नेदरलँड्सची सफर भाग -३
मेहुण्याच्या (अक्षय) घरी वास्तव्य असल्याने बऱ्याच गोष्टी फार सुलभ झाल्या हि एक वस्तुस्थिती होती. त्याने आम्ही येणार म्हणून तेथे वापरायची दोन ovi chipkaart नावाची प्रीपेड कार्डे घेऊन ठेवली होती. यात जालावरून पैसे भरायचे आणि बस, ट्राम, मेट्रोमध्ये चढल्यावर आणि उतरताना तेथल्या यंत्रावर टेकवायचा कि आपोआप त्यातून पैसे वळते होतात.
एकंदर युरोपातील हवामान बेभरंवशी असते हे ऐकून माहित होते. त्यामुळे तेथे हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडत होतो. आजकाल हवामानाचा अंदाज बऱ्यापैकी अचूक असतो, त्यामुळे जेंव्हा त्यांनी पाऊस पडेल सांगितले तेंव्हा जवळचीच ठिकाणे पाहायला गेलो आणि हवामान स्वच्छ आणि निरभ्र आहे हे पहिले तेंव्हा क्यूकेनहॉफ सारख्या ठिकाणी गेलो.
यामुळे आमच्या आठही दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला सर्वोत्तम हवामानाचा फायदा घेता आला.
तेथे पोहोचल्यावर दुसरा दिवस हा जवळच सहलीला जाऊ असे ठरवले होते. कारण विमानातील झोप हि तितकी चांगली झाली नव्हती.
दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच म्हणजे ऍमस्टरडॅमला जाऊन तेथली वस्तुसंग्रहालये, कालवे आणि बागा पाहायचे ठरवले. त्यासाठी सकाळी व्यवस्थित नाश्ता करून पाण्याची बाटली घेऊन आणि निघण्यापूर्वी स्वच्छतागृहात जाऊन निघालो.
याचे कारण युरोपात कुठेही स्वच्छतागृहा वापरण्यासाठी अर्धा (४० रुपये) ते पाऊण युरो(६० रुपये) इतके पैसे द्यावे लागतात. शिवाय कुठेही पाणी मिळत नाही. हॉटेलात सुद्धा पाणी विकतच घ्यावे लागते ज्याची किंमत ४ युरो आहे. ३२० रुपये देऊन एक बाटली. आपल्याकडे कोणत्याही हॉटेलात कधीही पाणी फुकट मिळते. मुंबईत तर कोणत्याही रेस्टोरंट मध्ये शिरा टेबलावर असलेले पाणी प्या ते नसेल तर पाणी मग प्या आणि चालू लागा हि सवय असल्यामुळे पाणी विकत घ्यावे हे काही पटतच नाही.
स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे द्यावे हे ठीक आहे कारण ते बांधण्यासाठी आणि साफ ठेवण्यासाठी साधनसामग्री आणि मानवी श्रम लागतात. पण पाण्यासाठी ४ युरो हे काही पटले नाही.जी गोष्ट जवळ जवळ फुकट मिळते ती इतक्या महाग विकत घ्यावी लागते हे चक्क अन्यायकारक आहे असेच वाटते. संपूर्ण ८ दिवसात मी एकदाही पाणी विकत घेतले नाही. सगळीकडे घरचे पाणी घेऊन जात होतो आणि एकदा प्रसंग आला तर मी चक्क ७ अप विकत घेतले जे पाण्यापेक्षा स्वस्त म्हणजे अडीच युरोला १ लिटर होते.
असो.
आम्ही सर्वप्रथम व्हॉन्डेल पार्क या शहराच्या मध्यभागी असलेल्या उद्यानात गेलो. अतिशय शांत फारशी गर्दी नसलेले उद्यान, छान झाडी, मोकळे निरभ्र आकाश आणि हवेत थोडासा गारवा.
त्या उद्यानात भटकून आलो. थोडे फार फोटो काढले. एका ठिकाणी १५ मिनिटे शांतपणे बसून आजूबाजूच्या वातावरणाचा मुक्तपणे आस्वाद घेतला.
