्जाची धोंड महाराष्ट्र च्या गळ्यात. एकाच दगडात मोदी सरकार बरेच पक्षी मारत आहे. उद्या गुजरात ने हात वर केले कि आपणच हे लोन भरणार. महाराष्ट्र सरकार करवाढ करणार आणि आपण ती भरणार. कोणाकरता ? इथल्या गुज्जू बेपारी लोकांना गुजरात मंडी बिजनेस करता यावा, आणि तो पण मुंबईत मज्जानु लाईफ जगत या करता !! आणि या xxx गिरीला खूप मराठी लोकांचा पाठिंबा. अगदी उच्च शिक्षित पण .. कमाल वाटते. अर्थात मराठी लोकांना आपली मारून घ्यायची आवड आहेच. ( कोणाला संशय असेल तर एक नवीन धागा उघडा याच्यावर. तिकडे बोलतो मी .. आणि इतर पण बोलतीलच. )

http://www.loksatta.com/mumbai-news/high-speed-bullet-train-project-cos… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत वाढली असून ती आता एक लाख १० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या २५ टक्के वाटय़ातही वाढ होणार असून भविष्यातही आणखी किंमतवाढ होण्याची चिन्हे आहेत. काम सुरु होण्या पूर्वीच किंमत वाढतेय .. हा सगळं प्रकार २/३ लाख कोटी पर्यंत आरामात जाईल आणि महाराष्ट्राची पार धुवून निघेल.

In reply to by अभिजित - १

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत वाढली असून ती आता एक लाख १० हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
अशाप्रकारच्या प्रकल्पांमध्ये 'कॉस्ट ओव्हररन' होणे ही अगदी नेहमीची गोष्ट आहे. असे व्हायची शक्यता आहे याविषयी याच चर्चेतील या प्रतिसादात लिहिले होते. अजून या प्रकल्पाला सुरवातही झालेली नाही तरीही अशाप्रकारचे 'कॉस्ट ओव्हररन' होणार असा अंदाज आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यावर अजूनही अशाप्रकारे आकडे वाढू शकतील. बँका प्रकल्पांना पैसे कर्जाऊ देतात तेव्हा अशाप्रकारे खर्च वाढला तर वरच्या पैशाची तरतूद संबंधित प्रकल्प बांधणार्‍या कंपनीने करायची असते असे कलम नेहमी असते. अशीच अट त्या जपानी एजन्सीने टाकली तर नवल वाटू नये. म्हणजे वाढलेल्या खर्चाचा बोजा शेवटी सरकारवर म्हणजेच करदात्यांवर येणार आहे. बुलेट ट्रेन कधीतरी यावी असे मलाही वाटते पण त्यापूर्वी सगळ्या देशातील रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रूळांचे चौपदीकरण, रूळ १५० पेक्षा जास्त वेगाने गाड्या वाहून नेतील इतके सक्षम बनविणे इत्यादी कामे आधी व्हावीत असे वाटते. पेकिंग ऑर्डरमध्ये त्यापेक्षा अधिक महत्वाचे इतर प्रकल्प आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, तुमच्याशी याबाबतीत सहमत आहे. बुट्रे हा भयंकर खर्चिक प्रकार आहे. शिवाय मुंबई ते कर्णावती (सुमारे ५०० किमी) पेक्षा दूर जायचं झाल्यास विमान अधिक सोयीस्कर पडतं. म्हणजे मुंबई-दिल्ली बुट्रे आतबट्ट्याचा व्यवहार ठरू शकतो. जर पुढे कर्णावती ते दिल्ली बुट्रे मार्ग बांधण्याच्या खर्चात मुंबई ते दिल्ली चौपदरी लोहमार्ग व्यवस्थितपणे बांधता येईल ते वेगळंच. आ.न., -गा.पै.

