घनदाट अरण्यातून सड्यावर
कंजूस काकांनी लिहिलेल्या येऊर भटकंती-संजय गांधी उद्यानह्या धाग्यामुळे एप्रिल मध्ये केलेल्या आंबा घाटाच्या भ्रमंतीची आठवण आली.
पुण्यावरून दुपारी मी व माझा एक मित्र असे दोघेच निघालो ते संध्याकाळी ६ च्या सुमारास आंबा गावात पोहोचलो. कराड - कोकरूड - मलकापूर - आंबा असा हा प्रवासाचा टप्पा. आंबा हे घाटमाथ्यावरचे गाव तर साखरपा हे पायथ्याला, अर्थात कोकणात. आंबा गावात राहण्याच्या सोयी बर्याच आहेत त्यापैकीच एका ठिकाणाची निवड करून तिथे मुक्काम टाकला. ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल जंगल रिसोर्ट.
दुसर्या दिवशी लवकरच उठून त्यांचा एक उत्तम माहितगार वाटाड्या घेऊन सड्यावरच्या भ्रमंतीसाठी निघालो. सडा म्हणजे ज्वालामुखीजन्य दगडांपासून बनलेले खडकाळ पठार. गाडी घेऊन विशाळगडाच्या फाट्यावर वळलो. आंबा गावातून विशाळगड साधारण ३० किमी तर पावनखिंड २५ किमी. तर सड्याचा डोंगराचा फाटा १३/१५ किमी. हा सड्याचा डोंगर तिथल्या परिसरातला सर्वोच्च पॉइन्ट. आंबा गाव सोडताच २/३ किमीवरच जंगलाचा भाग चालू होतो. सह्याद्रीतील सदाहरित पट्ट्याचा हा भाग नेहमीच गर्द आणि घनदाट वनराईने नटलेला. थोडं पुढं जाऊन गाडी रस्त्याच्या लावली. इथून एक पायवाट सड्याच्या डोंगरावर जाते. ह्या पायवाटेवरून ६/७ किमी चालले की आलाच सड्याच्या डोंगराचा माथा.
महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम जंगल इथल्या भागात आहे. चांदोली विभाग. इतकं घनदाट जंगल तर जावळीच्या खोर्यातही मी पाहिलेलं नाही.
रस्त्यानजीकच गाडी लावून जंगलात घुसलो. सुरुवातीला रूंद असलेली पायवाट थोड्याच वेळात अरुंद होत जाऊन चढणीला लागते.
पायवाट सुरु होताना
गच्च रानाची सुरुवात
हळूहळू रान अधिकाधिक घनदाट होत गेलं. पाऊलवाटा बुजायला लागल्या. इथे पायवाटांवर सर्वच ठिकाणी पानांचा प्रचंड सडा पसरलेला आहे त्यामुळे वाट अजिबात ध्यानात येत नाही. अर्थात काही काही ठिकाणी दिशादर्शनासाठी झुडपांना लाल रंगातल्या रिबीनी बांधलेल्या आहेत पण तरीही येथे माहितगाराशिवाय कदापिही जाऊ नये.
आता वाट चढाला लागली होती. हुप्प्यांचे किच किच आवाज येत होते, बुलबुलांची किलबिल तर सदैव चालू होती. मधूनच एखादा तांबट किटिर्र..कुर्र अशी साद घालत होता. अचानक डोक्यावरील झाडीतून एक तुरेवाला सर्पगरुड उडत गेला. निसर्गाची किमया बघत बघत एका पाणवठ्यावर पोहोचलो. खडकाच्या कपारीतून स्त्रवणारा एक लहानसा जीवंत झरा. शेजारच्या माती दगडांवर इथे असंख्य प्राणी, पक्षी येऊन गेल्याच्या खुणा. थोडेसे पाणी पिऊन पुढच्या वाटेला लागलो.
घनदाट अरण्य
आता पदराची वाट संपून छातीवरील वाट सुरु झाली होती.
