गट्टे बिर्याणी

manguu@mail.com's picture
manguu@mail.com in पाककृती
16 Jun 2018 - 2:52 pm

गट्टे बिर्याणी

१. भात :

बासमती भात दोन वाट्या धुवुन अर्धा तास भिजुन निधळून घ्यावा. अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. शिजताना त्यात तेल १ चमचा, मीठ , तमालपत्र आणि बिर्याणी मसाला एक चमचा घालावे. भात बाजूला ठेवावा.

२. गट्टे :

एक वाटी बेसन पीठ , तेल, मीठ , तिखट, धना - जिरा पावडर घालून घट्ट मळून घ्यावे. त्याचे लांबट रोल करुन शिजवुन घ्यावेत. गार झाले की तुकडे करावेत.

३. भाज्या :

कांदा , गाजर , बटाटा यांचे मोठे तुकडे , मटार , कॉर्न

भात शिजून जितकी क्वांटीटी होईल , भाज्या - गट्टे ह्यांचीही साधारण तितकीच क्वांटिटी हवी, या बेताने गट्टे व भाज्या घ्याव्यात.

४. आले , लसूण , हिरवी मिरची ह्यांचे मिक्सरमधून वाटण करुन घ्यावे. कोथिंबीर व पुदिना थोडे पाणी घालून त्यांचेही स्वतंत्र वाटण करुन बाजूला ठेवावे.

५. कांदा , ड्राय फ्रूट्स गार्निशिंगला हवे असल्यास तळून बाजूला ठेवावे.

६. कढईत तेल घेऊन त्यात गट्टे फ्राय करुन बाजूला ठेवावेत. नंतर त्यात तेलात कांदा परतावा, इतर भाज्या घालून पुरेसे पाणी घालून एक वाफ येऊ द्यावी. त्यात बिर्याणी मसाला, मीठ व थोडे लाल तिखट घालावे. मग त्यात फ्राय केलेले गट्टेही घालावेत . मिक्सरमधली दोन्ही वाटणे घालावीत. नंतर दही घालून मिसळून घ्यावे.

gb

७. दम देणे :

कुकरमध्ये आधी तेल / तूप घालून एक कान्द्याचा थर द्यावा . त्यावर भाजी गट्टे मिश्रण एक थर घालावा . मग भाताचा एक थर घालावा. ड्राय फ्रुट , पुदिना , कोथिंबीर अधून मधून घालावी. नंतर एक वाटी दूध शिंपडावे. कुकर बंद करुन मंद आचेवर शिजवावे.

खायच्या वेळी सगळे थर हलवून घ्यावेत.

gbb

बासमती तांदूळ , भाज्या उरल्या तर उद्या व्हेज सिझलर करावे. ( sizzler )

गट्टे बिर्याणीBiryaniबिर्याणीगट्टे

प्रतिक्रिया

शाली's picture

16 Jun 2018 - 6:25 pm | शाली

वा! छान लागेल.

भाज्यांचे तुकडे गट्टेमध्येच टाकायचेत बहुतेक. वेगळे नाही?

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 6:53 pm | manguu@mail.com

गट्टे फ्राय करुन बाजूला ठेवायचे.

नंतर भाज्या शिजवून त्यात मसाला घालून मग त्यात गट्टेही घातले.

यशोधरा's picture

16 Jun 2018 - 8:03 pm | यशोधरा

मस्त वाटतंय. करून बघणार. धन्यवाद ह्या पाककृती बद्दल.

एस's picture

16 Jun 2018 - 8:50 pm | एस

भारी दिसतेय.

शंकासुर's picture

16 Jun 2018 - 11:38 pm | शंकासुर

बिर्याणी म्हणलं नॉन व्हेज आयटम होतो पण त्यात तर सगळं व्हेज आहे.

बिर्याणी ऐवजी पुलाव म्हणलं तर जास्त बरोबर राहील असं वाटतं मला

manguu@mail.com's picture

17 Jun 2018 - 1:49 am | manguu@mail.com

त्याचे मसाले व प्रोसेस थोडी भिन्न असते

रमेश आठवले's picture

18 Jun 2018 - 10:16 pm | रमेश आठवले

चिकन बिर्याणी ,मटण बिर्याणी, यांच्या प्रमाणे एक प्रथिन (डाळ) युक्त शाकाहारी बिर्याणी असावी असे वाटत होते. ही उणीव गट्टे बिर्याणीने भरून काढली आहे .

