आज होळी !
पार्टीला चकना पाहीजे का नको :?
पाहीजे ना ?
चला उठा बघू चला मार्केट मध्ये... भाजी मंडी मध्ये लेका रिलायन्स फ्रेश मध्ये नको... !
मस्त पैकी भाजी निवडा.
१. बंद गोभी
२. कांदा
३. गाजर / मुळे
४. काकड्या
५. पालक / मेथी
६. लिंबू
७. मिठ
८. बस्स झाली लिस्ट पुर्ण !!
मग गल्लीतल्या वाण्याकडे चला.
१. चार अंडी ( प्रत्येकी )
२. हल्ल्दीराम भुजीया
३. उत्तम वटाणे (लाल / पिवळे)
४. रेडी मिक्स मसाला
****
कृती :-
१. बंद गोभी ला आडवा पकडा व हातात सुरी घेऊन त्याला ओट्यावर ठेवा व जोरदार हल्ला चढवा, जेवढे बारिक करता येईल तेवढे बारीक तुकडे बंद गोभी चे करा.
२. कांदा गोल कापा ने आपल्याला बापजन्मामध्ये जमायचं नाय.. त्यामुळे जसा कापता येईल तसा कापा.
३. गाजर चे कातडे काढा.. व त्याचे बारिक बारिक तुकडे करा.
४. काकड्यांचा पण हाल सेम टू सेम गाजरासारखा करा.
५. लिंबू कापून तयार ठेवा.. आडवा कापा.. उभा नको.. लफडा होतो म्हणतात.
६. ते सर्व मिश्रण एका परातीत घाला ( बंद गोभी, कांदा, गाजर्,काकड्या )
७. वरून रेडीमिक्स मसाला टाका जेवढा पाहीजे तेवढा.. हलके मिठ.. चवी साठी.. व लिंबू पिळा.
८. सर्व मिश्रण एकजिव होऊ पर्यंत हवेत उडवा व परातीत धरा.. प्राक्र्टीस असेल तरच उडावा उडवी करा नाय तर सरळ हाताने मिक्स करा.
९. आता ह्या मध्ये हल्ल्दीराम भुजीया व वटाणे पसरवा...
१०. जी अंडी आणली आहेत त्यांचीइ भुर्जी कोणा जाणकार कडून करुन घ्या व ती पण वर तयार केलेल्या मिश्रणावर पसरा.
११. बाटली उघडा व आपला एवन चकण्या बरोबर मज्जा करा... फुलटू !
१२. भांडी, प्लेटे कोन धुणार आहे हे आधीच ठरवा.. नंतर वाद नको.
***
चकना स्पेशल !!!! आप भी खाओ अपने दोस्तो को भी खिलाओ !!!! बाट के खाने से प्यार बढता है..... आप को हमारी रेसेपी अच्छी लगी होगी तो आप हमे लिखना ना भुले... ! - फिर मिलेंगे अगली पार्टी पे .. तबतक नमस्कार!
वाचने
6513
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या
जावे कशाला
In reply to माझ्या by दशानन
राजे
In reply to माझ्या by दशानन
फटु?
अजून
In reply to फटु? by अवलिया
जोरदार...!
In reply to अजून by दशानन
.
राजे पाकृ
३. गाजर चे
(शाकाहारी)
In reply to ३. गाजर चे by मदनबाण
(विषय दिलेला नाही)
In reply to ३. गाजर चे by मदनबाण
लै भारी
In reply to (विषय दिलेला नाही) by दिपक