✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Wavy Bob - माझी पहिली कादंबरी आता उपलब्ध!

स
समीरसूर यांनी
Fri, 06/15/2018 - 15:00  ·  लेख
लेख
नमस्कार! बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे अधून-मधून मी डोकावून जात होतो पण बर्‍याच व्यवधानांमुळे इकडे येणे थोडे कमीच झाले होते. आता माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली म्हणून त्याची जाहिरात करायला म्हणून आलोय असा आळ माझ्यावर येण्याची शक्यता आहे. :-) खोटे कशाला बोला; अगदी तसे नाहीच असे ठामपणे म्हणायला मी धजावणार नाही. मिपाकरांसमोर खोटे बोलायला जिवावर येते. अर्थात, अधून-मधून माझी हजेरी होतीच आणि वावर, प्रतिक्रिया आणि वाचनापुरता का असेना पण होता. तरी माझे मिपा कुटुंब मला समजून घेईल अशी खात्री आहे. मागील १.५-२ वर्षांपासून वैयक्तिक आणि नोकरीच्या आघाड्यांवर काही महत्वाच्या (आंबट-गोड) घडामोडींमध्ये अडकलो होतो. त्यातच लेखनाचा प्रयत्न, शब्दांशी झटापट, आणि वाक्यांशी कुस्ती असले बरेच हिंस्त्र प्रकार चालू होतेच. शेवटी माझ्या लिखाणाला एक मूर्त स्वरूप मिळाले. Wavy Bob ही माझी पहिलीच कादंबरी (अजून येतील असा भाबडा आशवाद आहे). इंग्रजीत का? कारण असं काही विशेष नाही. मला खूप चांगलं इंग्रजी येतं असंही नाही. वाघिणीच्या दुधात आईच्या दुधापेक्षा जास्त जीवनरस आहे असा ही माझा दावा नाही. इतकी वर्षं इंग्रजी लिखाणात (तांत्रिक आणि कारकुनी पद्धतीच्या) घालवल्यानं आणि त्याच लिखाणानं आजवर मला दोन वेळची भाकरी दिली असल्यानं माझा कल इंग्रजीकडे जास्त होता. म्हणून इंग्रजीत. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे शक्य झालेली कादंबरी आता आपणासमोर सादर करतांना मला आनंद होतोय. खूप दिवसांपासूनचे हे स्वप्न सत्यात उतरलेले पाहून बरे वाटते आहे. Wavy Bob हा पुस्तकलेखनाचा माझा पहिलाच प्रयत्न. कितपत जमला आहे हे माझ्यापेक्षा आपणांसारखी जाणकार मंडळी जास्त चांगल्या प्रकारे जोखू शकतील. आपण ही कादंबरी वाचून आपले मत इथे आणि अॅमेझॉनवर नोंदवू शकलात तर नवोदित लेखक म्हणून मला खरंच खूप बरे वाटेल. ही तसदी आपण सर्वांनी अवश्य घ्यावी ही आपणा सगळ्यांना नम्र विनंती! Wavy Bob ही कादंबरी केतन नावाच्या संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाच्या आशा - आकांक्षांची आणि यशापयशाची कहाणी आहे. सगळ्यांना निश्चितपणे आवडेल असे या कादंबरीचे कथानक आहे. प्रत्येक पानावर वाचकांची उत्कंठा वाढेल अशा पद्धतीने या कादंबरीचे कथानक रचण्यात आले आहे. शिवाय Wavy Bob कोण हे रहस्य पुरेसे इंटरेस्टिंग आहेच. कृपया आपण ही कादंबरी वाचून आपला अभिप्राय द्यावा ही विनंती! एका नवोदित लेखकासाठी आपला अभिप्राय आशीर्वादापेक्षा कमी नसेल. ही कादंबरी खालील साईट्सवर उपलब्ध आहे. https://www.amazon.in/dp/1643243616/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1528912467&sr=8-1&keywords=wavy+bob https://www.flipkart.com/wavy-bob/p/itmf63em2h7ystut?pid=9781643243610&lid=LSTBOK9781643243610ZAMEH7&marketplace=FLIPKART&srno=s_1_1&otracker=search&fm=SEARCH&iid=e13231c9-6e2e-48f9-abc3-f18bb92e5f8b.9781643243610.SEARCH&ppt=Homepage&ppn=Homepage&ssid=.f9s2e99inhq(e+16)1528912615367&qH=ec95ba38260a08db https://www.amazon.co.uk/dp/B07DM2B2ZZ/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1528912558&sr=8-1&keywords=wavy+bob+book https://notionpress.com/read/wavy-bob https://www.infibeam.com/Books/wavy-bob-sameer-suryakant-kulkarni/9781643243610.html#variantId=P-M-B-9781643243610 Ebook: https://play.google.com/store/books/details/Sameer_Suryakant_Kulkarni_Wavy_Bob?id=hBlfDwAAQBAJ Ebook: https://www.kobo.com/in/en/ebook/wavy-bob Ebook: https://www.amazon.com/dp/B07DM2B2ZZ Ebook: https://www.amazon.co.uk/dp/B07DM2B2ZZ/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1528912558&sr=8-1&keywords=wavy+bob+book Ebook: https://itunes.apple.com/us/book/id1396501228 शतशः धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
6222 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मस्त बातमी...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 06/15/2018 - 15:10 नवीन
अरे वा मस्त बातमी अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+1

