वसंततिलका
लेखनविषय:
- Read more about वसंततिलका
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
पूर्वसूत्र :
वसंततिलका
(वसंत ऋतू. (Spring) त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणी त भ ज ज ग ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. वसंततिलका वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने.(माझे म्रुत्युपत्र) ही सावरकरांची कविता होय. .)
कवितेचे नाव : वसंततिलका
वृत्त : वसंततिलका
कवितेचा विषय :वसंततिलका
(Spring) वसंत ऋतू. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक.
शुभंकरोति
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about शुभंकरोति
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
शुभंकरोति
काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा!
स्कॅमं करोति कल्याणम
भूखंड्म जलसंपदा
सुष्टबुद्धी विनाशाय
ब्रिगेडशक्ती नमोस्तुते ||
आजोबा, पणजोबा नमस्कार
तुम्हीच आमचे तारणहार
सर्वांना वाकून नमस्कार
दिवा लावला दिल्लीपाशी
आमची सत्ता घराण्यापाशी ||
कायच्या काय
लेखनविषय:
- Read more about कायच्या काय
- 17 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली
चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली
पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे
झोपी जाती काही काही मोजतात तारे
वकार युनुसचा काही भरवसा नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
सकाळी डोके दुखता हवा एक उतारा
जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा
ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
बाटलीधर,
लघु वाल्गुदभारत- भाग २.
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about लघु वाल्गुदभारत- भाग २.
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
(काय राव सांगू)
लेखनविषय:
- Read more about (काय राव सांगू)
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
काय राव सांगू, कसं मी सांगू?
'पुण्यास भारी आहे माज'
काडी अशी सारुन आलोय आज
उगीच पिऊनी आलो फूल
उगीच मनाला पडली भूल
कळफलकाचा अन् शब्दांचा
दावियला मी भलता बाज
काडी अशी सारुन आलोय आज
जरी झिंगलो मारुन 'नीट'
लिहीत राहिलो होऊन धीट
जमली सारी पोरं कशी ही
प्रतिसादांची घुमते गाज
काडी अशी सारुन आलोय आज
सहज बोलूनि फसलो मी
उगाच बरळत बसलो मी
पंख लागूनि गेला धागा
नाहि चालला काही ईलाज
काडी उगा सारुन आलो आज
<बद्ध लेखक>
लेखनविषय:
- Read more about
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रेरणा
इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख
उत्तरं सोपी कुणा देईचिना
आपली ती तंगडी दरवेळी वरती
किती पडलो तेही आठवेना
टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा
रेग्युलरली जिणे काही झेपेचिना
वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा
डेडलाईनी काही केल्या चुकेचिना
एकहार्ट पैसा काल रोब मरून
सांगतोय काय नक्की कळेचिना
अचाट अध्यात्म, पुचाट विचार
जगतो ते लिहितो कोणा पटेचिना
उपप्रतिसादी ओशट या जिलब्या
लेख झाला जुना तरी संपेचिना
वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक
आपटली डोकी, तरी थांबेचिना
रद्दीवाला -
काव्यरस
- Read more about रद्दीवाला -
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो
त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो -
मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो
माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो !
एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो
सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो -
"आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो
रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो !
कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव'
'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव -
व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो
समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
संजीवक
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about संजीवक
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
खुळी दालने प्राजक्तासम उलटुन गेली पाने
फुलली राने; गूढ नभातिल झरले आषाढाने
आभाळातिल गोत उतरले; धुके दंवात नव्याने
भुलले अंकुर; पक्षी किलबिल आरव एक रवाने
मुके तेवढे सरलेले पळ संजीवकसे मेणे
अश्वासक संवाद कळ्यांचे स्नेह भारले गाणे
.....................अज्ञात
खंड कपारी
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about खंड कपारी
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
अभिषेकाचे ओढे नाले
वाहुन गेले माघारी
शिरी बोडके उरले कातळ
हिरवळ सुकली संसारी
तळी साचले मुके सरोवर
किमया प्रतिबिंबित सारी
अगणित लेणी खंड कपारी
दिसल्या मजला गाभारी
काठ किनारे भिजलेले
आकाश पृष्ठ्भर निजलेले
रंगात निळ्या लहरींवरती
पवनाचे स्पर्श पहुडलेले
जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
कजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले
.........................अज्ञात