युरोपातील पर्वतराजींत केलेल्या भटकंतीबद्दल, आवडलेल्या काही जागा आणि ट्रेक्सबद्दल लिहायचं बर्याच दिवसांपासून मनात होतं. मला ट्रेकिंगचा विशेष अनुभव नाही, तांत्रिक कौशल्य लागणारे ट्रेक्स करत नाही. पण पायी भटकायची आवड आहे. त्यात युरोप म्हटलं कि आल्प्स, डोलोमाईट्स, पिरेनीज या लोकप्रिय पर्वतरांगा पर्यटकांना खुणावत असतात. पायी भटकण्यासाठी असलेल्या सोयीसुविधा, नकाशे, इतर माहिती यांच्या उपलब्धतेमुळे आपल्या क्षमतांनुसार स्वतंत्र फिरता येऊ शकतं.
प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes)
ऑस्ट्रिया आणि आल्प्स वगैरे बाजूला ठेवून आपण जाऊ या थोडं आग्नेय दिशेला. क्रोएशिया (Croatia) हा आग्नेय युरोपातील एक देश. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांंमधील क्रोएशियाचं एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणजे प्लीट्विच्का जेझेरा (क्रोएशिअन Plitvička jezera, इंग्रजीत Plitvice Lakes) हे राष्ट्रीय उद्यान. झाग्रेब या क्रोएशियाच्या राजधानीपासून दक्षिणेला सुमारे दिडशे किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे. इथे झाग्रेब तसेच झडर या ठिकाणांहून बसने जाता येते. त्याशिवाय खाजगी टूर कंपन्याही एक दिवसाच्या सहली आयोजित करतात. पण स्वतःचे वाहन असेल तर एकदोन दिवस तिथे राहून निवांतपणे फिरणे जास्त सोयीचे पडते.Kozjak तलाव
खालच्या फोटोत दिसतात तशा मार्गदर्शक खुणा जागोजागी आहेत. St1 आणि St2 हे पार्कमध्ये चालणार्या बसचे थांबे आहेत. तर P1, P2, P3 हे बोटीचे धक्के. बोटी तसेच बसेस नोव्हेंबर ते मार्च या काळात बंद असतात; त्यामुळे फिरण्यावर मर्यादा येतात. इतर वेळी दर अर्ध्या तासाने चालतात.
वाचने
14179
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
प्रचंड सुंदर सफर आहे ही ! एका
"खळखळ वाहणार्या पाण्यासंगे आपणही एक थेंब होऊन वाहत जातो."याहून चपखल व सुंदर वर्णन करणे कठीण आहे ! त्यासाठी खास टाळ्या !धन्यवाद!
In reply to प्रचंड सुंदर सफर आहे ही ! एका by डॉ सुहास म्हात्रे
फारच सुंदर. आपल्याकडे
अगदी असंच मलाही वाटलं होतं.
In reply to फारच सुंदर. आपल्याकडे by एस
तुमचं वर्णन आणि सहल दोन्ही मोहक आहेत !
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!
अहाहा.. काय सुंदर फोटो आहेत!
किती सुरेख दिसतेय हे सर्व!
हो, पर्यटनासाठीच गेलो होतो.
In reply to किती सुरेख दिसतेय हे सर्व! by यशोधरा
हेवा वाटतो आहे!
छान
सुंदर !! गारगार वाटलं.
हे वेड आहे ! ! ! !
_/\_
In reply to हे वेड आहे ! ! ! ! by वेल्लाभट
तुमच्याकडून प्रवासवर्णन
नका हो लाजवू...
In reply to तुमच्याकडून प्रवासवर्णन by पद्मावति
सगळ्यांचे आभार!
मस्त लेखन आणी फोटो .
छान!
धन्यवाद!
In reply to छान! by Nitin Palkar