पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे. आता ती दिडच दिवस का आहे??? आणखी खोलात विचार केला तर मूर्तीकारांनी नीट पेंटिंग करून तयार केलेल्या गणेशमूर्तींना हा दीड दिवसाचा नियमही व्यावहारिक कारणांनी गैरलागू होतो. पण मूळ पार्थिव गणेश व्रतापेमाणे व्रतकर्त्यांनी पहाटे उठून नदीवर जाऊन स्नान करून 2/3 ओंजळी चिकणमाती आणून स्वहस्ते तो गणपती तयार करायचा आहे. त्याला रंगरंगोटी इत्यादी काहीच करायची नाहीये,फक्त डोळ्यासारखे जे कोरलेले अवयव मूर्ती सुकायला लागल्यावर ढासळतील, ते मूर्ती तयार केल्यावर काही वेळात सूर्योदयाचे उन्ह येऊन वाळायच्या आत तूप लाऊन ते अवयव घट्ट करायचे आहेत.(म्हणूनच आजही रंगविलेल्या मूर्ती असल्या तरी पुरोहित, गुरुजी,भटजी लोक यजमानाला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्तीच्या डोळ्यातून सुरमा लावल्या प्रमाणे तुपात भिजलेली दुर्वा फिरवायला सांगतात,ज्याची माझ्या मते आज काहीही आवश्यकता उरलेली नाही!असो!!!) आता असा स्वहस्ते केलेला गणपती नीट , न भांगता,न तडे जाता किती दिवस राहिल? एक ते दोन दिवस! म्हणून हे व्रतही दीड दिवसाचच आहे.
धर्मशास्त्रातही सोईच्या ठिकाणी मानवी व्यवहारांची गणित पाळली(गेली) नाही तर ते धर्मशास्त्रदेखील मूर्तीसारखच पाण्यात मृत्तिका होऊन मूळ रूपात विसर्जित होत!..,असो! बोला...गणपती बाप्पा मोरया,दरवर्षी लवकर या! (आणि गणेश मंडळानमध्येच येणार असाल तर ,जा ही!..आंम्हाला म्हाइतिये की तुम्हालाही त्याचा त्रास होतोय गेली काही दशकं.. असो!)
======================
लेखक:- कुमार पराग दिवेकर गुरुजी. (धर्मशास्त्रांचा सावरकरी प्रेरणेने धांडोळा घेणारा एक उत्साही बाल लेखक!)
वाचने
16207
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
समयोचित
जे फक्त दिड दिवसाचेच असते.
@टिळकांच्या आधिपासून ५
In reply to जे फक्त दिड दिवसाचेच असते. by खटपट्या
:)
In reply to @टिळकांच्या आधिपासून ५ by अत्रुप्त आत्मा
मूळ शास्त्रानुसार गणपती बहुधा
In reply to @टिळकांच्या आधिपासून ५ by अत्रुप्त आत्मा
ऑ तुम्ही अजूनही कुमारच का ?
समयोचित माहिती.
murti banavne
हो, हे केलं आहे लहानपणी.
In reply to murti banavne by anandkale
बुवा छान माहिती दिलीत .. धन्यवाद
छान माहिती...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang Kulkarniत्या प्रसिद्ध गायिकेने म्हटलेली बाप्पाची आरती आपण सगळ्यांनी अनेक
असं कोणतं त्याज्य नाव आहे
In reply to त्या प्रसिद्ध गायिकेने म्हटलेली बाप्पाची आरती आपण सगळ्यांनी अनेक by चामुंडराय
स्त्रीयांना पळवून लावण्याचा प्रश्न ?
धर्मशास्त्र काय म्हणते ?
@धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत की
In reply to धर्मशास्त्र काय म्हणते ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फक्त पुर्षांनी का म्हणे
गुर्जी म्हणतात म्हणून
In reply to फक्त पुर्षांनी का म्हणे by यशोधरा
@गुर्जी म्हणतात म्हणून ---
In reply to गुर्जी म्हणतात म्हणून by प्रचेतस
@फक्त पुर्षांनी का म्हणे
In reply to फक्त पुर्षांनी का म्हणे by यशोधरा
@फक्त पुर्षांनी का म्हणे
In reply to फक्त पुर्षांनी का म्हणे by यशोधरा
ह्यात धर्मसुधारणेला काहीच वाव
In reply to @फक्त पुर्षांनी का म्हणे by अत्रुप्त आत्मा
कचकाऊन आहे वाव
In reply to ह्यात धर्मसुधारणेला काहीच वाव by प्रचेतस
:)
In reply to कचकाऊन आहे वाव by अत्रुप्त आत्मा
मंगळागौर करावी की पुरुषांनी.
In reply to @फक्त पुर्षांनी का म्हणे by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to मंगळागौर करावी की पुरुषांनी. by यशोधरा
कुठल्याही व्रताला
In reply to +१ by सस्नेह
@गुर्जींच्या एक्स्पर्ट
In reply to +१ by सस्नेह
__/\__
In reply to @गुर्जींच्या एक्स्पर्ट by अत्रुप्त आत्मा
क्या बात... क्या बात
In reply to @गुर्जींच्या एक्स्पर्ट by अत्रुप्त आत्मा
लय भारी
In reply to @गुर्जींच्या एक्स्पर्ट by अत्रुप्त आत्मा
लेख आवडला...