पण लेखाचा विषय वाचून वाटले, विविध व्रुत्तपत्रांच्या राजकीय, सामाजिक धोरणांवर काही भाष्य करणार आहात तुम्ही. तसे केले असते, तर अधिक योग्य ठरले असते.
असो.
बाय द वे,
वृत्तपत्रातील अगेलेखाबाबत म्हणजे?
`अग्रलेखाबाबत' असे म्हणायचेय ना?
विकि, सर्वप्रथम, बर्याच दिवसांनंतर तुम्ही काही लिहिलेले वाचले. लिहित जा.
ही एक लेखमाला होणार आहे का? कारण या भागात तुम्ही फक्त उत्तम निरीक्षणे / वर्गिकरण केले आहेत. तुमचे भाष्य वाचणे आवडेल.
बिपिन कार्यकर्ते
विचारपूर्वक लिहिले आहे.
पण हा "तटस्थ भूमिकेतील अग्रलेख" प्रकार समजला नाही.
तथ्याचे इतिवृत्त बातम्यांतच येते. ज्या बातमीबद्दल "असे हवे/नको" मत असते, कुठल्या तरी बाजूला वाचकाचे मन वळवणे संपादकाला महत्त्वाचे वाटते, त्याच बातमीबद्दल, तोच कल घेऊन, अग्रलेख लिहिला जातो.
"आगपाखड न करणारे,शिवराळ नसणे, इ.इ." शालीनतेचे गुण असतात. पण "कुठलीच बाजू न घेतली" तर बातमी आणि अग्रलेखात फरक तो काय राहिला?
चांगला आढावा घेतला आहेत. वर बिपिनने म्हणल्याप्रमाणे, लिहीत जा. तसेच "आपला अभिजीत" ने म्हणल्याप्रमाणे भाष्य करण्याचा पण विचार करा. मराठी माणसांमधे मराठी अग्रलेख जितके लोकप्रिय आहेत तितके (बंगाल सोडल्यास) इतरत्र आहेत का हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल.
अग्रलेख हा प्रकार महाराष्ट्रात आणि मराठी मनात लोकप्रिय केला तो अर्थातच लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्याच बरोबरीने जरी लोकनिंदेचे धनी झाले असले तरी गोपाळ गणेश आगरकरांनी. स्वतःला मराठी येत नसताना देखील या दोघांनी "स्वराज्य/स्वकीयांबद्दलची तळमळ जर असेल तर ही मराठी लेखणीत उतरवता आलीच पाहीजे" हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे आव्हान, दोघांनी नेटाने पेलले. माहीती, मथळा आणि विचार याद्वारे लोकशिक्षण कसे करावे ह्या संदर्भात दोघांकडून आजही शिकण्यासाखे बरेच काही आहे.
आज महाराष्ट्रात अग्रलेख हा एक साहीत्य प्रकार आहे असे वाटण्यासारखे अनेक दिग्गज होऊन गेलेत. त्यातील पटकन आठवणारे म्हणजे: "काळ" कर्ते परांजपे, केसरीचेच नंतरचे संपादक न.चिं.केळकर, मराठाचे आचार्य अत्रे, म.टा. चे महाजनी-गोविंद तळवळकर, गोमांतक-मुंबई सकाळ-लोकसत्ताचे माधव गडकरी, साप्ताहीक सोबतचे ग.वा. बेहरे, नवाकाळचे खाडीलकर, लोकसत्ताचे कुमार केतकर आणि अर्थातच सामनाचे बाळ ठाकरे.
अग्रलेखाने काय होऊ शकते याची दोन उदाहरणे म्हणजे (ऐकीव/वाचलेल्या माहीतीप्रमाणे): अत्र्यांच्या अग्रलेखांतील बोचरी टिका तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवार पचवू शकले नव्हते. ("कन्नमवार की कंडमवार", "कन्नमवार झाडू मार" अशी काहीशी नावे होती) माधव गडकरींच्या अग्रलेख अंतुल्यांना भोवले.