थोडावेळ शांतपणे बसल्यावर तेथून जवळच असलेल्या व्हॅन गॉग च्या संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले.
याचे तिकीट तुम्हाला ऑनलाइनच काढावे लागते. याचे दुपारी तीन वाजताचे तिकीट काढले आणि आता फक्त बारा वाजले होते मधल्या काळात काय करावे म्हणून ऍमस्टरडॅमच्या कालव्यातील बोटीचे तिकीट काढले. (१२.५ युरो एका तिकिटाला/ १००० रुपये माणशी). बऱ्यापैकी ऊन होते म्हणून छप्पर असलेल्या बोटीचे काढले. छप्पर असले तरी पुढे किंवा मागे असलेल्या मोकळ्या जागेत जात येते. तसेच छताला काच होती आणि खिडक्या पण मोठ्या मोठ्या होत्या.
अन्यथा उघड्या बोटीचेहि तिकीट मिळते, ते काढले नाही म्हणून बायको जरा नाराज झाली. पण काही वेळाने उन्हाचे चटके बसू लागले तेंव्हा नवरा इतका मूर्ख नाही याची तिला खात्री पटली असावी. असो
ऍमस्टरडॅमच्या कालव्यातील हि सफर सुंदर आहे. त्यात एक गाईडपण होती जी इंग्रजीत सर्व माहिती सांगत होती आणि याचा फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन भाषेत अनुवाद हेडफोनद्वारे ऐकण्याची सुविधा पण होती. या शहराचा इतिहास तेथील बऱ्यचशा सुंदर इमारती या कालव्याच्या काठाने असल्याने पायी फिरण्यापेक्षा असे बोटीने फिरणे फारच छान झाले. बोटीत जागा पण भरपूर होती. त्यामुळे उजवीकडे, डावीकडे असे दोन्ही कडे खिडकीत बसून पाहता आले. ऍमस्टरडॅम च्या कालव्यात किंवा इतर जलमार्गात फिरणाऱ्या या सर्व बोटी या विजेवर चालणाऱ्या( रिचार्जेबल बॅटरीवर) असल्याने तुलनेत बऱ्याच शांत असतात आणि कुठेही रहदारीचा आवाज किंवा वाहनांच्या हॉर्नचे आवाज येत नाहीत त्यामुळे अशा बोटीतून फिरायला जास्त छान वाटते.
कल्पना करा कि पुण्याच्या पेठांमधून गल्ल्याबोळातुन किंवा मुंबईत फोर्ट भागातील इमारती रस्त्यातून शांतपणे बोटीतून फिरून पाहायला किती छान वाटेल. बाकी इमारतींबद्दल त्यांनी वेगवेगळी माहिती सांगितली तितकी आता माझ्या लक्षात नाही( म्हणजे तितकी ती महत्त्वाची नव्हतीसुद्धा).
काही इमारतीचे फोटो (जालावरून साभार).
हि सहल करून आलो तेंव्हा अजून सव्वातास बाकी होता तेवढ्या वेळात पोटपूजा आटपली म्हणजे एक फूटभर लांब "बागेत" (baguette) या पावात चिकन सॉसेज, सॅलड, तीन तर्हेची सॉसेस आणि चीज घालून केलेला रोल घेतला. तेवढ्यात आमचे दोघांचे तुडुंब पोट भरले. ( नाही तरी आम्ही दोघे खाण्यात फुकटच आहोत).
यानंतर परत व्हॉन्डेल पार्कमध्ये आलो. तेथे छान पैकी एका झाडाखाली आम्ही पहुडलो. अर्धा तास निःशब्दपणे आडवे होऊन शांतता ऐकण्याची मजा काही और असते.
तेथे शेजारीच तो म्युझिअम होता.पावणे तीन ला चालत चालत तेथे गेलो. या संग्रहालयात व्हॅन गॉगच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन त्याने काढ्लेली स्वतःची आणि इतर चित्रे पाहिली.
