गण्यानं प्यार क्यू किया ?

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in काथ्याकूट
4 Jul 2018 - 9:02 pm
गाभा: 

हा अश्या प्रकारचा लेख पहिल्यांदा लिहितोय, भाषा थोडीशी शिवराळ आहे तेव्हा खटकल्यास संपादक मंडळ धागा उडवू शकतात. माझी हरकत नाही.

लै दिसापासनं गण्याचं डोकं भंजाळलं हुतं, आज बोलतो उद्या बोलतो म्हनुस्तर गण्याची आगळगावची वड्याकडची साळा संपून आता त्यो अंजनीला कालेजला जाय लागलता. गण्याचं हाप तिकीट आता फुल्ल झालतं.

आज कायबी हू दे, आपल्या दिलाची बात बोलायचीच असं म्हणून त्यो सकाळपासनच तयारीला लागलता.

फुल्ल ब्रसभरून कोलगेट लावून गण्यानं हिरडीतनं पार रगात युस्तर घसाघासा दात घासलं.
म्हागल्या दिवाळीला घेटलेलं ठिवणीतलं कापडं गाण्यानं कालच इस्त्री करून ठिलती.
फुल बाह्या असलेल्या शर्टाची हाताची बटणं लावली अन खाली प्यांटला बेल्ट बी लावला.

आईनं तेजा ह्यो अवतार बघून ईचारलं बी, आज काय फंक्शान हाय का कालीजात?

गाण्यानं काय बी उत्तर दिलं न्हाई.

नाश्ता करून गण्या देवाच्या पाया पडाय आतल्या देवघरात गेला, रोज 3 शेकंदात पाया पडणार गण्या आज दीड मिनिट देवाफूड हुबा हुता.

हात जोडून गण्यानं यल्लमच्या फोटुमाग ठिवलेला कागदाच्या पुडीतला अंगारा कपाळाला लावला अन पुडी हुती तशी ठुन दिली.

म्हाग फुडं कुनी न्हाई बगून गण्यानं वासू अगरबत्तीच्या सगळ्या अगरबत्त्या काडून शर्टाला अन दोनी बगलत चोळल्या. आन परत हुत्या तशा ठुन दिल्या. पूना पाया पडून कायतरी बडबडला आन निघाला. जातानाच नीलम दिदीनं देवळीत ठुलेलं पोंड्सची पावडर बी हाणली. थोडी तोंडाला अन थोडी रुमालात भरली अन रुमाल फूडच्या खिशात ठुला.
रुमाल बी नीलमचाच. ही असली चिरगुटं फक्त पोरीसनी कामाची असत्येत अशी समजूत असलेला गण्या आतापातुर चड्डीलाच शेमबुड पुसत होता, मग एवड्या दोस्तात चड्डी कुणाची बी चालत हुती.

भाईर मोरीत टाकल्यालं बनेल घेऊन उंबऱ्यात बसून बूट पुसत बसला, 2-4 मिनिटातच बुटावरची धुळ आन चिकूल बाजूला जाऊन बूट आता बऱ्यापैकी काळा दिसत हुता.

धुवाय टाकल्येल बनेलनं बूट पुसताना बगून आईनं आतल्या चुली फुडणंच नेम धरून डीचकं फेकून गण्याचा पाठीवर हानलं, पीठाचं हात धुतलेलं ते खरकाट पानी जरा गण्याच्या अंगावर उडलं तसं गण्या काय तरी बडबड करतच निघाला, तसं आईनं
मंग एक एक करून शेणकुट, पक्कड, दुरडी , चुलीतलं जळकं लाकूड भाईर गण्याला टारगेट करत हुती, फुकनी युस्तर गण्या रेंजच्या भाईर गेलता. फुकनीच्या आवाजानं म्हस जरा बिथरली ती बी तेवढ्या फुरतीच.

नाम्या अन लकसुच्या घराला यडा घालून गण्या वगळीतनं अगदी सराईतपणे भजी, समोसं, अन गव्हाची खीर चुकवत डांबरिला निघाला.