बाकी आपल्याकडच्या विचित्र नियमांमुळे अग्रलेख कधी कधी भोवतात. कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या सभागृहात घडलेल्या घडामोडींवर लिहील्यास "हक्कभंगाचा ठराव" येऊन तुरूंगात घालता येते. माधव गडकरीविरुद्ध असा ठराव झाला होता. त्याला कोर्टात सहजासहजी (अथवा अजिबातच) दाद मागता येत नाही. अग्रलेख न आवडल्याने होणार्या गुंडगिरीपेक्षाही लोकशाहीतील ही गंभीर दादागिरी आहे असे वाटते. जनतेच्या गुंडगिरीचे उदाहरण म्हणजे ग.वा. बेहर्यांना शिवसेनेवर ("सेनापती की शेणपती" असाच काहीसा मथळा) लिहीलेल्या अग्रलेखानंतर बसलेला मार... अर्थात नंतर त्यांचे नंतर एकमेकांशी चांगले जमले हा भाग वेगळा.
वर धनंजयने म्हणल्याप्रमाणे "तटस्थ" अग्रलेख हा प्रकार पटला नाही. वास्तवीक असे लिहीणारे फारतर कुंपणावरचे म्हणले पाहीजेत.
मृत्यूंनंतर लिहील्या गेलेल्या अग्रलेखांना मृत्यूलेख असे म्हणतात. तसे अग्रलेख लिहीणे ही एक कला आहे. अत्र्यांनी लिहीलेल्या केवळ मृत्यूलेखांवर ३ पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत. (हुंदके, समाधीवरील अश्रू, आणि नेहरूंवरचे सुर्यास्त) ती वाचनीय आहेत. परस्पविरोधी व्यक्तीमत्वे त्यात असतील पण ती सहजतेने तोलली आहेत. गोविंद तळवळकर, माधव गडकरी आणि कुमार केतकर यांनी लिहीलेले मृत्यूलेखपण वाचनीय आहेत. कायमचे संबंध तात्विकभेदांनी तुटल्यावरही आगरकर गेल्यावर (त्यांच्या आठवणीत लिहील्या प्रमाणे) लेखनिकास डोळ्यातील अश्रू न आवरता सांगितलेला टिळकांनी लिहीलेला मृत्यूलेखपण वाचनीय आहे. तसाच त्यांचा गोपाळ कृष्ण गोखल्यांवरील अग्रलेख.
मराठी वृत्तपत्रांमधे साम्यवादी विचारांचे कमी संपादक अथवा विचार असतील मात्र इंग्रजी वृत्तपत्रात साम्यवादी नाही, पण डाव्या विचारसरणीचे समजले जाणारे अनेक आहेत. "दि हिंदू"चे एन राम हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तसेच इतर अनेक डावे विचारवंत पत्रकार-संपादक-स्तंभलेखक म्हणून इंग्रजी वृत्तपत्रात असतातासे म्हणता येईल...
असो. जाता जाता वृत्तपत्रात आणि विशेष करून अग्रलेखात होणार्या टिकेसंदर्भात एकदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी अशा अर्थी म्हणाल्या होत्या की "वृत्तपत्रे काय आज वाचली तरी उद्या त्यांची रद्दीच होते." वास्तवीक पंचमस्तंभाची ही अनावश्यक हेटाळणी होती. कालांतराने त्यांच्या निर्घृण हत्येनंतरची वृत्तपत्रे जेंव्हा रद्दीच्या दुकानात दिसली तेंव्हा whatever goes around comes around ह्या उक्तीचा अर्थ समजला :-)
अग्रलेख आणि तत्सम संपादकीय व विश्लेषणात्मक लेख यांचे अस्तित्व आजकालच्या वृत्तपत्राततर अत्यावश्यक आहे. यांशिवाय वृत्तपत्रांचे मूल्यच ते काय? केवळ घडामोडी आणि बातम्या आज आंतरजालावर, दूरचित्रवाणीवर, किंवा आकाशवाणीवर सहज वाचायला/पाहायला/ऐकायला मिळू शकतात. पण त्या घटनांचा अर्थ, त्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परस्परसंबंध, त्यांचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम यांचा संपादकांच्या दृष्टिकोनातून केलेला उहापोह प्रबोधक असतो. माझ्या मतेतर आजुबाजूंला घडणार्या घटनांचा माझ्या जीवनावर काय आणि कसा परिणाम होईल हे ठरवायला मला अशा लेखांचा फार उपयोग होतो. ठाकर्यांसारखे संपादक त्यांच्या सामनासारख्या मुखपत्रांतील अग्रलेखांचा उपयोग त्यांच्याच अनुयायांच्या भावना उद्दिपीत करण्यासाठी पण करतात. टिळकांनी त्यांच्या अग्रलेखांतून हेच पण वेगळ्या संदर्भात (ब्रिटीश राजवटीविरोधात) केले.