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 10:38 pm | manguu@mail.com

बिर्याणीची आणि चायनीजची व्हेज व्हर्जन्स परिपूर्ण नसतात . मटण चिकन काढून नुसत्या भाज्या वाढवून नुसता भात पूर्ण आहार होऊ शकत नाही.

गट्टे , सोया चँक , छोले , मटार घालावे लागतील

अर्धवटराव's picture

17 Jun 2018 - 5:59 am | अर्धवटराव

तुझं पाककौशल्य माहित नव्ह्तं गड्या. रेसीपी झकास दिसते आहे.

मदनबाण's picture

17 Jun 2018 - 1:12 pm | मदनबाण

अरे वा... छानच ! आवडेश.
बटाट्याचे तुकडे जरा जास्त मोठे आणि जास्त झालेत असं पहिला फोटु पाहुन वाटतं.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बरखा रीतु आयी... :- Sanjeev Abhayankar [ Raag Dhuliya Malhar ]

कालची बिर्याणी सोबत

नूडल्स

केळ बटाटा भाजी

बटाटा मटार टिक्की

सगळे एकत्र घेऊन सिझलर केले

सी

उगा काहितरीच's picture

19 Jun 2018 - 7:10 pm | उगा काहितरीच

हे नेमकं कसं केलं ते येउ द्या ! क्रमवार पाकृच्या प्रतिक्षेत...

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 1:09 am | manguu@mail.com

1. भात उर्फ बिर्याणी कालची शिल्लक होती. ती गरम केली. ताजा veg fried rice करू शकता

2. कच्च्या केल्याच्या फोडी व बटाटा फोडी फोडणीस टाकल्या . नंतर वाटीत हळद , तिखट , मीठ , जिरे पूड , धने पूड घेऊन एक वाटी पाणी घालून मिसळले व ते भाजीत टाकून हलवले. एक वाफ दिली

3. बटाटा व मटार कुकरमधून शिजवून घेतली , नंतर ते कुस्करून त्यात हळद , तिखट , मीठ , धना पूड , जिरे पूड , चाट मसाला घातला. त्यात मिक्सरमधून थोडे पोहे बारीक करून घातले ( याऐवजी मैदा , corn फ्लोर ही घालतात ) . तेल , पाणी घालून घट्ट मळून टिकक्या केल्या . त्या शॅलो फ्राय केल्या.

4. सिझलर सॉस - थोडे बटर घेऊन तव्यात लसूण , टोमॅटो चिरयन घालून भरपूर शिजवले , एकजीव केले , त्यात हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या , टोमयटो सॉस व शेजवान चटणी घालून शिजवले , मग पाणी 40-50 मिली घालून हलवून शिजवून ठेवावे.

4. नूडल्स केले - मॅगी

5. करी प्यान गरम करायचा , त्यात कोबीची पाने रचायची , त्यावर वरचा सर्व ऐवज रचायचा , गरम होऊ द्यायचे , मध्ये मध्ये जागा दिसते तिथे बटर व सॉस सोडायचा , मस्त खरपूस धूर होतो , उरलेला सॉस घाला

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 1:28 am | manguu@mail.com

भात किंवा नूडल्स एकच काहीतरी करा

मिक्स भाज्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता

कॉर्न , मोड हेही शिजवून घेऊ शकता

सोसमध्ये चिली सॉस , सोया सॉस घातल्यास चव चाम्गली येते.

भात, नूडल्स, बटाटा सगळंच कार्ब होतंय.

भाज्या, प्रोटीन वाढवायला हवं.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 11:18 am | manguu@mail.com

planning गडबडीत झाले

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 11:18 am | manguu@mail.com

planning गडबडीत झाले

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 11:19 am | manguu@mail.com

planning गडबडीत झाले

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 11:20 am | manguu@mail.com

planning गडबडीत झाले

उगा काहितरीच's picture

21 Jun 2018 - 8:46 am | उगा काहितरीच

धन्यवाद !

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 2:02 pm | श्वेता२४

करुन बघायला हरकत नाही

II श्रीमंत पेशवे II's picture

19 Jun 2018 - 11:49 am | II श्रीमंत पेशवे II

मस्तच .....

अर्रे वाह! छान दिसतंय दोन्ही!!

Ram ram's picture

20 Jun 2018 - 1:13 pm | Ram ram

लई भारी मंगुराव