लिंबाच्या झाडाखाली रोजची ग्याग हुतीच. गण्याला रोजच्या पेक्षा टापटीप बगून दोस्त मंडळीन गण्याला गरडाच घाटला.
आर गण्या आज काय हॅपी बड्डे गिड्डे हाय व्हय आं ? का कुनीकडं लग्नाला निगालायस रं? असं म्हणत थोडक्यात गण्याची शाळा सुरू झाली, गण्या मात्र लाजत हुता बोलत काहीच न्हवता तेवड्यात ढालंगाव-अंजनी मार्गे जाखापुर यष्टी खडखतच आली अन यष्टीत चडाय लगबग सुरू झाली, सगळी चढली अन शेवटी राह्यलेल्या गण्यानं भाईरनं जोरात दार ढकलून दिलं. जाऊदे मास्तर.

तवर 4 टाळकी खिडकीतन मुंडकी काढून गण्याला ईचाराय लागली आर गण्या काय झालं तू येत न्हाईस व्हय ? तवर कंडकटर ने त्या पिवळ्या दोरीची बेल वडली टिंग टिंग जाऊदे.

गण्या आज तेज्या खास दोस्तसंग दत्तू गुरवाच्या संग M-80 वर बसून कालेजला जाणार हुता.
टररर करत दत्तू बी आलाच.

2 दिसा अदूगर बांधावरच्या भांडणवरनं म्हारुती पाटलानं दत्तूच्या बा ला तिथं बांधावरच उखळात घालून हाणला हुता, दोनी पाय, एक हात, 3-4 दात आणि सगळी हाडं पार खिळखिळी करून ठुली हुती.

म्हारुती पाटील हुताच लै डेंजर. अन ह्यो म्हारुती म्हंजी गण्याचं सक्का चुलता. अदुगारल्या पिडीची दुश्मनी असली तरी नव्या पीडिनी ती परंपरा असल्यागत फुडं न्हेली न्हवती. गण्या अन दत्तूची दोस्ती पक्की हुती.

गाडीनं कॉलेजला न्ह्याच्या बदल्यात एक तबाकुची पुडी आन ष्टांडवर भजी असा सौदा ठरला हुता.

हात पाय मोडलेत म्हणून 2 दिवस डेरीला दूध घालाय खंड पडला हुता आन त्यात आज कॉलेजला गाडी न्ह्याय दत्तूचा बा व्हय म्हनला हुता, आन येताना वडगावतनं एकनाथ पाटलाकडनं पेंड बी घियुन ये असा दम बी दिलता.

आज गण्या यष्टीत असता तर डायवर सकट सगळ्यांनी लै हयराण केलं असतं म्हणून तंबाखूची पुडी आन भज्याची तडजोड करत दत्तूच्या गाडीवर त्यो निघाला हुता.
गण्या दिस्तू तेवढा यडछाप न्हवता.

म्हागं बसलेल्या गण्यानं चालत्या गाडीवरनच कडनं जाणाऱ्या गाईला डाव्या हातानं शिवून पाया पडला, बेसावध असताना नकळत स्पर्श झाल्यानं गाय बी जरा गंगारली अन कातडी थरथरत शेपूट वर करून रूट बदलत कांद्यात पळत गेली, थोडक्यात रस्त्यानं जाताना असल्या छेडछाडीची तिला सवय न्हवती.

दत्तू-आर नीट बस की अस का कारायलास? बॅलन्स जाऊन पडलो असतो की दोगं

गण्या-आर पाया पडत हुतो गायीच्या

दत्तू - गायीच्या ? आर मस हुती ती

गण्या-गांजा बिंजा वडलायस का काय सकाळी सकाळी ?
काय हुतं ते बगाय दत्तून गाडी 180 कोनात वळवली अन जाऊन बगुस्तोवर ती कांद्यातन घवात पल्याड निगुन गेलती. गण्याचं पिरेम डोसक्यातन डोळ्यात उतरलाय असं वाटत हुतं दत्तूला.