कदाचित माझी अपेक्षा फार असावी पण एकंदर तेथे असलेली चित्रे पाहून बर्यापैकी निराशाच झाली. पिवळ्या रंगाच्या विविध छटातच बहुसंख्य चित्रे होती. पण एकंदर रंग आणि चित्रे पाहून माझी पार निराशा झाली.
व्हॅन गॉगची चित्रे म्हणजे त्यांना चांगलेच म्हटले पाहिजे असा एकंदर ती पाहिलेल्या बऱ्याच लोकांचा अविर्भाव होता/ आहे.
हे म्हणजे के एल सहगल यांची गाणी चांगली आहेत असे म्हटलेच पाहिजे असा भाव येतो. मला चित्रकलेत काहीही समजत नाही. तसा माझा दावाही नाही.
मी काढलेली प्रकाशचित्रे वर काच असल्याने नीट येत नाहीत हे समजल्याने दोन चित्रानंतर मी कॅमेरा बंद केला
जालावर त्यांच्या चित्रांची प्रकाशचित्रे आहेत.
https://www.google.co.in/search?rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&biw=1164&bi…
परंतु एकंदर ऍमस्टरडॅममध्ये संग्रहालये यांचा उदो उदो ( गाजा वाजा- hype) इतका जास्त केला गेला आहे कि तुम्ही तेथे जाऊन अमुक तमुक म्युझियम पहिला नाहीत तर तुमचे आयुष्य फुकट गेले असे म्हणण्यापर्यंत hype केलेली आहे.
( पुण्यातहि याचा अनुभव येतो-- तुम्ही सवाई गंधर्व महोत्सवाला गेला नाहीत? किंवा मी फक्त भीमसेन ऐकतो बाकी सर्व फालतू गायनाला कोण जाणार इ इ ).
ऍमस्टरडॅम येथे एकंदर ४० म्युझियम आहेत. एकंदर प्रत्येक वस्तू जतन करून ठेवण्याची त्यांची पद्धत चांगली आहे (आणि तिचा उदो उदो/ गाजावाजा करून पैसा करण्याची सुद्धा) कोणताही म्युझियम २० ते २५ युरो आहे म्हणजे १५०० ते २००० रुपये माणशी.
हे सर्व पूर्ण वैयक्तिक आस्वादाचा प्रभाव आहे आणि यात व्हॅन गॉग यांचा उपमर्द करण्याचा कोणताही हेतू नाही
शेवटी मला जे आवडतं तेच संगीत/ चित्र मी चांगलं म्हणणार.
असो. आपल्याला चित्रातील काहीच कळत नाही हे गृहीत धरून मी परवाच ३ जून ला मुद्दाम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय( जुने नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) येथे चित्रे पाहायला गेलो. (उलटी तुलना लगेच झाली. तिकीट ८५ रुपये. एक युरो फक्त. पाणी फुकट. प्रसाधन फुकट.) तेथे असलेली असंख्य सुंदर सुंदर चित्रे ज्यात हळदणकर राजा रविवर्मा सारखे आणि काही दिग्गज युरोपियन चित्रकार यांची चित्रे पाहून आलो. हि चित्रे मला नक्कीच जास्त भावली. या संग्रहालयात अक्षरशः २ हजार वर्षा पूर्वी पासूनच्या हडाप्पा संस्कृती लोथल येथील वस्तू कलाकृती पासून ते १८ १९ व्या शतकातील असंख्य कलाकृती, अत्यंत सुबक मूर्ती, वस्त्रे, शस्त्रे, चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तू आहेत. बऱ्याच वर्षांनी आपल्याच देशातील आपल्याच शहरातील इतक्या उत्कृष्ट संग्रहालयात आपण गेलो आणि आपला समृद्ध वारसा पाहायला मिळाला याचा मला अक्षरशः अभिमान वाटला. परत येताना संग्रहालय ते सी एस एम टी स्टेशन चालत आलो आणि मुंबईतील असंख्य १८ व्या आणि १९ व्या शतकातील जुन्या इमारती पाहत पाहत आलो. मध्ये भूक लागली म्हणून महेश लंच होम मध्ये पोटपूजाही केली.
