दुसरे घर कि Mutual Fund ??
मित्रहो - चर्चा म्हणून हा धागा टाकतोय. तुमचे विचार अवश्य टका.
एक नेहमीचाच प्रश्न घेऊन (जो बऱ्याच जणांना पडतो ! मलापण ) काही दिवसांपूर्वी माझा एक जवळचा वर्ग मित्र हॉटेलात भेटला. जसे बरेच सॉफ्टवेअर इंजि. असतात तसलाच mid career मधला नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतला,आपली नोकरी राहील कि नाही ह्याची चिंता. Industry मधील simplification, saturation आणि नवीन qualified तरुण वर्गाला काहीसा भिलेला.
सध्या नोकरी सुरु आहे पण पुढील काही वर्ष आपल्याला value असेल का ! ह्याचा विचार करणारा एक होतकरू Technical Consultant.
जमेची बाजू अशी की - स्वतःचा फ्लॅट (२ bhk ) बंगलोरला आहे, कुठलेही लोन नाही. तो भाड्याने दिला आहे. सध्या पुण्यात नोकरी, त्याचे वय ४०, सोबत आई,बायको, एक मुलगा, एक मुलगी वय बहुतेक ६ मुलाचं माहिती नाही. बायको housewife. पुण्यात सध्या २bhk भाड्याने घेऊन राहतात.
US ला onsite होता काही वर्ष, एकूण १७-१८ वर्ष अनुभव आहे. एकंदर जमापुंजी साधारण ६५ लाख. योग्य ते term आणि medical insurance घेतलेले आहेत. सध्या महिन्याचे savings ४० ते ४५ हजार
तर प्रश्न असा की : पुण्यात फ्लॅट घ्यावा कि Mutual Fund मध्ये पैसे ठेवावेत ?
Goal म्हणाल तर रिटायरमेंट नन्तर महिन्याचा खर्च निघावा आणि मुलांच शिक्षण आणि लग्न.
रिटायरमेंट वयाच्या ५८-६० पर्यंत धरून चला.
माझा सल्ला :
१) महिन्यातल्या ४०-४५ हजार savings मधून २५-३० हजाराची Largecap Mutual Fund मध्ये SIP करावी
२) ६५ लाखातले
- ३० लाख Liquid + Ultra Short Term+ Medium Term Fund विभागून
- १५ लाख Balanced Fund
- १५ लाख Multicap Fund
- ५ लाख Goldbonds
Retirement वेळेस STP करावे
----------------------------------------
त्याला माझा १) SIP चा सल्ला पूर्णपणे पटला, दुसरा पण चांगला म्हणाला पण दुसऱ्या सल्ल्याबाबत तो confused आहे असं म्हणला
तो म्हणला -
६० लाखात अजून एक घर पुण्यात घ्यावे कारण property market down आहे. बंगलोरच्या घराचं भाडं मिळत राहील.
पुढे Retirement नन्तर मूळ शहरात (वडिलोपार्जित) घरी जाऊन २ (पुणे+बंगलोर) घरांच्या भाड्यावर महिन्याच्या खर्च (जगे पर्यंत)चालवता येणार.
घराचे भाडे काळानुसार वाढेल (कधी कमीपण होईल पण नेहमी नाही) शिवाय घराची किंमत पण वाढेल.
****शिवाय ६० वर्षी Retire होऊन समजा वय वर्षे ८५ पर्यंत जगलो तर MF STP जवळपास २५ वर्षे कामात पडेल का ?***
त्याचा हा option ऐकून मीपण confuse झालो :(
------------------------------------------
तर मित्रांनो होऊद्या चर्चा !!
धन्यवाद !!
याद्या
18663
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
तुमच्या मित्राला निवृत्ती
एक शंका - तुमच्या मित्राचे
धन्यवाद!! पुण्यात घर घेऊन
In reply to एक शंका - तुमच्या मित्राचे by सिरुसेरि
दुसरे घर घेण्यास हरकत नाही.
धन्यवाद ! हेच तो पण म्हणतो
In reply to दुसरे घर घेण्यास हरकत नाही. by खटपट्या
माझे मत
सविस्तर प्रतिसादाबद्दल
In reply to माझे मत by राजेंद्र मेहेंदळे
१ लाख रुपये टाकले तर ७.३०
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल by नजदीककुमार जवळकर
ऐकीव माहिती प्रमाणे आय. पी.ओ
आयपीओ (Initial public
In reply to ऐकीव माहिती प्रमाणे आय. पी.ओ by शाम भागवत
आयटी म्हणलं की जमिनीत पैसे
साठ लाख रुपये एकर?
In reply to आयटी म्हणलं की जमिनीत पैसे by ट्रम्प
जमीनीत पैसे वाढतील , पण ...
In reply to आयटी म्हणलं की जमिनीत पैसे by ट्रम्प
धन्यवाद ! जमिनीत नाही तयार
In reply to आयटी म्हणलं की जमिनीत पैसे by ट्रम्प
आता पर्यंत च्या सगळ्या
धन्यवाद ! वर सांगितल्या
In reply to आता पर्यंत च्या सगळ्या by ट्रम्प
राहण्यास सर्वोत्तम शहर
कोणतीही गुंतवणूक करताना, तिचा
स्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट,
In reply to कोणतीही गुंतवणूक करताना, तिचा by डॉ सुहास म्हात्रे
+१००
In reply to स्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट, by सुबोध खरे
असाही एक मध्यममार्ग काढता
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
डॉ. म्हात्रे काका तुमचे पाय
In reply to असाही एक मध्यममार्ग काढता by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या शरीरालाच जोडलेले आहेत.
In reply to डॉ. म्हात्रे काका तुमचे पाय by प्रमोद देर्देकर
:))))
In reply to माझ्या शरीरालाच जोडलेले आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
असाही एक मध्यममार्ग काढता
In reply to असाही एक मध्यममार्ग काढता by डॉ सुहास म्हात्रे
६५ लाखाच्या जागी जर १ करोड
In reply to असाही एक मध्यममार्ग काढता by नजदीककुमार जवळकर
६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असतेगुंतवणूक एकाच वेळेला एका झटक्यात करायची असते किंवा केली जाते... असे म्हणायचे असले तर परत विचार करा. हे वाक्य तुम्ही आपले म्हणणे ठासून सांगायच्या भरात केले आहे असे वाटते. म्हणूनच केवळ, खालचा लेखनप्रपंच करत आहे. ======================== गुंतवणूकीच्या बाबतीतली खालील काही महत्वाची सत्ये स्विकारून केलेली गुंतवणुकच गुंतवणूकदाराच्या शारिरीक, मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी चांगली ठरते... १. गुंतवणूकीसाठी, रु६५ लाख काय पण, सर्वसाधारणपणे, रु१ लाख किंवा ५०,००० सुद्धा, फार कमी जणांच्या व तेसुद्धा फार कमी वेळेस एकहाती उपलब्ध असतात. बहुतेक वेळेस, गुंतवणूक करण्यासाठी एकवेळेस काही शे ते काही हजार रुपयेच उपलब्ध असतात. २. धोका आणि परतावा हे हातात हात घालून एकमेकाबरोबर समप्रमाणात वरखाली जातात. कमी (किंवा शून्य) धोका असूनही प्रचंड परतावा मिळणारी गुंतवणूक नजरेत आली तर, सर्वप्रथम, स्वतःला चिमटा काढून झोपेतून जागे व्हावे ! :) आणि सर्वात महत्वाचे... ३. (अ) जे आपल्याला नीट किंवा अजिबात समजलेले नाही, (आ) ज्याच्या धोका व परताव्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, (इ) ज्याचा धोका आणि/अथवा परतावा आपल्याला परवडणार नाही अशा गुंतवणूक साधनाच्या वाटेलाही जाऊ नये. पूर्णविराम. व्यवहारात एका झटक्यात सर्व गुंतवणूक शक्य नसल्यामुळे, गुंतवणूकीच्या साधनांचा, आपल्या खिश्याला आणि (शारिरीक व मानसिक) प्रकृतीला परवडेल असा, प्राधान्यक्रम लावणे योग्य ठरते. तो प्राधान्यक्रम साधारणपणे असा असावा... १. (अ) भांडवलाला शक्य तेवढा कमीत कमी धोका (कमीत कमी, कारण हा धोका ०% कधीच नसतो) स्विकारून, (आ) शक्य तितका जास्तीत जास्त परतावा देणारे आणि (इ) हवे तेव्हा पैसे त्वरीत हातात येऊ शकतील अशी गुंतवणूक साधने : हे व्यवहारात कसे साधायचे ते, मराठीतला एक वाक्प्रचार वापरून असे समजावून देता येईल : "जे पैसे बुडाले तर खाण्यापिण्याचे हाल होतील, ते पैसे केवळ आणि केवळ अश्याच साधनांत गुंतवावे." ही पहिली पायरी प्रामाणिकपणे, पूर्णपणे शुद्धीत असताना व कोणत्याही नशेच्या प्रभावाखाली नसताना पुरी झाली असे ठरविल्यावरच पुढच्या पायरीवर पाय ठेवावा. याचा अर्थ असा नाही की, यापेक्षा खूपच धोका पत्करून कोणालाच यश मिळणार नाही... तर, तो अर्थ असा आहे की, तसे यश मिळण्याची शक्यता इतकी कमी आहे की सर्वसामान्यपणे शहाण्याने तो धोका पत्करू नये. या पहिल्या पाहिरीवर धोकादायक गुंतवणूक केलीच तर ती, गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण रकमेच्या १०% पेक्षा जास्त असणे, धोक्याचे प्रमाण अस्विकार्य (unacceptable) बनवते. जोपर्यंत, वरच्या साधनांत पुरेसे (हे पुरेसेपण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे असते, पण ते कल्पनाविलासाने ठवू नये हे नक्की) पैसे गुंतवल्यानंतरच, पुढच्या पायरीवर जावे. इथून पुढे, गुंतवणूकीची साधने, प्रत्येकाचे (अ) वय, (आ) धोका स्विकारण्याची मनःस्थिती आणि (इ) उपलब्ध गंगाजळी, इत्यादींवर अवलंबून असतील. तेव्हा, त्या परिस्थितीच्या स्वरूपावर गुंतवणूकीचे प्रकार बदलतील. पण, सर्वसाधारण रणनीतिमध्ये, पुढची गुंतवणुक करताना खालील क्रम वापरावा असे साधारणपणे म्हणता येईल... २. (अ) तुलनेने मध्यम धोका, (आ) तुलनेने मध्यम परतावा आणि (इ) त्वरीत पैश्यात परावर्तीत करता येणारे (लॉक-इन पिरियड नसलेले) गुंतवणूक साधन : वर लिहिल्याप्रमाणे धोकादायक साधनांत १०% गुंतवणूक केली असल्यास, हा प्रकार अपरिहार्य समजावा. कारण, ही रक्कम, (क) क्रमांक एकची रक्कम अनपेक्षितपणे पुढे आलेल्या जरूरीला कमी पडली किंवा (ख) वर सांगितलेली १०% वाली गुंतवणूक समस्येत सापडली तर, सहज उपलब्ध असावी अशी "आघातप्रतिबंधक (बफर) रक्कम" असते. हे झाल्यावर मग... ३. (अ) तुलनेने जास्त पण स्विकार्य धोका, (आ) तुलनेने जास्त परतावा देणारे आणि (इ) त्वरीत पैश्यात परावर्तीत न करता येणारे (लॉक-इन पिरियड असलेले किंवा स्थावर संपत्तीचे) गुंतवणूक साधन : या साधनांचे असंख्य प्रकार आहेत. त्यापैकी, ज्यांच्यातील अटी व धोके आपल्याला सहन करता येण्याजोगे असतील, ते स्विकारावे. ================ माझा अगोदरचा प्रतिसाद या विश्लेषणाचे सार होते. :)डॉ. सुहास म्हात्रे !! तुमची
In reply to ६५ लाखाच्या जागी जर १ करोड by डॉ सुहास म्हात्रे
अश्या चर्चेत माफीबिफी कशाला
In reply to डॉ. सुहास म्हात्रे !! तुमची by नजदीककुमार जवळकर
डॉ. खरे !! सविस्तर
In reply to स्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट, by सुबोध खरे
सर ! धन्यवाद !! हा विचार
In reply to कोणतीही गुंतवणूक करताना, तिचा by डॉ सुहास म्हात्रे
व्यासपीठावरुन पायउतार होणे...
@मराठी कथालेखक - सविस्तर
In reply to व्यासपीठावरुन पायउतार होणे... by मराठी कथालेखक
घर घेण्यासंदर्भात काही मुद्दे
सविस्तर प्रतिसादाबद्दल
In reply to घर घेण्यासंदर्भात काही मुद्दे by राघव
मला आवडलेले एक संपूर्ण विश्लेषण
धन्यवाद सर ! हे आधी वाचण्यात
In reply to मला आवडलेले एक संपूर्ण विश्लेषण by सिन्नरकर
या लेखात बरेचसे मुद्दे एकांगी
In reply to मला आवडलेले एक संपूर्ण विश्लेषण by सिन्नरकर
धन्यवाद! डॉ. खरे वरील चर्चेत
In reply to या लेखात बरेचसे मुद्दे एकांगी by सुबोध खरे
मिपाकरांनी राजकीय धागे सोडून
सहमत. अशा चर्चांमधून बरीच उपयुक्त माहिती मिळते.
In reply to मिपाकरांनी राजकीय धागे सोडून by टवाळ कार्टा
हेच म्हन्तो..
In reply to मिपाकरांनी राजकीय धागे सोडून by टवाळ कार्टा
धन्यवाद टका !! चर्चेतून
In reply to मिपाकरांनी राजकीय धागे सोडून by टवाळ कार्टा
सद्य स्थितीत एक फार
सर ! हे अगदी बरोबर बोललात !
In reply to सद्य स्थितीत एक फार by सुबोध खरे
https://economictimes
उत्तम माहिती डॉ. खरे! हि सत्य
In reply to https://economictimes by सुबोध खरे
अगदी नेमके.
मी काय केले असते
धन्यवाद आदिजोशी !!
In reply to मी काय केले असते by आदिजोशी