फुडं फाट्यावर मिरज-पंढरपूर रस्ता वलांडून पल्याड गेल्यावर लिंबाखालच्या म्हसोबाला गण्यानं हात जोडलं. आन त्यो म्हसोबाच हुता

कॉलेजात पोचूस्तर वर्ग सुरू झालते, दोघबी वर्गात शिरलं तसं सगळी पोरं उगाच हासाय लागली. मास्तरनं एक दोगाला खडू फेकून मारत वर्गाला शांत केलं.
वर्गात काय शिकवालेत हे गण्याच्या पार छपरा वरनं जात हुतं, रोजच्या परमानं.

2 लेक्चर नंतर कालेज सुटलं, आज अर्धाच दिवस कालेज हुतं, उद्या अरवड्याची जत्रा असती म्हणून आज अर्धा आन उद्या फुल डे सुट्टी.

कॉलेज सुटलं तसं ती बी बाकी पोरींसंग मास्तरला गराडा घालून पुस्तकातलं कायतरी दौट ईचारत हुती.

हिकडं गण्या गेटवर दत्तूसंग तिजी वाट बगत हुता
पोरीला पयल्यांदा ईचारायची तेजी अजूनबी हिम्मत हुत न्हवती, तरीबी दत्तू तेला तंबाकू मळत उत्तेजन देत हुता.

आर दत्त्या काय गडबड झाली आन घरला जर कळलं तर बा जित्ता न्हाई ठिवायचा मला.
आर भडव्या घाबरतुस काय ? तिथं आखाड्यात जाऊन रोज मार खातूस तवा काय न्हाई, आन हितं पोरीला भेतूस व्हय रांडच्या ? कसला पैलवान र तू ?

कसंनुसं गण्या सगळी डेरिंग गोळा करून हुबा हुता, ती गेटकडं यायला निघाली अन दत्तू वडाच्या म्हाग लपला, गण्याच्या कलेजीची धडधड वाढाय लागली, ती जवळ आली अन गणून तिला अडवलं !!!

गण्या - अगं ऐक की
ती- काय ?
गण्या-लवशीप देती का? तू लै आवडती मला

हे ऐकल्याबरोबबर तिनं खाडकन गण्याच्या मुस्काटात लावली, हे बगून दत्तून आक्की तंबाकू तितच गिळली.

ती -काय म्हनलास रे रताळ्या ?

आता मात्र गण्याचं टाळकं सटाकला

गण्या- अंग भवाने ऐकू आलं न्हाई तरी कानाखाली मारलीस ? तुझ्या आईचा दाना तुझ्या भैऱ्या भोकाची

असं म्हणत गण्यानं एक हात तिच्या खांद्यावर अन दुसरा हात दोनी पायाच्या मधी घालून तिला उचलली आन बाभळीच्या सर्पणावर उलटी करून दाणदिशांन आपटली अन आपल्या वस्तादनं शिक्युलेला डाव अगदी पयल्यांदा करून दावला

ती लागली बॉम्बलायला अन हे बगून दत्तू गाडी तितच सोडून झाडामागनं पसार झाला, दत्तू दिसना म्हून गण्या बी गांडीला पाय लावून पळून गेला.

ही गोष्ट सगळ्या गावाला समजली.

माज्या पुतण्याला तुझ्या पोरानं नादी लावून ह्यो असला खेळ केला म्हणून म्हारुती पाटलांन दत्तूच्या बा ला पूना हानलं. उरलेला पाय, जमतील तेवडं दात, अन उरलेली हाडं बी खिळखिळी करून सोडली.

हिकडं गण्याचं बा आन तेजी आई इरुद्ध गण्या एकटा असा एकतर्फी फ्री ष्टाईल सामना घरात रंगला.

आजूबाजूच्या घरातली 10-12 माणसं जी आधी प्रेक्षक हुती त्यांनी मदी युन गण्याला मरणाच्या दारातनं सोडवला.

