सोने : चकाकती प्रतिष्ठा !
सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.
सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.
आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.
सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?
आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.
अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा सुवर्णरोख्यामध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे.
भौतिक स्वरूपातील सोन्याला पर्यायी गुंतवणूक म्हणून केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची योजना दोन वर्षांपूर्वी आणली.सध्याच्या नियमानुसार, या सुवर्ण रोख्यांत एका वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५०० ग्रॅमपर्यंतच गुंतवणूक करता येत होती. आता दर आर्थिक वर्षांसाठी व्यक्तींना ४ किलो, हिंदू अविभक्त कुटुंबाला (एचयूएफ) ४ किलो, तर सरकारने मान्यता दिलेल्या ट्रस्ट व त्यासारख्या संस्थांना २० किलोंपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे.
सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.
( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. ).
*************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत आहे. सोन्यासारख्या
एस, आभार .
एक शंका
भारतीय (स्त्री / पुरुष),
गेली १००० वर्षे
सर्वांचे आभार. हा विषय बहु
भारतातील सुवर्णरोख्यांसंबंधी
सोन्याची घसरलेली मागणी
सुंदर लेख.
त्यात रिझर्व बँकेचे ५५७.७ टन
वंटास प्रतिसाद काका!
देवस्थान मंदिरे यांचे अंदाजे
देवस्थान मंदिरेयांचे अंदाजे/ज्ञात सोनेइतर ठिकाणचे ज्ञात हक्क*/साठेयात समाविष्ट आहे. बर्याच मोठ्या मंदिरांच्या धनाबद्दल सहजरित्या माध्यमात चर्चा होते, त्यांच्या संपत्तीची उघड मोजदाद होते, किंवा त्यांना सहज सरकारी अधिकार्यांच्या प्रशासनाखाली आणले जाते (उदा : केरळमधील पद्मनाभमंदीर, तिरुपती बालाजी मंदीर, इ), त्यामुळे त्यांच्या सोन्यासंबंधी माहिती काहीश्या विश्वासू अंदाजाने सांगता येते. मात्र, हे सर्व धर्मसंस्थांबाबत करा असे म्हटले तर राजकिय भूकंप होऊन भारतिय लोकशाही घोक्यात येईल ;) , त्यामुळे त्यांच्या सोन्याबद्दल अंदाज शक्य नाही. असे काही असले तरी, राजकारण सोडून, केवळ अर्थकारणाच्या रुपात बघितले तर, घराच्या/संस्थांच्या किंवा बँकेच्या लॉकर्समध्ये पडलेल्या सोन्याचा काही भाग खेळत्या अर्थव्यवस्थेत आला तरी खूप फरक पडेल. दोनेक वर्षांपासून सरकारने असे सोने खेळत्या अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी एक डिपॉझिट/बाँड योजना जाहीर केली आहे. तिरुपती बालाजी देवस्थानाने तिचा वापर करून (SBI Gold Scheme) बँकेत अगोदरच ठेवलेल्या सोन्यात १,३११ किलो सोन्याची भर टाकली होती आणि त्यांचा बँकेतील सोन्याचा आकडा ५ (पाच) टनापर्यंत वाढवला होता. इतर काही देवळांनीही कमीजास्त प्रमाणात योजनेत सहभाग घेतल्याच्या बातम्या पाहिल्याचे आठवते. हिंदू देवस्थानाच्या व्यवस्थापनात राज्यसरकारच्या नेमणूका होत असल्याने हे असे काही शक्य होते. इतर धर्माच्या कोणत्या संस्थेने या योजनेचा उपयोग केल्याचे माध्यमांत तरी नजरेस आलेले नाही.डॉ सुहास,
व्यक्तिगत पाळीवरील उपाय
सहमत. तसे केल्यास सोन्याशी
ह्याच विषयावर इथे भरपूर चर्चा
सोन्याची दुसरी बाजू
१. राष्ट्रांच्या बाबतीत सोने
राष्ट्रिय सोन्याची तुलना
कठीण समय येता कोण कामास येतो?
