Skip to main content

संपादक मंडळ

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 11/06/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही दिवसांपुर्वी संपादक मंडळाला विश्रांती दिली होती. आता संपादक मंडळ परत सक्रिय करतो आहे. या टप्यावर स्पंदना (अपर्णाताई) व लिमाऊजेट संपादन थांबवत आहेत याची नोंद घ्यावी. मिपावरील वातावरण योग्य ठेवण्यासाठी संपादकांना खास अधिकार दिले आहेत. संपादकांना लेखन अप्रकाशित करण्याचा व प्रतिक्रिया संपादित किंवा अप्रकाशित करण्याचे अधिकार आहेत.तुमचे लेखन ( साहित्य) अप्रकाशित केले असल्यास तुम्ही संपादक मंडळ या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवून चौकशी करू शकता. संपादक स्वतःहून स्पष्टीकरण देणे शक्य नाही. नवीन सदस्यांनी मिपाचे धोरन नक्की वाचावे. आणि ज्यांना संपादकांच्या वागणुकीचा अर्थ लागत नाही त्यांनी सुध्दा हे धोरण नक्की वाचावे. अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील. सध्याच्या संपादक मंडळाची यादी खालील प्रमाणे आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे पैसा गवि गणपा इस्पीकचा एक्का स्नेहांकिता अजया वल्ली किसन शिंदे

वाचने 25719
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

सामान्य सदस्य संमंमध्ये गेल्यावर लिखाण का थांबवतात? (गणपाभौंच्या चिकनच्या रेशिपीची वाट पाहणारा) पै.

In reply to by तुषार काळभोर

तेंडुलकरला कॅप्टन केल्यावर त्याचा परफॉर्मन्स खालावतो...ईतर जबाबदार्या वाढल्याने असावे :)

In reply to by तुषार काळभोर

पैलवान भाै, गेल्या वर्षभरात वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असल्याने एकंदर माझे स्वयंपाक घरातले उद्योग थंडावलेत. आशा करतो लवकरच या व्यापातुन मोकळा होऊन पुन्हा मिपाकरांच्यात दंगा करायला हजर होईन. आपाला लोभ असाच राहुद्यावा. :)

हँ? बिरुटे सर तर "मी संपादक नाही" असं म्हटले होते. खफ वर...

(जुन्याच असलेल्या) नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन. या निमित्ताने गविनी पुन्हा एकदा लिहिते होऊन "ब्राऊ" सारख्या सकस मालिका लिहाव्यात एव्हढे बोलून मी माझी दोन वाक्ये संपवतो.

या निमित्ताने सध्याच्या संपादक मंडळातील सदस्य व माजी सदस्यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या मिपाकरांसाठी मिपावर योग्य ते वातावरण बनवून ठेवण्यासाठी बहुतांश लोकांना अप्रिय वाटतील अशा कारवाया त्यांना कराव्या लागतात. हे काम खूपच आव्हानात्मक व मनाला त्रास देणारे असू शकते याची जाणीव आहे. माझ्या लेखन व प्रतिसादांमुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कारवाई करण्याची वेळ येऊ नये यासाठी मी निरंतर प्रयत्नशील राहील याची ग्वाही देतो. आजवर माझ्या लेखन व प्रतिसादामुळे संपादन करण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्यास त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by आदूबाळ

दोन्ही शब्द वापरून शोध घेतला असता काहीच मिळालं नाही म्हणून वरचा प्रतिसाद लिहिला. केवळ पहिलाच शब्द वापरून शोध घेतल्यावर अनेक दुवे मिळाले त्यापैकी हा पहिला. मिच्छामि दुक्कड़म : दिल से मांगे क्षमा

नवीन धागा -सदर सुरु करायचा अधिकार कुणाकडे? असं विचारण्याचं कारण काही एकोळी प्रश्न विचारायचे असतात आणि त्यात मोठा धागा होण्याची क्षमता असेलच असे नाही. तर असे प्रश्न एखाद्या माहिती हवी आहे/माझे प्रश्न यात विचारता येतील. बय्राच प्रतिक्रिया आल्यास त्या एका कायमस्वरुपी धाग्यात हलवता येतील."एकोळी धागे कशाला काढता?" अशी टीकाही होणार नाही. उदाहरणार्थ: टॅावरमधल्या वाढत्या आगी आणि त्यात अग्निशमनदलाचेच कर्मचारी बळी का पडताहेत?लिफ्टच्या वापरातूनही अधिक धोका निर्माण झाला आहे.प्रशिक्षणात काही चूक आहे का?

Updated


अभिनंदन पूर्वी व ह्यापुढेही संपादक पदाचा त्यांच्या सूचनांचा मी मान राखला आहे व पुढेही राखेन. ह्या मंडळापैकी अनेक सदस्यांचे लिखाण मला आवडते ते ह्यापुढे वाचायला मिळावे असे मनापासून वाटते त्यांनी लिहिते राहावे

संपादकांचे अभिनंदन.आम्ही जबाबदारीने लिहून त्यांचा त्रास कमी करायचा नक्की प्रयत्न करु..