मध्येच एका ठिकाणी बिबट्याची विष्ठा दिसली. काळसर आणि केस अडकलेली. त्यामुळे ही बिबट्याची हे सहजच ओळखू येते. इथल्या रानात पूर्वी पट्टेदार वाघ खूप होते पण आता केवळ बिबटेच. जवळपास दीड तासाने जंगलातून बाहेर आलो. आता इथे खडकांचे लहानमोठे गोटे लहानशा पठारावर पसरलेले दिसायला लागले. एव्हाना आम्ही बर्याच उंचीवर आलो होतो. सड्याची सुरुवात झाली. अचानक डाव्या बाजूला एक उग्र कुबट असा वास पसरला. ह्याच वासाचा अनुभव मी राजमाचीलाही एका भल्या सकाळी घेतलेला होता. हा वास होता बिबट्याचा. वासावरून हा प्राणी सहज ओळखता येतो. जंगलात बिबट्या आमचा पाठलाग करत होता. हा प्राणी लाजाळू. तुमच्या अगदी जवळ असूनही तुम्हाला कधीच दिसणार नाही. सहसा हल्ला करणार नाही. शिवाय आम्ही तिघे असल्याने तो हल्ला करेल अशी दुरुनही शक्यता नव्हती. थोड्याच वेळात हा वास नाहीसा झाला. वाट परत एका लहानशा जंगलपट्ट्यात घुसली आणि पाचेक मिनिटात बाहेर आली ती एका विस्तीर्ण सड्यावर.
सड्याची सुरुवात
सडा
सडा
सड्यावरून चालत जात जात कड्याच्या टोकाशी गेलो. तिथेच सड्याचे दगड बुरुजांसारखे रचून उंचवटा तयार केला आहे आणि त्यावर भगवा ध्वज रोवलेला आहे. संपूर्ण सड्यावर गव्यांची विष्ठा अतिशय प्रचंड प्रमाणावर पसरलेली आहे. शिवाय त्यांचे खुरांचे ठसे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. इथल्या जंगलात गवे भरपूर. रात्री शिरलात तर अगदी सहज दिसावेत. इथल्या सड्यावर रात्री ते मुक्कामासाठी येत असणार. जागा सुरक्षित.
सड्यावरील बुरुजांचे बांधकाम.
सड्याच्या टोकाला तुटलेला कातळ आहे. डेड एन्ड. इथून विशाळगड आणि तिथे जाणारा रस्ता दिसतो. आम्ही जिथून आलो ती जागाही येथून दिसते.
आमची गाडी उभी आहे ती जागा. झूम इन.
इथल्याच उजवीकडच्या पायवाटेने दाट जंगलात घुसलो होतो.
सड्याच्या टोकावरचे विभाजीत झालेले कातळ
सड्यावरून दिसणार्या सह्याद्रीच्या रांगा
सह्याद्रीच्या रांगा
विशाळगड
विशाळगडावरील मलिक रेहानचा दर्गा
अंजनाची फळे
फुलपाखराचे विभ्रम
सड्यावर आधी चोहोंकडचा निसर्ग बघून अर्धा तास एका जागी शांत पणे बसून राहिलो. आता येथून परतायची वेळ झाली होती. निघालो. आलो त्याच आणि एकमेव वाटेने छातीवरील चढण उतरून पदरातल्या दाट झाडीत शिरलो व तासाभरात रस्त्यावर आलो. जिथे गाडी होती तिथे. आता संध्याकाळी जायचे होते ते पावनखिंडीत.
वाचने
33036
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
मस्त! थोडे अजून लिहायचेस की.
अप्रतीम!
छान भटकंती
तुझ्याबरोबर जंगलात हिंडतोयं असं वाटलं
In reply to तुझ्याबरोबर जंगलात हिंडतोयं असं वाटलं by संजय क्षीरसागर
+१, तुमच्या बरोबरीने जंगलाततुमच्याआहे असं वाटलं
हा खरा संकेतस्थळाचा उपयोग!पूर्ण सहमति!एप्रिलपासून एवढा चांगला लेख
In reply to एप्रिलपासून एवढा चांगला लेख by कंजूस
तसे बरेच लेख अजून लिहिलेले
In reply to तसे बरेच लेख अजून लिहिलेले by प्रचेतस
मस्तच !!