दुसरी बाजू
पेढीय व निजी स्वामित्व
हा फरक वर दोनदा लिहिला आहेच.
भावनिक व व्यावहारिक सोनं
वरचा प्रतिसाद परत एकदा
फरक ही माझी शंका नव्हे
सोने हे सोनेच असते... ते
अर्थव्यवस्थेला मारक असलेला...
देशाची बाजारातली पत व तिजोरीतलं सोनं
उत्तरे स्पष्ट असलेले प्रश्न
भारताला श्रीमंत लोकांचा गरीब
सुंदर अभ्यासपूर्ण प्रतिसाद
Before All This Is Over, Gold Is Going Through The Roof
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...एकाने खाल्लं तर शेण, मिळून खाल्ली तर श्रावणी
असे काहितरी लिहून येईल असे
सगळ्यांनी मिळून ठेवलं तर भारी उत्पादक बनतंसरकारी सोने म्हणजे देशातल्या सगळ्या नागरिकांचे खाजगी एकत्रित सोने नव्हे, तर भारतिय (किंवा इतर कोणत्याही देशाच्या) रिझर्व बँकेच्या ताब्यात असलेले सरकारी मालकीचे सोने; हे तुम्हाला माहीत असेल असे वाटले होते ! असो. २. चर्चा सोन्याबद्दल चालली होती, इतर कश्याबद्दल नाही, तेव्हा इतर कोणत्याही संसाधना/तारणाबद्दल इथे चर्चा करणे अस्थानिय आहे. आता, तुम्हाला 'मुद्दा ध्यानात येत नाही' की 'मुद्दा समजावून घ्यायचा नाही याकरिता गोल पोस्ट बदलणे चालू आहे' यापैकी काय आहे हे तुम्हीच सांगू शकाल. वरच्यासारखे काहितरी लिहून येईल असा अंदाज होता, म्हणूनच लिहिले होते... सोन्याच्या बाबतीत तरी, "अर्थकारणाचे तुमचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे. आता ती तफावत इतर बर्याच अर्थशास्त्रिय मुद्द्यांच्या बाबतिंत आहे, असे दिसत आहे !आकलनातली तफावत
१. जनतेच्या खाजगी सोन्याला
२.
कारण की "अर्थकारणाचे लोकांचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे.हे हवेतले विधान आहे ! =)) =)) =)) हे लोकांचे मत आहे असे ओढून ताणून बळजबरीने म्हटल्याने तुमच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते, हे तुमच्या ध्यानात आले आहे काय ?! :) {बाय द वे, वैयक्तिक अर्थशात्र/तर्कशास्त्र (प्रायव्हेट इकॉनॉमिक्स/लॉजिक) = वैयक्तिक गैरसमजांवर आधारित चुकीचे अर्थशास्त्रिय/तर्कशास्त्रिय तर्क/विधाने} (अ) अर्थशात्रावरचे लिखाण, (आ) या विषयाचा अभ्यास असलेल्या ज्या लोकांशी माझा व्यावसायिक व वैयक्तिक स्तरावर संबंध आलेला आहे, (इ) अर्थशात्राचा जरासाही अनुभव/अभ्यास असलेले लोक, इत्यादींपैकी कोणाचेही मत तुमच्याशी जुळत नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. जागतिक / राष्ट्रिय अर्थकारणाबद्दलचे तुम्ही स्वतःचे वैयक्तिक तर्क व गैरसमज बाळगण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. असो, हा वास्तवावर अवलंबून असलेला वादविवाद न राहता, खाजगी तर्कावर (प्रायव्हेट लॉजिक) बेतलेला वितंडवाद होऊ लागला आहे... तेव्हा तो अधिक विनोदी बनण्याअगोदर त्याला माझ्यातर्फे पूर्णविराम देत आहे. धन्यवाद !सामान्य भारतीयाची विचारसरणी
एक आठवण :
नुकतेच आपल्या रिझर्व्ह बँकेने
करोनाचे धक्के..
चलनफुगवटा
सोने आणि इक्विटी
सोने आणि इक्विटी
अ वि