Skip to main content

नेदरलँड्सची सफर भाग -४

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 12/06/2018 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
नेदरलँड्सची सफर भाग -४ एक दिवस ऍमस्टरडॅम मध्ये फिरण्यात घालवून दुसऱ्या दिवशी आम्ही क्यूकेनहॉफ येथे ट्युलिप उत्सव पाहण्यास सज्ज झालो. या उत्सवाची तिकिटे तुम्हाला जालावर काढता येतात आणि हि तिकिटे शिफॉल विमानतळापासून तुम्हाला क्यूकेनहॉफला नेणे आणि आणणे या दोन्ही प्रवासाचा खर्च गृहीत धरूनही काढता येतात. हि सोय फारच चांगली आहे. कारण अगोदरच लिहिल्याप्रमाणे शिफॉल विमानतळ हा सर्व वाहतुकीनी युरोप आणि बाकी सर्व जगाशी व्यवस्थित जोडलेला आहे. त्यामुळे युरोपातील आणि बाहेरील पर्यटक तेथे रेल्वे, विमान किंवा बसने सकाळी येऊन संध्याकाळी परत जाऊ शकतात. असो. आम्ही बस पकडून शिफॉलला पोहोचलो तेथे अक्षरशः दर मिनिटा दोन मिनिटाला क्यूकेनहॉफसाठी बस जात होती. त्यात बसून आम्ही तेथे पोहोचलो. जगातील एक आश्चर्य वाटेल इतकी सुंदर बाग आहे. जगनियंत्याने जितके रंग असतील ते इतक्या कलात्मकतेने तेथे ओतले आहेत कि अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटावे. त्याबद्दल काहीही न लिहिता मला जमेल तितकि प्रकाश चित्रे टाकत आहे. याच साठी केला होता अट्टाहास असे वाटून आल्याचे सार्थक झाले असे वाटले. तरी आम्हाला तेथे जायला थोडा उशीर झाला कारण काही काही ट्युलिप सुकायला लागले होते आणि सुकलेले ट्युलिप तेथील कर्मचारी काढून टाकीत असत ज्यामुळे गर्द असलेले काही ताटवे थोडेसे विरळ झाल्याचे जाणवते. आमच्या सौ ला थंडी सोसत नाही त्यामुळे एप्रिल च्या ऐवजी मी मध्ये आल्याने असे झाले परंतु एकंदर हवामान फारच उत्तम होते अन थंडी गुलाबी होती बोचरी नव्हती. सगळे फोटो माझ्या निकॉन ३३०० कॅमेऱ्याने काढलेले आहेत एकतर पोर्ट्रेट किंवा ऑटो मोड वर काढलेले आहेत. त्यातील जवळ जवळ ३०० फोटो चा दुवा येथे देत आहे. ज्याला पाहिजे त्याने हा दुवा उघडून पाहावा आणि फोटो आवडला तर हवा तेथे वापरावा. (टीप -- फोटो खाली माझे नाव/ श्रेय कृपया टाकू नये). परमेश्वराने दिलेल्या या अनमोल स्वर्गीय ठेव्यावर माझा कोणताही हक्क नाही https://photos.app.goo.gl/fG1YQgCm68Be3yHA8 kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof k kukenhof kukenhof k kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof kukenhof

वाचने 17069
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

शिफॉल विमानतळाच्या बंद काचेमधून आशाळभूतपणे बाहेर बघणेच आजवर जमले. तुम्ही हवी ती सफर घडवलीत.

फुलांचे वर्णन शब्दांनी होऊच शकत नाही.... फार सुंदर फोटो. आवडले.

खरंच नशीबवान आहात , तुम्ही स्वर्गात भ्रमण करताय आणी तुमच्या बरोबर आम्हाला फुकट फिरवल्याबद्दल धन्यवाद ,

फिटले. हे चित्र जास्त चांगले की ते असा प्रश्न पडतो. कारंजे आणि शेवटचे दोन मोठ्ठे त्यूलिप्स जास्त आवडले. धन्यवाद.