बुलेट ट्रेनचा मार्ग हा एक कुठेही जोडला न गेलेला असा वेगळाच कॉरिडॉर असणार आहे. स्थानके अगदी कमी आणि वेगळी असणार आहेत. सध्याच्या पश्चिम रेल वे च्या स्थानकांपर्यंत प्रवाश्यांना पोचवणारे फीडर रूट्स बुलेट ट्रेनसाठी अर्थातच उपयोगी पडणार नाहीत. दुसर्‍या बाजूने, स्थानकांची संख्या कमी असल्याने रस्त्यांचे जाळे वगैरे बांधावे लागणार नाही. तरीही स्थानके एकमेकांपासून दूर अंतरावर असल्यामुळे ठाण्यापलीकडील लोकांचा स्थानके गाठण्याचा वेळ बराच वाढेल. मुंबईत ठाण्यापासून किंवा बीकेसीपासून अंतर्गत प्रवासासाठी रोड किवा रेल कनेक्टिविटी आवश्यक असेल. सध्या दोन्ही मुख्य महामार्ग ओसंडून वाहात असतात. विशेषतः पश्चिम महामार्ग. या महामार्गाची एक लेन मेट्रो प्रकल्पासाठी वापरली जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावरसुद्धा ती मोकळी होईल असे नाही. कुर्ला टर्मिनसला पोचताना अतिशय त्रास होतो. मुंबईत विकासकामासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न अतिशयच तीव्र आहे. शिवाय या रेल मार्गावर अपेक्षित वापरकर्ते दर अर्ध्या तासाने मिळायलाच हवेत. नाही तर अर्थकारण कोलमडेल. सध्या प्रवाश्यांचा कल पाहाता कामानिमित्त प्रवास करणारे लोक दोन्ही टोकांकडून कामाच्या ठिकाणी सकाळी पोचून रात्री घरी परतणे पसंत करतात. या वेळेत ऑक्यूपन्सी जास्तीत जास्त असते. नवीन प्रकल्प होऊ नयेत असे अजिबातच नाही. फक्त खर्चाच्या प्रमाणात ते जास्तीत जास्त लोकाभिमुख असावेत इतकीच अपेक्षा. जाता जाता : फक्त मुंबईपुरते पाहाता ठाणे -पनवेल रेल मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत वाढवणे, ईस्टर्न फ्री वे, सान्ता क्रुझ चेंबूर जोड रस्ता, जोगेश्वरी-विखरोळी जोड रस्ता हे प्रकल्प लोकाभिमुख होते/आहेत. ठाणे/दिवा पश्चिम उपनगरांशी थेट जोडणे हाही एक अधिकाधिक लोकोपयोगी प्रकल्प ठरू शकेल.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/japan-company-stops-… 'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा; तरच बुलेट ट्रेनला निधी देऊ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला मोठा झटका बसला आहे. बुलेट ट्रेनला आर्थिक रसद पुरवणाऱ्या जपानच्या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जिका)ने बुलेट ट्रेनसाठी निधी पुरवठा करणे थांबवले आहे. भारत सरकारने आधी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात मगच आर्थिक मदत देऊ, असं या कंपनीने मोदी सरकारला ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/jica-has-stopped-funding-to-b… आत्तापर्यंत 125 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जमिनी देताना विरोध करताना गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तसेच जायकालाही कळवलं की हा प्रकल्प राबवताना सरकारनं सामाजिक तसेच पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य ती काळजी घेतलेली नाही. जोपर्यंत मार्गदर्शक तत्वांची अमलबजावणी होत नाही तोपर्यंत सरकारला या प्रकल्पासाठी निधी देऊ नये अशी विनंती शेतकऱ्यांनी जायकाकडे केली. जायकानं याची दखल घेत निधी थांबवल्यामुळे या प्रकल्पाच्या आड चांगलेच विघ्न उभे राहिल्याचे दिसत आहे. ---------------------------------------------------- १२५ कोटी ? थोडक्यात वाचलो !! हा प्रोजेक्ट काही आता सुरु होत नाही. आणि या इन्व्हेस्टमेंट बँक ना राजकीय समज पण जास्त / काळाच्या पुढची असते. बहुतेक त्यांना पण कळून चुकलंय भविष्य !! चला भारतीय जनता वाच्चली एक कर्ज डोंगरातून. आणि आपण मराठी लोक तर जास्तच. कारण महाराष्ट्राच्या गळ्यात मारला होता हा प्रकल्प. अर्थात भक्त वेडे होतील. आपली का मारली गेली नाहीए म्हणुन . त्यांना रडू द्या !!