सर्वप्रथम विकि लेखाबद्दल अभिनंदन.
तुमचा अग्रलेख लवकर वाचायला मिळो. दुर्दैवाने महत्वाची वृत्तपत्रे कुठल्या न कुठल्या पक्षाशी बांधली गेली आहेत म्हणुन अग्रलेखाला- अग्रलेख येउन ध्रुवीकरण चालू आहेच. येथील "तटस्थ अग्रलेख" असा उल्लेख म्हणजे बहुदा कोण्या एका पक्षाशी डोळे झाकून सहमत नसणे असावा.
सत्य, सामान्य मनुष्य, भविष्यातील परिणाम व प्रबोधन यांच्याशी इमान राखून "तटस्थ" अग्रलेख लिहता यावा.
विकि अजुन येउ दे.
उत्तम आढावा.
तरीही संपादकीयात घेतली गेलेली तटस्थ भूमिका या विषयी अन्य काही सदस्यांनी घेतलेल्या आक्षेपाशी सहमत. संपादकीयात एखादा विचार हा मांडावाच लागतो, तेव्हा तटस्थ भूमिका घेणे शक्य नाही. अगदी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे उदाहरण घेतलेत तरी, असा हल्ला होण्यामागची कारणमिमांसा, पुन्हा असे न होण्यासाठी घेण्यासाठी घ्यायची खबरदारी, याविषयी एखादी विशिष्ट भूमिका ही संपादकीयात घ्यावीच लागते. तेव्हा ते तटस्थ राहूच शकत नाही. सामाजिक/सांस्कृतिक विषयांवरील अग्रलेखातदेखिल अशी तटस्थ भूमिका घेतल्याचे उदाहरण मिळणार नाही (उदा. सॅन होजे संमेलन).
पूर्वी वृत्तपत्र हे संपादकावरून ओळखले जाई. आजमितीस इंग्लिश वृत्तपत्राबाबत तरी हे लयास गेलेले आहे. मराठी वृत्तपत्रांबद्दल अद्यापतरी तसे झालेले नाही, पण होऊ शकते. टाईम्समध्ये तीन अग्रलेख असतात. पैकी तीसरा अग्रलेख हा "ह घ्या" पद्धतीचा असतो. याचाच परिणाम म्हणून की काय, मटामध्येही दोन अग्रलेख असतात, त्यामुळे कोणत्या एका विषयाला पूर्ण न्याय मिळाला असे दिसत नाही.
जाता जाता - मृत्युलेखांबाबत. मेल्यानंतर वैर ठेऊ नये, या संकेताचे पालन नेहेमीच केलेले दिसते, हे उत्तम. आता वाचायला किंचित क्रूर वाटेल पण "अपेक्षित" लोकांचे मृतुलेख सर्वच वृत्तपत्रात लिहून तयार असतात आणि त्यात वेळोवेळी संपादनही केले जात असते. कारण जेव्हा खरोखरच "वेळ" येते, तेव्हा संपादकांना लिहायला वेळ असेलच असे नाही.
विकिसाहेब, अजून लिखाण येउद्यात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आता वाचायला किंचित क्रूर वाटेल पण "अपेक्षित" लोकांचे मृतुलेख सर्वच वृत्तपत्रात लिहून तयार असतात आणि त्यात वेळोवेळी संपादनही केले जात असते. कारण जेव्हा खरोखरच "वेळ" येते, तेव्हा संपादकांना लिहायला वेळ असेलच असे नाही.
१९७८/७९ च्या सुमारास जयप्रकाश नारायण ह्यान्च्या बाबतित हे झाले होते.त्याना डायालिसिस वर ठेवले होते.आणी ते गेले ही अफवा पसरली.काही व्रुत्तपत्रानी दुसर्या दिवशी तसे अग्रलेख पण दिले.खरे म्हणजे हे अग्रलेख आधिच तयार होते.
