पनीरमटर सासावडी,पराठा पुनवडी! ;)
अंक पहिला:-
तर काय झालं म्हैत्ये का...काल सक्काळी सक्काळी बायकू म्हनली आज मी आजेबात सैपाक करनार नाय..नाष्टा जोरात करायचा आणि सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आनि सामान णवीण केलेल्या फर्निचर मदी लावायचं!(कुणी???हा प्रश्न टाळून! ;) )मी:- "बरं , तस क्रू!" यातल्या शेवटच्या अक्सरावर बाईल चिडली आनी म्हणाली, "काय ओ ह्ये विचित्र शब्द बोलत असता हल्ली?" मी:- "हा मिसळपाव चा वियोग आहे ग सखे!" ती:- "डायलेग मारू नका.म्हैत्ये तुमचं मुसळपाव" मी:- "अग मुसळ नई ,मिसळ!" ती:- "तुमच्या भाषेत..टायपो हे टायपो,कळलं ना आता?" मी:- "कसला पो?" ती:-"श्शी....!" मी:-मला फेकून मारलेली वाटी चुकवत चुकवत-"स्वारी स्वारी!"ती:-"परत त्येच त्या मिसळपाव वरचच!" अस म्हणून फेकून मारायला कैच ण सा पडल्यानी निस्ताच हात हलवत"मरा त्यातच,आणि करा तुमीच जेवायचं आज!" अशी आव्हान आत्मक धमकी मला द्यीऊन तिच्या कामात बुडाली..मग मी दुपारी 2प्रेन्त तिला काम आणि मला आमच्या वळवळ्या महाउद्योगी बालकाच्या अंघोळी पासून ते खाण्या पर्यन्त च्या जबाबदारीत अडकवून घेतलं..आणि दुपारी 4 वाजता ही आणि आमचे दिव्य बालक निजेला गेल्यावर फेटा बांधून स्वयं-पाक घरात शिरलो. हुरररररररररर...
अंक दुसरा:-
सगळ्यात आधी पनीर पाण्यानी धुऊन घेतलं आणि धोतराच्या तुकड्यावर त्याची सुरींनी यथायोग्य कत्तल करून मंजी टुकड पाडून निथळायला ठिवलं. मंजी कोरडं ठाक हुतया पनीर.(आनि लोनिफ्राय करताना उडत बी नाय चराचरा..दुत्त दुत्त! :-/ )मंग लगीच पातेल्यात पाणी उकळी मारायला ठिउण थेच्यात आदुगरच सोल्लेला आमचा सासवड सैडचा आन त्यो बी सिजनच्या पहिल्या तोडीचा गोड मटार टाकला..आनि 2मिनिटांनी लगीच ग्यास बंद क्येला. (ह्यो मटार मंजी तिकडच्या भासत वाटाना घ्येताना हिच्या कडन फर्माईस झाल्ती "त्ये तुमि ढाबा श्टैल भाजी करा ना एकदा!" म्हणूनच आज लगीच मौका बगून चौका मारायचा ब्येत क्येला! त्यात आमचा सासावडी मटार मंजी लै गोड हो! ;) म कसा नाई करनार लग्गीच!? ;) असो!!! )
ह्योच बरं का आमचा त्यो सासावडी मटार, सॉरी वटाना!
मंग तीनचार कांदे चिरले,लसूण सोलला, आलं बी घ्येतलं आणि तव्याला तेल टाकून थेच्यात आदुगर कांदा चांगला आंग सोडपरेन्त फ्राय क्येला.मंग वरती आलं लसून टाकून खाली बसून कनिक चांगली बैजवार मळून घ्येतली,आणि पराठ्यासाठी चांगली ताणली जायला तिला परातीत थोडी थापून मदी मदी थालपिटाला करत्यात तशी होल क्येली आन मंग थेच्यात चार चार थ्येंब त्याल बी सोडलं,आनि धोतराच्या मऊ तुकड्याखाली मुरायला ठेवली.
आता परत वरती ओट्याला आलो आणि फ्राय झाल्यालं कांदा वग्रे जिन्नस मिक्सर ला सिक्सर लागेपरेंत चांगलं बारीक वाटून घ्येतलं. दोन टंबाट्यांची पन त्याच मिक्सर ला त्ये प्युरी का फ्युरी काय म्हनत्यात ती लगोलग काडून घ्येतली..आनी मंग यक खोलगट तवा घिऊन थेच्यात आदी पनीर लोणी फ्राय करून घ्येतलं आनी त्ये ताटाला काडून लगीच त्यात अजून लोणी टाकून त्ये टमाटो फ्युरी थेच्यात सोडली.तिनी पानी सोडाया सुरवात क्येल्या क्येल्या लग्गीचं वाटण घातल वरून मंग त्येला त्याल सोडाया वर सोडून परत खाली भुईला आलो आन परात हाताला घिऊन त्या कनकीचे परत थोडी एकजीव मळून सा गोळे पाडून घ्येतले. त्याच्या लांब पट्ट्या करून त्याला वरन तूप लावलं आणि कडबोळ्यावानी गुंडळून वरून चपट चपट करत परत पट्टी क्येली . मंग पुन्ना कडबुळ पुन्ना पट्टी अशे एकंदर तीन एपिसोड झाल्याव त्ये सा कडबुळी तशीच सोडून फटकन वरती ओट्याला आलो. तोपरेनत बारीक ग्यासवर ह्या मसाल्यानी टमाटो प्युरीशी नीट झिम्मा ख्येळलावता! हुरररररररर!!!
