गूढ अंधारातील जग -९
गूढ अंधारातील जग -९
पाण्याखालचे वैद्यकशास्त्र
आता पर्यंत आपण पाणबुडीतील व्यवहार कायकाय आहेत ते पाहिले. आता पाणबुडीतील सैनिकांना आणि डॉक्टरांना कोणत्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते ते पाहणार आहोत.
याचे दोन प्रकार आहेत
१) बंदिस्त जागेत राहण्यामुळे होणारे त्रास २) अतिखोल वातावरणात राहण्यामुळे होणारे त्रास
बंदिस्त जागेत राहण्यामुळे होणारे त्रास-- पाणबुडी हि एका धातूच्या नळकांड्यासारखी असते आणि त्यात दिवस रात्र याच काहीच संबंध नसतो.याचा जवळचा अनुभव आपण घेतला असेल ते म्हणजे रात्री रेल्वेच्या स्लीपर डब्यातून प्रवास करताना अपरात्री उठल्यावर जसे निळसर दिवे अपुरा प्रकाश आणि चारी बाजूनी आवाज असतो तीच स्थिती. पण रेल्वेतील या अंधाऱ्या रात्रीला उद्या उजळणाऱ्या सूर्याची उबदार किनार असते. हि स्थिती पाणबुडीत नसतेच. मग सूर्य उदय किंवा अस्त नाहीच तर २४ तासाचा दिवस असायचे कारणच नाही म्हणून तेथे १८ तासाचा दिवस असतो याचे कारण अभ्यास केल्यावर असे आढळले कि माणूस अशा वातावरणात जास्तीत जास्त सहा तासापर्यंत आपला उत्साह ठेवू शकतो यानंतर त्याची कार्यक्षमता झपाट्याने खाली जाते. म्हणून तेथे सहा तासाचीच शिफ्ट असते. म्हणजे रात्री १२ ते सहा काम (ड्युटी) केले कि परत संध्याकाळी सहा ते बारा मग दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते सहा. पाणबुडीत जास्तीत जास्त जागा हि यंत्रे, अस्त्रे आणि शस्त्रांना दिली असल्याने माणसे कमीत कमी असतात. त्यामुळे कित्येक वेळेस सैनिकांना २४ ते ३६ तास झोपताच येत नाही. याचा एक फायदा म्हणजे पाणबुडीतील सैनिक केंव्हाही आणि कुठेही झोपू शकतात. पण याचा त्रास माणूस जेंव्हा आपली गस्त संपवून घरी येतो तेंव्ह होतो.. रात्री १० वाजता झोपला कि चक्रात सापडल्यासारखा पहाटे ४ वाजता उठून बसतो या निशाच भूतानां तस्मात जागर्ति संयमी. पहाटे ४ वाजता जाग अली कि परत चार पाच तास झोप येत नाही आणि परत सकाळी १० ला झोप यायला लागते. दुसरा प्रश्न येतो ते माणसाचे खोली मापण्याचे (DEPTH PERCEPTION) मेंदूतील केंद्र बिघडून जाते. कारण दिवसेंदिवस २० २५ फुटाच्या पलीकडे पाह्ण्याची सवय गेल्यामुले अंतराचा अंदाजच येत नाही. किनाऱ्यावर आल्यावर दुचाकी किंवा चार चाकी चालवताना माणसाची फे फे उडते यामुळे बरेच लोक वाहन ३० -- ३५ फूट मागे लावतात (पार्क करतात). बंद नळकांड्याचे आपले वेगळे प्रश्न असतात. ते म्हणजे सुरुवातीला असणारे ताजे अन्न संपून जाते. मग डबाबंद अन्न खायला लागते ज्याची चव वेगळीच असते. त्यातून सर्व गोष्टींना कपड्याना डिझेलच्या वाफेचा, रंगाचा, वंगणच्या तेलाचा वास लागतो. काही काळाने या वासाची सवय लागते. परंतु जेंव्हा माणूस परत किनाऱ्यावर येतो तेंव्हा त्याच्या अंगाला कपड्याना आणि त्याच्या इतर वस्तुंना हा वास लागून राहतो. पाणबुडीतील हवा शुद्ध ठेवली जाते परंतु त्यात मुख्यत्वे ऑक्सिजन, कार्बन डायॉकसाईड/ मोनॉ क्साईड, हैड्रोजन( हा पाणबुडीच्या बॅटरीतून निघतो) याचे प्रमाण अचूकतेने ठेवले जाते. परंतु वातविकार असलेल्या लोकांच्या (गंधर्व) वाताचे विविध उमासे आणणारे वास याचा त्रास संपत संपत नाही. विशेषतः सुरुवातीच्या दिवसात जेंव्हा माणसे गस्तीवर जाण्याच्या अगोदर जीवाची मुंबई ( किंवा विशाखा पट्टणम) करून आलेले असतात. त्यातून जर काही कारणाने सैनिकाला टॉर्पेडो/ क्षेपणास्त्राच्या नळकांड्यात झोपायला लागले तर आपुलाची वास आपणासी अशी गंभीर स्थिती होते. महिनोन महिने स्त्रीसुखापासून वंचित राहिल्यामुळे लैंगिक भावनांचा निचरा होत नाही. त्यातून जागाच