अग्रले़ख वाचनिय असणे हे केवळ सम्पादकावर अवलम्बुन नसते.बर्याच व्रुत्तपत्रान्चे मालक सम्पादकावर प्रत्य़क्ष्/अप्रत्य़क्ष् रीत्या दबाव आणीत असतात.दबाव राजकिय,व्यैयक्तिक स्वरुपाचे असु शकतात.हल्लिच्या काळात Times Of Indiaचे H.K. Dua ह्या माजी सम्पादकाचे उदाहरण देता येइल.९/१० वर्षापुर्वि FERA/FEMA ह्या कायद्यामुळे अतिधनाढ्य लोकान्ची पन्चाइत झाली होती.देशाबाहेर किति पैसा ठेवावा/किति आणावा ह्या सन्दर्भात ते कायदे होते.आणि ह्या कचाट्यात Times समुहाचे मालक अशोक जैन अडकले होते.Times ने हा कायदा रद्द व्हावा म्हणुन अनेक पत्रकाराना 'कामाला' लावले होते.H.K. Dua ह्यानापण तसे अग्रलेख लिहिण्यास सान्गण्यात आलें. नकार देताच त्याना काढुन टाकण्यात आले.
विचारवंतांचे लेख असेच येत राहिले पाहिजेत्.तुम्ही अजुन लिहा. विशेषतः, वर्तमानपत्रांतील अग्रलेखांच्या घसरणार्या दर्जाबद्दल पण लिहा. हल्लीचे बरेच संपादक हे ' पंत गेले म्हणून राव चढले' या पध्दतीने झाले आहेत. त्यामुळेच ही घसरण झाली असावी. शिवाय निस्पृहपणा हा गुण लोप पावल्यामुळे कुणाचा तरी पट्टा बांधावाच लागतो.
अग्रलेखात मांडलेली मते संपादकाचा जो कल असतो त्याप्रमाणे असली तरी बहुतेक वेळा संपादकाचे मत आणि वृत्तपत्राच्या मालकांचे मत/हितसंबंध यात संघर्ष असेल तर संपादकाला मालकांचेच मत मंडावे लागते नाहीतर राजीनामा द्यावा लागतो.
काही वेळा बदललेल्या हितसंबंधांचा धक्काही वाचकांना बसतो. एक धक्का मलाही बसला होता.
इंडियन एक्सप्रेस गटाची वृत्तपत्रे ८० च्या दशकात रिलायन्स समूहाचे राजकीय लागेबांधे आणि कायदा वाकवून्/तोडून केलेले व्यवहार यांवर सातत्याने लेख्/टीका प्रकाशित करीत होती. विळ्याभोपळ्याचे सख्य होते. नंतर ९० च्या दशकात एक ऑफर एक्सप्रेस वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. एक्सप्रेस गटाच्या कोणत्याही वृत्तपत्राची एक वर्षाची वर्गणी भरल्यास रिलायन्स मोबाईल मोफत अशी ती ऑफर होती. ती पाहून मला मोठा धक्का बसल्याचे आठवते.
तसेच कोणत्यातरी कॉन्फरन्स मध्ये तत्कालीन मंत्री अरूण शौरी यांना 'रिलायन्सने नेहमीच कायद्याची कक्षा ओलांडली. पण आता असे वाटते की ते कायदेच चूक होते' असे विधान करताना ऐकले तेव्हाही या बदललेल्या हितसंबंधांची जाणीव झाली.
अवांतरः ८० च्या दशकात जेव्हा रिलायन्सविरोधी मोहीम चालू होती तेव्हा रिलायन्सच्या प्रतिस्प्र्धी कंपनीचे नस्ली वाडिया हे एक्स्प्रेसच्या संचालक मंडळात होते. हा योगायोगच असावा ;)
खराटा
(रंग माझा वेगळा)
एक्स्प्रेसवाले असेच काहितरी संशायास्पद करीत रहातात पण त्यांचा वाचकवर्ग लय लॉयल वैगेरे आहे. कुठल्याही रॅडम डे ला एक्सप्रेस आणि टाइम्सच्या अग्रलेखांची तुलना केली तर दोन वेगवेगळ्या देशांची व्रुत्तपत्र वाचतो आहोत का असा संशय येतो. पण काहि गोष्टि ज्यांना एक्स्प्रेस ने वाचा फोडली ते काम टाइम्स कधिच करु शकले नसते. एवढेच काय व्यवस्थेच्या विरोधात एवढे मोठे धाडस एक्स्प्रेस करीत असतांना टाइम्स त्याची साधी बातमी सुद्धा बनवत नसे. बाकी अग्रलेखांच्या बाबतीत बोलयाचे झाले तर एकेकाळी पेपर घेउन मुख्य मथळा न वाचता फक्त दोन कॉलम्सची घडि दुमडुन थेट अग्रलेख वाचणारे लोक मी बघितले आहेत. या माणसांबद्द्ल मला प्रचंड आकर्षण वाटायचे. अलीकडे ना तर अग्रलेखांची पिढि राहिली ना तर वाचनारांची. (सामान्यपणे)
२५ जून १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून आणिबाणी जाहीर करण्यात आली. एक्सप्रेस समुहाच्या त्यासंदर्भातील भुमिकेची कल्पना असल्याने दोन दिवस त्यांची वीज बंद करून टाकली. जेंव्हा २७ ला वीज परत जोडण्यात आली तेंव्हा एक्सप्रेस समुहाचे सर्वेसर्वा संस्थापक रामनाथ गोएंका यांनी त्यांचा ऐतिहासीक अग्रलेख लिहीला - कोरा स्तंभ!
हे पण ऐकून होतो... याची देहि याची डोळा बघायला मिळाले आज. खरं तर सुसंस्कृत समाजात राज्यकर्त्यांच्या थोबाडावर एवढी वाईट कोणी मारली नसेल कधी.
बिपिन कार्यकर्ते
तुम्ही बहुतेक जण बोललात लिहीत जा हे वाचून आनंद झाला आणि बरेही वाटले.
आणि आपल्या प्रतिसादांमुळे माझ्याही ज्ञानात भर पडण्यास मदत झाली.
तटस्थ भुमिका येथे मला माझी चूक दिसून आली पण कधीकधी असे होऊ शकते.शेवटी संपादकाची भुमिका आणी वृत्तपत्र ज्यांच्या मालकीचे आहे त्यांची इच्छा महत्वाची.
विकि,
सर्व प्रथम एका चांगल्या चर्चेला सुरुवात केल्याबद्दल आपले अभिनंदन.
आपलि सर्व निरिक्षणे वाचलि व काहिशी पटलिहि.
वास्तविक पाहता अग्रलेख कशासाठी वाचायचा हे चित्र हल्ली फार धुसर होउ लागलेय.
मराठीतील काहि प्रमुख वृत्तपत्रे पाहिलीत तर,
महाराष्ट्र् टाईम्स- पुर्वी काँग्रेस व आता शिवसेना,
सकाळ- राष्ट्रवादी कॉंग्रेस
सामना- शिवसेना,
लोकसत्ता- काँग्रेस,
लोकमत- दर्डा साहेबांचा जो असेल तो पक्ष,
प्रहार-राणे साहेबांचा जो असेल तो पक्ष,
जवळपास प्रत्येक वृत्तपत्र हे एखाद्या राजकीय पक्षाने ओलीस धरले आहे.
ह्या परिस्थितीत विषेशतः राजकीय व सामाजिक घटनांवर आधारित तटस्थ व दिशादर्शक अग्रलेख मिळणे अतिशय अवघड आहे.
मुत्सद्दि.
म्हणुनच मला
केतकरांशिवाय लोकसत्ता
रावुतांशिवाय मटा
आणि दुसर्या राउतांशिवाय सामना आवडतो
आणि
महत्वाचे म्हणजे
आम्हाला
माझ्या गावच्या पुढारी या वृत्तपत्रातील अग्रलेखाशिवाय दुसरे काहीच आवडत नाही
(चायला काय लिवतात माहिती आहे का ..कोल्हापुरी मारतात साले....मानल बाबा त्यास्नी)
बाकी सविस्तर प्रतिक्रिया नंतर
दुर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझीमते
केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा
अनवाणी पायानी वनवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प.......................
विना
असेच म्हणते. एकाच लेखावर न थांबता अग्रलेख, वृत्तपत्रांच्या राजकीय भूमिका (आणि कोलांट्या!), बातम्यांच्या निवडीतून घेतली जाणारी (किंवा न घेतली जाणारी!) भूमिका ... या सगळ्यावर लेखमाला वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
निरीक्षणे चांगली आहेत.
अभिजित साहेब
छान...
गमतीदार सर्वेक्षण
बिपिन साहेब
चांगला आढावा
घटनांचा अर्थ
वाहवा!
छान आढावा
जयप्रकाश नारायण
अजुन लिहा.
संपादकाची की मालकांची ?
एक्स्प्रे
एक्सप्रेसचा सुप्रसिद्ध अग्रलेख
ऐकून होतो...
वरील सर्वांसाठी
प्रकाटाआ
विकि, सर्व
म्हणुनच
असेच
पिवळी पत्रकारीता