टवाळ कार्टा
Fri, 06/15/2018 - 15:53 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

विकत घेऊन वाचतो. अभिनंदन!

एस
Fri, 06/15/2018 - 15:17 नवीन
विकत घेऊन वाचतो. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

यशोधरा
Fri, 06/15/2018 - 15:22 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अरे वा ! अजून एका मिपाकराच्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/15/2018 - 17:10 नवीन
अरे वा ! अजून एका मिपाकराच्या टोपीत मानाचा तुरा खोवलेला पाहून आनंद झाला ! अभिनंदन आणि वर्धिष्णू यशासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मनापासून अभिनंदन !

जयंत कुलकर्णी
Fri, 06/15/2018 - 17:21 नवीन
मनापासून अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

कपिलमुनी
Fri, 06/15/2018 - 18:06 नवीन
प्रकाशनाच्या शुभेच्छा ! उत्तरोत्तर यश मिळू दे !
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

सतिश गावडे
Fri, 06/15/2018 - 20:15 नवीन
अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि खुप सार्या

अंतु बर्वा
Fri, 06/15/2018 - 20:55 नवीन
अभिनंदन आणि खुप सार्या शुभेच्छा ..!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

पिवळा डांबिस
Fri, 06/15/2018 - 23:08 नवीन
तुमच्या अशा अनेक कादंबर्‍या प्रकाशित होवोत ही सदिच्छा,
  • Log in or register to post comments

असेच

अनन्त्_यात्री
Sat, 06/16/2018 - 11:02 नवीन
लिहिते रहा!
  • Log in or register to post comments

छान!

कंजूस
Sat, 06/16/2018 - 12:43 नवीन
छान! स्टोरवरचं १०३ पानांचं साम्पल घेतलं, वाचलं थोडं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

समीरसूर
Mon, 06/25/2018 - 13:50 नवीन
काही सूचना असल्यास अवश्य सांगाव्यात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्यवाद!

समीरसूर
Mon, 06/18/2018 - 16:57 नवीन
सगळ्यांना मनापासून धन्यवाद! जमल्यास अ‍ॅमेझॉनवर नक्की परीक्षण टाकावजीही विनंती! समीर
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्वेता२४
Mon, 06/18/2018 - 17:27 नवीन
.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मनिमौ
Tue, 06/19/2018 - 13:07 नवीन
किंडल वर शोधून वाचते
  • Log in or register to post comments

मनापासून अभिनंदन !

मंदार कात्रे
Tue, 06/19/2018 - 19:09 नवीन
मनापासून अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सगळ्यांना धन्यवाद!

समीरसूर
Sun, 06/24/2018 - 14:27 नवीन
सगळ्यांना मनापासून धन्यवाद! :-) आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत ही खूप आनंददायी बाब आहे. कृपया वाचून अ‍ॅमेझॉनवर रिव्ह्यू टाकावा ही नम्र विनंती. आणि आपल्या मित्र-आप्तेष्टांमध्ये आपण जर हे पुस्तक सुचवू शकलात तर फार बरे होईल. पुन्हा एकदा धन्यवाद! समीर
  • Log in or register to post comments

abhinandan sameer

ज्ञान
Sun, 06/24/2018 - 19:59 नवीन
abhinandan sameer
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

समीरसूर
Mon, 06/25/2018 - 13:51 नवीन
धन्यवाद! :-) भेटू आपण पुण्यात असलात तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञान

अभिनंदन

वरुण मोहिते
Mon, 06/25/2018 - 12:18 नवीन
मागवत आहे आजच पुस्तक
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

समीरसूर
Mon, 06/25/2018 - 13:50 नवीन
वरूणजी - धन्यवाद! कृपया आपला अभिप्राय कळवावा ही विनंती! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

अभिनंदन

स्वलेकर
Mon, 06/25/2018 - 17:46 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा