श्रावण महिना सुरु असल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी व्हेज तंदूरचा प्रयोग करून बघावा असे ठरवले. त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तडक वखार गाठली आणि एक किलो कोळसा घेतला. सौ.ना विचारून घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांचा अंदाज घेतला आणि पाव किलो मश्रुम आणि शंभर ग्राम पनीर घेतला. मश्रुम शक्यतो डेअरी मधून घेतल्यास ताजे आणि मॉल पेक्षा कमी किमतीत मिळतात.
तर मग असा प्रायोगिक तत्वावरचा प्रयोग सुरु केला......
साहित्य:
मश्रुम २५० ग्राम
पनीर १०० ग्राम
बटाटे २ (सोलून)
कांदा १
टोमॅटो १
सिमला मिरची २
आले २ इंच
लसूण १५ ते २० पाकळ्या
दही १०० ग्राम
मसाले : मिरची पावडर २ चमचे , धना पावडर २ चमचे , हळद १ चमचा , मिरपूड १ चमचा.
तेल २ चमचे
मीठ चवीपुरते
बटर
कोथिंबीर बारीक चिरून
कृती:
१. पनीर, बटाटे, टोमॅटो, सिमला मिरची यांचे मोठे तुकडे करून घेतले. कांद्याच्या मोठ्या पाकळ्या काढल्या व मश्रुम आख्खेच घेतले . त्यामध्ये आले लसूण पेस्ट, दही, वरील सर्व मसाले, तेल, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून व मॅरिनेशन साठी ठेवले (अर्धातास)
२.मॅरिनेशन होईपर्यंत कोळसा पेटवून घेतला. त्यासाठी एक कोळशाचा खडा गॅसवर पेटवला. साधारण १० ते १५ मिनिटे लागतात. नंतर तो कोळसा इतर कोळश्यामध्ये ठेवला. कोळसा लवकर फुलण्यासाठी मी टेबल फॅन चा वापर केला त्यामुळे संपूर्ण कोळसा १५ मिनिटात फुलला.
३.तंदूर शेगडी असेल तर अति उत्तम. पण माझ्याकडे नसल्याने मी मोठ्या पातेल्यात कोळसा फुलवला. मॅरिनेशन झालेल्या भाज्या शिगांमध्ये खोचून पातेल्यात ठेवल्या आणि त्यावर झाकण ठेवले. साधारण १० मिनिटांनी शिगांमध्ये खोचलेल्या भाज्या बटर ने ब्रश कराव्यात व त्यानंतर १० मिनिटांनी आपले व्हेज तंदूर तयार...
कोळशाची कटकट नको असेल तर आपण गॅसवर मॅरिनेटेड भाज्या खरपूस भाजून देखील व्हेज तंदूर करू शकतो.....पण कोळश्याच्या तंदूरचीच टेस्ट अप्रतिम असते.
वाचने
10505
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोळसा वगैरे म्हणजे भरपूर
फॉईल किंवा पानात गुंडाळून
पण कोळश्याचा स्मोकी फील येईल
In reply to फॉईल किंवा पानात गुंडाळून by पिलीयन रायडर
तुम्हाला शक्यतो माहिती असेलच
नॉनव्हेज बाबतीत तर निश्चितच..
In reply to तुम्हाला शक्यतो माहिती असेलच by तेजस आठवले
फोटू कुठे हायीत? फोटू पाहूनच
ऑल टाईम फेवरेट डिश
दिपक भाऊ तुम्ही असा प्रतिसाद
In reply to ऑल टाईम फेवरेट डिश by दिपक.कुवेत
जरुर
In reply to दिपक भाऊ तुम्ही असा प्रतिसाद by राघवेंद्र
चक्का
In reply to ऑल टाईम फेवरेट डिश by दिपक.कुवेत
सैराट स्टाईल....
In reply to चक्का by प्रसाद_१९८२
चक्का जाम
In reply to सैराट स्टाईल.... by दिपक.कुवेत
नक्कीच प्रयत्न करून पाहीन...
In reply to ऑल टाईम फेवरेट डिश by दिपक.कुवेत