मंडळी गेला विकांत हा गटारी वीकांत होता. त्यानिमित्ताने केलेला हा खास पदार्थ!
साहित्य
एक वाटी मिश्र समुद्र-खाद्य (कोळंबी, तिसर्यांच्या आतील मांस, मेकूल (Squid) आणि ऑक्टोपस
एक वाटी तांदूळ
एक कांदा
एक टोंमॅटो
हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, लिंबाचा रस, आले-लसूण पेस्ट, तेल आणि मिठ (ह्या सर्व पदार्थांचे प्रमाण आपापल्या चवी नुसार ठरवावे)
कृती
१) एका वाटीत मिश्र समुद्र-खाद्य घेऊन त्याला लिंबाचा रस, मिठ, हळद, लाल तिखट, मालवणी मसाला आणि आले-लसूण पेस्ट लावून तासभर ठेवावे.
२) किंचित तेलात तांदूळ परतून घ्यावा आणि एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावा.
३) तेलात कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला की त्यात हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, मिठ आणि आले-लसूण पेस्ट घालावी.
४) त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा.
५) टोमॅटो शिजला की त्यात मसाला लावलेले समुद्र्-खाद्य घालावे. किंचित पाणी घालून थोडावेळ झाकण लावून शिजवून घ्यावे.
६) नंतर त्यात परतलेले तांदूळ घालून एकजीव करावे.
७) नंतर त्यात दोन वाट्या गरम पाणी घालून, झाकण लावून सुमारे १० मिनिटे शिजवावे.
८) गरमागरम समुद्र-खाद्य खिचडी तयार आहे!!!

वाचने
8897
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
वा वा .. सुनीलशेट स्वयंपाक
सोपी नॉन्व्हेज पाकृ +
पाककृती
मज्जाय बॉ!
धन्यवाद
गटारी स्पेशल