In reply to by अभिजित - १

पण कुणी कानाखाली वाजवलं तरी गालावर लाली थोपण्याचा खर्च वाचला म्हणुन आनंद मिरवणार्‍या अभिजनांना कसला अभिमान आहे हे एक कोडे आहे.

In reply to by अभिजित - १

माणूस त्याच्या वागण्या बोलण्यावरून, इथे लिहिण्यावरून समजतो कसा आहे ते. त्यांचे रिप्लाय खूप mature असतात आणि तुमचे उथळ. तुमचे मेसेज बघून तुम्ही तर मिपाचे राहुल गांधी वाटता.

In reply to by अर्धवटराव

+१००

In reply to by अभिजित - १

भारतातील रखडलेले ५ मोठे प्रकल्प! 1) Delhi-Mumbai Industrial Corridor 2) Navi Mumbai International Airport 3) Nariyara coal-based power plant project 4) Polavaram irrigation project 5) Delhi Jaipur Expressway वरील Nariyara coal-based power plant project सोडून सर्व महत्वाकांक्षी आणि लोकाभिमुख प्रकल्प रखडण्याचे प्रमुख कारण भूसंपादन!. आता पूर्ण झालेले पण आधी खूप अडथळे आलेले कित्येक प्रकल्प भारतीयांनी बघितले आहेतच. मेधा पाटकर वगैरे रिकामटेकडी खरेतर कर्मदळीद्री लोकं असतातच असे अडथळे निर्माण करायला! आणि दुर्दैवाने भारतात अशा लोकांना साथ द्यायला ईतर रिकामटेकड्यांची आणि विघ्नसंतोषी लोकांचीही कमतरता नाही! त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला तरी आता त्यात काही विशेष वाटणार नाही!

In reply to by अथांग आकाश

बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला तरी ?? सुरु होणारच नाहीए तर रखडण्याचा प्रश्न येतो कुठे ?

In reply to by अभिजित - १

सुरु होणारच नाहीए तर रखडण्याचा प्रश्न येतो कुठे ?
तुम्ही ज्यांच्या भजनी लागला आहात त्या थोर नेतेमंडळी आणि सत्य कमी पण अफवा जास्ती पसरवणाऱ्या माध्यमांच्या किती आहारी जायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे! त्यामुळे तुम्हाला काय वाटतं किंवा काय पटतं तेच सत्य असल्याचे रेटून सांगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे! पण तुमच्या दुर्दैवाने देशातील बहुसंख्य लोकांना ते पटेलच याची मात्र खात्री नाही! तुम्हाला परमोच्च आनंद मिळवून देण्यासाठी खोट्यानाट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा महत्वाचा भाग आहे! जरा हा आज तक वरचा आजचा व्हिडिओ बघून घ्या आणि मग चालू द्या तुमचं "भवानी आई रोडगा वाहीन तुला" टाईप भारुड! एक प्रमुख अंग्रेजी अखबार ने दावा किया था कि बुलेट ट्रेन प्रोजेक्ट की फंडिंग करने वाली जापानी कंपनी जीका ने फंडिग को रोक दिया है. तो सवाल उठता है कि क्या है मोदी के ड्रीम प्रोजक्ट बुलेट ट्रेन पर सचमुच लगेगा ब्रेक? सच्चाई जानने आजतक ने बात की बुलेट ट्रेन प्रोजेक्ट के प्रवक्ता से.

शीळमार्ग कोंडीमुक्त होणार? https://www.loksatta.com/thane-news/action-on-the-encroachments-on-y-ju… शीळ-कल्याण उड्डाणपूल रद्द? https://www.loksatta.com/thane-news/shill-kalyan-flyover-canceled-17610… Let them eat cake "Qu'ils mangent de la brioche"