इतकी अपूरी असते कि हस्तमैथुन करणे सुद्धा कठीण होते. सारखे कोणी तरी आजूबाजूला असते किंवा आवाज येत राहतात. त्यातून एकंदर पाण्याचा सुद्धा सतत तुटवडा असल्याने अंघोळीच्या जागी(शॉवर) सुकलेल्या वीर्याचे ओघळ दिसत राहतात. यामुळे पुरुषाची कामेच्छा मेल्यासारखी होऊ शकते. यामुळे परत किनाऱ्यावर गेल्यावर लिंग शैथिल्य( ERECTILE DYSFUNCTION) आणि शीघ्र पतन (PREMATURE EJACULATION) याचा त्रास बऱ्याच सैनिकांना होतो. याबद्दल अजूनही आपल्याकडे खुले पण पाहण्याची / बोलण्याची सवय झालेली नाही. त्यातून अशा ठिकाणी समलिंगी संबंध खूप जास्त असतात हे गैरसमज लोकातच काय पण लष्कराच्या इतर शाखातही असलेले आढळतात. प्रत्यक्ष समलिंगी संबंध हे सामान्य लोकात आढळतात तितकेच पाणबुडी शाखेत असतात. उलट तेथे संभोग करायला जागाच नसते त्यामुळे असे संबंध प्रत्यक्ष कमीच असावेत. या गोष्टी बऱ्याच लोकांना किळसवाण्या वाटतील परंतु डॉक्टरांना हि वस्तुस्थिती अशी झटकून टाकता येत नाही. claustrophobia किंवा बंदिस्त जागेत राहण्याची भीती हि साधारणपणे फारशी होत नाही कारण मुळात नौदलात काम केलेला माणूस जहाजात या वातावरणाला थोडा फार सरावलेला असतो. त्यातून पाणबुडीचा अभ्यासक्रम १ वर्षाचा असतो त्यात त्याला या सर्व सरावातून जावेच लागते. परंतु एकटेपणा आणि नैराश्य याचा थोडा फार त्रास होतोच. मी येथे नक्की काय करतो आहे असा प्रश्न जवळ जवळ १०० टक्के सैनिकांना पडतोच ( लष्कर नौदल वायुदल सर्वत्र) यासाठी त्यांना स्फूर्ती देण्याचे काम आणि तशी सोय सर्व लष्करी आणि निमलष्करी दलात असतेच.यामुळे आत्महत्येचे प्रमाण सैनिकात पाणबुडी शाखेत सर्वात जास्त आहे. अपुरी झोप(SLEEP DEPRIVATION) आणि दिवसेंदिवस असणारा कामाचा तणाव( CHRONIC STRESS यामुळे पाणबुडी सैनिकांमध्ये हायपर कॉर्टीसॉलीझम (HYPERCORTISOLISM) आणि त्याचे परिणाम ( मधुमेह रक्तदाब वजन वाढणे इ जास्त प्रमाणात आढळून येतात). जागेच्या अभावामुळे तेथे व्यायाम करण्यास वाव फारच कमी असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात ठेवलेली सायकल किंवा ट्रेंड मिल वर व्यायाम करताना डोके आपटते नाही तर हात किंवा पाय लागतात अशा स्थितीत व्यायामाचा उत्साह राहत नाही त्यामुळे वजन वाढण्याची बरीच शक्यता असते. अर्थात भारतीय नौदलात सहसा पाणबुडी सैनिक अतिरिक्त वजनाची शिकार झालेले मी पाहिलेले नाहीत. याचे कारण पाणबुडी शाखेतीळ वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर अशा गोष्टींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवताना मी पाहिले आहे. क्रमशःवर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय
चिंताजनक समस्या.
सर्वसामान्य लोकांच्या गावीही
ही नौसैनिकांच्या आयुष्याची एक
तंतोतंत सहमत
खरं तर आम्हीच अंधारात बसलो
खरं तर आम्हीच अंधारात बसलो होतो तुम्ही आम्हांला आम्ही किती पाण्यात आहोत हेच दाखवून दिले आहे.:)वेगळं जग. उत्सुकता आहे.
धक्कादायक माहिती देताय तुम्ही
वाचते आहे...
बेक्कार !
माहितीपूर्ण भाग
कठीण आहे राव
USS Pennsylvania हि १७-१८
खडतर परिस्थीतीत राहुन सुद्धा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय एम ए स्ट्रीट डान्सर... :- इल्जाम (1986)वाचतोय
आयशप्पत हे तर ....
वाचतोय
यातील अनेक प्रकारच्या समस्या
अंतराळयान व पाणबुडी कर्मचारी
बरोबर. पण नमुना अभ्यास
यातील अनेक प्रकारच्या समस्या
एकंदरीत एका बंद जागेत ठराविक
भारतीय लष्करात स्त्रियांचे
Indian Air Force had 8.5%,
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे .
सैनिकी पेशाबद्दलचा आदर ......