मंग अजेब्बात टाइम न लावता त्यात आमचा मंगला टॉकीजच्या मागं मिळणारा कडक नागदेव मसालेवाल्या कडचा मसाला मारला ,थोडं तिखाट मीट टाकलं,धान्याची पावडर मारली आनी गिरेव्ही ज्यादा दाट रहाणार नाही येवड पानी बी मारलं..दोन मिंट जाऊ दिली आनी लग्गीचं गरम पाण्यातुन मऊ पाडलेला मटार टाकून लगोलग फ्राय क्यालेलं पनीर बी टाकलं. थोड्या टायमात लगी ग्यास बंद क्येला आनी मग लागलो पराठ्याच्या मागं..
पोळपाट लाटन घेतलं आणि पोळपाटाला वाईच त्याल लावून त्या येकेक कडबुळ्याला घिऊन रेटून पराठे लाटले आनी लोनी सोडत सोडत खरपूस भाजून काढले...
त्ये डब्याला लावे प्रेन्त आमचं दिव्य वळवळ बालक उठलं... आणि लगोलग आमचं स्वयं पाक घरही सुटलं..मंग बायडी पन उठली ..आंग मोडत छा करायला सुटली.. मी बी पोराचं आवरून त्येला परत खायला बियला घातलं आनी होता होता सातच्या टायमाला माझी बाईल द्येवाला दिवा बत्ती करून मला एक लाडाची हाक देऊन "पाट पाणी घ्या ना आज प्लिईईज!!!" ह्ये इतक्या लाडानी म्हणाली की मी पोराला तिच्याकडं सोडून कवा उठलो आणि स्वयंपाक घराकडं कवा सुटलो त्ये माझं मला कळलं बी न्हाई.. नन्तर जेव्हा तिनि पराठ्याचा पहिला घास भाजीब्रोबर घ्येतला ..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं..नन्तर मी बी ज्येवलो रोजच्या सारका, पन आज पोट आदीच भरलेलं होतं!
======≠==============

वाचने
25996
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वाह!
बाब्बौ
In reply to बाब्बौ by अभ्या..
ते शेफ लोक घालतेत ना उंच
In reply to ते शेफ लोक घालतेत ना उंच by प्रचेतस
ह्या प्रश्नाचे खरे उत्तर
In reply to ह्या प्रश्नाचे खरे उत्तर by अभ्या..
फेटा कशाला बांधला?)
In reply to फेटा कशाला बांधला?) by संजय पाटिल
(No subject)
भारी!!!
पुरंदरचा वाटाणा म्हणजे
मस्त डिश . तुम्ही म्हणजे
आज बाळाची द्रिष्ट काहाडढाना
बातमी प्रतिसाद
In reply to बातमी प्रतिसाद by नाखु
प्र कटन सुरू:-
In reply to प्र कटन सुरू:- by अत्रुप्त आत्मा
मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत?
In reply to मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत? by प्रचेतस
तू गप रे अगोब्या,
In reply to तू गप रे अगोब्या, by अभ्या..
=))
In reply to =)) by प्रचेतस
नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय
In reply to नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय by अभ्या..
@बुलेट घेऊन काय प्रगती झाली
In reply to मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत? by प्रचेतस
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत
In reply to बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत by यशोधरा
आय्यो! मला वाटलं की मलाच दिस
In reply to आय्यो! मला वाटलं की मलाच दिस by अत्रुप्त आत्मा
आम्ही
In reply to आय्यो! मला वाटलं की मलाच दिस by अत्रुप्त आत्मा
मला वाटलं की मलाच दिस ना गेले
मला वाटलं की मलाच दिस ना गेले! :-|म्हणजे नेमकं काय? रच्याकने, तुम्ही मराठीच्या कोणत्या बोली भाषेत लिहीलं आहे? :)In reply to मला वाटलं की मलाच दिस ना गेले by सतिश गावडे
ह ह पु वा!!
In reply to ह ह पु वा!! by यशोधरा
मटार
In reply to मटार by नाखु
आंबा गोड असतो त्यामुळे
वर्णनशैली
बाइज्जत बामूलाहीजा शेफ ए
लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त
In reply to लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त by डॉ सुहास म्हात्रे
सहमत,सहमत
मस्त ...
भारी हो गुरुजी. शेवट तर
फक्कड जमलया!
बाबो बुवा आत्मुस दुत्त दुत्त
बाबौ आवो गुर्जी धोतूर पण ....
मत्त मत्त बुवा..
In reply to मत्त मत्त बुवा.. by कोमल
..
झक्कास
काय बी कळंना
In reply to काय बी कळंना by चित्रगुप्त
=))
In reply to =)) by प्रचेतस
यांना
In reply to यांना by नाखु
गुप्त चित्राचं काय घेऊन बसलात
In reply to काय बी कळंना by चित्रगुप्त
@ काय बी कळंना