एक गोष्ट मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली आहे कि जोवर भारत देश बऱ्यापैकी पाहून होत नाही तोवर युरोप अमेरिकेत तेथील इमारती/ वास्तुकला स्थापत्य पाहायला जायचे नाही.
वाचने
19957
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
https://photos.app.goo.gl
सर्वात महत्वाचा परिच्छेद...!
आपल्या भारतातच पाहण्यासारखं
एस साहेब
In reply to आपल्या भारतातच पाहण्यासारखं by एस
आणि ते मुंबईला बॉम्बे म्हणतात
In reply to एस साहेब by सुबोध खरे
इतके दिवस दक्षिण मुंबईत
In reply to आणि ते मुंबईला बॉम्बे म्हणतात by सुबोध खरे
मी न्यूयॉर्कमध्ये van गॉग चे
मस्तं चालली आहे सफर. मनाने अ
***एक गोष्ट मी मनाशी खूणगाठ
स्पष्ट
छान
@ सुमीत भातखंडे,
In reply to छान by सुमीत भातखंडे
खरं सांगायचं तर व्हॅन गॉग ची
In reply to छान by सुमीत भातखंडे
सुंदर फोटो आणि माहिती. देश
आपल्या छत्रपती शिवाजी महाराज
वरील प्रतिसादांमुळे काही
फारच छान ........
परत एकदा छान,
मस्तच लिहीलयं. उगाच युरोपला
मूळ मीयुरोपात कशासाठी जातो?
In reply to मस्तच लिहीलयं. उगाच युरोपला by दुर्गविहारी
युरोपात कशासाठी जातो?
हा महत्त्वाचा विचार आहे. यात "खिशात चार पैसे जास्त खुळखुळले की' च माणूस तेथे पर्यटनासाठी जातो हि वस्तुस्थिती. (तेथेच कशाला कुठेही) (यात कंपनीच्या पैशाने किंवा शिक्षणासाठी जाणारे येत नाहीत) फेसबुक इंस्टाग्राम किंवा तत्सम जालावर फोटो टाकण्यासाठी किंवा मित्रमंडळीत भाव खाण्यासाठी जाणाऱ्या लोकांना "युरोपात अनुभव चांगला आला नाही" असे सांगितले तर आपले पैसे फुकट गेले म्हणून लोक आपल्याला मूर्ख समजतील हि अनाहूत भीती वाटत असते. किंवा काही लोक आपली अभिरुची उच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात मग अशाना तेथे "उदो उदो" झालेल्या ( hype) गोष्टी भिकार आहेत असे म्हणणे शक्य नसते. माझ्या बाबतीत माझी अभिरुची काय आहे हे मला लोकांना सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे मला जसे दिसले किंवा जसे जाणवले तसेच मी लिहिलेले आहे. मी एक सामान्य माणूस आहे ज्याला कलेतील काही कळत नाही. एखादी गोष्ट मनाला भावते म्हणून मी ती पाहतो, ऐकतो, खातो किंवा आस्वाद घेतो हि वस्तुस्थिती. ज्यांना कलेची जाण आहे त्यांना माझ्यासारखाच अनुभव येईल असे माझे मुळीच म्हणणे नाही. उदा एखादा अनवट राग ज्याला कळतो तो त्यातील ख्याल/ बंदिश/ विलंबित जास्त चांगला रस घेऊन ऐकू शकतो/ आस्वाद घेऊ शकतो. आणि अर्थात मला माझ्या गरजेपेक्षा चार पैसे जास्त मिळत आहेत जे मी आज खर्च करू शकतो म्हणून मी तेथे गेलो हि पार्श्वभूमी आहेच.छान लेखमाला...प्रामाणिक, उपयोगी माहिती
Van Goghची पेंटिंग्स
Van Goghची पेंटिंग्स त्याचा
वैयक्तिक मत
In reply to Van Goghची पेंटिंग्स त्याचा by सुबोध खरे
सप्तरंगी ताई
In reply to वैयक्तिक मत by सप्तरंगी
प्रवासवर्णन तसेच "कला