त्या दिसापासनं गण्याचं कॉलेज, गण्याची वन साईड लव ष्टोरी, गण्याची कुस्ती, दत्तूच बी शिकशान, गण्याचं यष्टीचा पास, दत्तू- गण्याची दोस्ती , म्हारुती अन दत्तूच्या बा चा बांधाचा वाद हे सारं एकडाव संपलं

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

4 Jul 2018 - 9:56 pm | शाम भागवत

मस्त.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2018 - 10:15 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या

असं म्हणत गण्यानं एक हात तिच्या खांद्यावर अन दुसरा हात दोनी पायाच्या मधी घालून तिला उचलली आन बाभळीच्या सर्पणावर उलटी करून दाणदिशांन आपटली अन आपल्या वस्तादनं शिक्युलेला डाव अगदी पयल्यांदा करून दावला

Aga ga ga... खतरी livlay

जयन्त बा शिम्पि's picture

5 Jul 2018 - 1:32 am | जयन्त बा शिम्पि

शेवटी तात्पर्य काय तर पैलवानाची अक्कल गुढघ्यात च म्हणायची की ! !

म्हारुती अन दत्तूच्या बा चा बांधाचा वाद हे सारं एकडाव संपलं

हे कसं काय जमवलं

सतिश पाटील's picture

5 Jul 2018 - 11:26 am | सतिश पाटील

2 येळला हाडं मोडूस्तोवर मार खाल्ल्यानं दत्तूच्या बा नं समजूतदार पना दाखून माघार घेतली. म्हारुती हुताच लै डेंजर.

सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 10:39 am | सोमनाथ खांदवे

जबरदस्त लिवलंय वो पाटील सायेब , झक्कास बनलाय गावठी रस्सा . रोजरोज वरणभात आणि तुंप खाऊन बी कटाळा च येतो.

टर्मीनेटर's picture

5 Jul 2018 - 11:32 am | टर्मीनेटर

लई भारी !

श्वेता२४'s picture

5 Jul 2018 - 12:27 pm | श्वेता२४

मस्त जमलीय. हहपुवा

सस्नेह's picture

5 Jul 2018 - 2:53 pm | सस्नेह

अरारारा !
पाक धुरळा ! =))

दुर्गविहारी's picture

5 Jul 2018 - 3:10 pm | दुर्गविहारी

मस्तच ! :;;;-)

बाबा योगिराज's picture

5 Jul 2018 - 10:51 pm | बाबा योगिराज

लै झ्याक भट्टी जमलीय बग पप्प्या. मायच्यान ईतक दिस ह्ये कूट लपून ठुल व्हत रे लगा?

ईद हाटीलात बसून एकलाच हासायलोय, समदी मंडळी येडा का खुळा असलं लुक द्यायलीय. एकच लंबर लिवलय बे. अजून असलं तर यु दे. एक बिअर अन फुलचंद-रिमझिम पान खाऊ घालीन.

तुपला दोस्त
बाबा योगीराज

सतिश पाटील's picture

6 Jul 2018 - 10:34 am | सतिश पाटील

धन्यवाद योगी आणि सर्वांना. बियरसाठी मला आता तिकडे यावे लागेल असं दिसतंय.

शाली's picture

6 Jul 2018 - 9:05 pm | शाली

हसुन हसुन पुरेवाट!

रातराणी's picture

7 Jul 2018 - 4:07 am | रातराणी

जबरदस्त!!

पी. के.'s picture

12 Jul 2018 - 5:12 pm | पी. के.

1 लंबर लिवलंय

सतिश पाटील's picture

13 Jul 2018 - 8:15 am | सतिश पाटील

धन्यवाद सर्वांना

सतिश पाटील's picture

13 Jul 2018 - 8:15 am | सतिश पाटील

धन्यवाद सर्वांना

सतिश पाटील's picture

13 Jul 2018 - 8:15 am | सतिश पाटील

धन्यवाद सर्वांना