मस्तच! पावनखिंडीत गेला होतास
जंगलाचे फोटो जबरद्स्त आलेत.
मस्त भटकंती, लेख आणि
सुंदर फोटो,मस्त भटकंती
In reply to सुंदर फोटो,मस्त भटकंती by अजया
+१
ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल
In reply to ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल by प्रभाकर पेठकर
काका अहो...
In reply to ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल by प्रभाकर पेठकर
धन्यवाद काका
In reply to धन्यवाद काका by प्रचेतस
धन्यवाद वल्ली.
In reply to धन्यवाद वल्ली. by प्रभाकर पेठकर
ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य
ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य उपभोगता आहात ते पाहता 'वल्ली' हे नामाभिमान अगदी चपखल आहे.अगदी हेच !In reply to ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य by डॉ सुहास म्हात्रे
+++१११ म्हणूनच तर आंम्ही हे
In reply to धन्यवाद काका by प्रचेतस
वा!
सह्याद्री ज्वालामुखीजन्य असल्याने छाती, पदर ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. डेक्कन ट्रॅप- उतरत्या पायर्यासारखी अशी ही रचना. सर्वप्रथम येतो तो डोंगराचा माथा. कधी कधी त्यावर डाइक किंवा वॉल्केनिक प्लग ह्या रचनांमुळे तयार झालेली शेंडी आढळते. मग येतो तो काहीसा सपाट असा डोंगरमाथा. त्याखाली तीव्र उताराचा गळा. ह्या पट्ट्यात एक लहानसा दाट झाडीचा टप्पा असतो. मग त्याखाली येते ती छाती. जवळपाश नव्वद अंशातला हा उभा कातळ. छातीखाली येते ती पदराची वाट. ही वाट पायथ्यापर्यंत जाते.हे असं वर्णन म्हणजे अप्रतिम निसर्ग-काव्य आहे!In reply to धन्यवाद काका by प्रचेतस
@ पेठकर काका : होय ती फळे
In reply to @ पेठकर काका : होय ती फळे by प्रमोद देर्देकर
धन्यवाद.
जबरी भटकंती...
In reply to जबरी भटकंती... by आदूबाळ
शेवटून दुसरं फुलपाखरु हलतंय
हे शब्दप्रयोग नवीन आहेत. जरा नीट विस्कटून नाही सांगितले....
आई शप्पथ. लय भारी बे, खूप
मिपा'सदस्य' वल्लीचे मित्र
मस्तच
मस्त...
असा सडा अन त्या पुढच्या
बहुत खूब!
एक्दम झक्क्कास
(No subject)
लै भारी
अरे वाह!!
मस्त!!
झकास फोटो !
In reply to झकास फोटो ! by सस्नेह
क्षत्रपाधिपती चक्रपाद
अप्रतिम प्रवास वर्णन पुन्हा
अप्रतिम. डोळे निवले फोटु
एकदम निवांतपणा जाणवला लेख
मस्त रे कचकचीत फोटू
आँखो देखा हाल !
झकास वर्णन आणि फोटोसुद्दा,
लेख आवडला… सध्या
In reply to लेख आवडला… सध्या by विअर्ड विक्स
"प्रकल्पग्रस्त" हा शब्द आवडला
अप्रतिम. जाणार म्हणजे जाणार
जेव्हा दगड धोंडे पाहायचे
In reply to जेव्हा दगड धोंडे पाहायचे by सतिश गावडे
तिथे तर दगड धोंड्यांचा सडाच
In reply to तिथे तर दगड धोंड्यांचा सडाच by प्रचेतस
>>तरीही ह्या निबिड रानात
अप्रतिम!
वाह !
In reply to वाह ! by प्रसाद गोडबोले
+१११