मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुंतवणूक

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - १)

अमर विश्वास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही लेखमाला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे गणेशा भाऊंची "शेअर मार्केटची बाराखडी" ही लेखमाला. या लेखमालेत शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी (विशेषतः Position Trading) हे उत्तम पणे सांगत आहेत ... अर्थात ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच High Risk High Gain हे तत्व इथेही लागू होते. पण ज्यांना अशा पद्धतीने ट्रेडिंग शक्य नाही (अभ्यास नाही / वेळ नाही / रिस्क ची तयारी नाही ) त्यांच्या साठी दुसरा पर्याय काय ? माझ्या स्वतः च्या अनुभवावरून बऱ्याच गोष्टी शिकलो. सुरवातीला डे ट्रेडिंग / पोझिशन ट्रेडिंग केले. शेअर्स घेऊन लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट (३+ वर्षे) ही केली. यात बराच फायदा आणि पुरेसा तोटाही पहिला.

रंग रंग तू, रंगिलासी

खिलजि ·
रंग रंग तू, रंगिलासी दंग दंग तू, दंगलासी भंग भंग तू, भंगलासी वेड्यापिश्या रे जिवा जाशी उगा जीवाशी अव्यक्त बोल रे तुझे शब्दांचे झाले तुला ओझे का धावीशी उगा तू रे कुणी नाही वेड्या रे तुझे तो सूर्य देई एकला शक्ती समिंदराची ओहोटीभरती आकाश झेलते तारे मग का हवे रे , तुला सारे ? का जन्म घेतलासी ? हा डाव साधलासी रंगात रंगुनिया साऱ्या संसार मांडलासी गती मंद होत तुझी जाईल मग हार गळ्याशी येईल अग्नीत दग्ध होई सारे आला तसाच रिता जाशील ऐक साद अंतरात्म्याची शमेल खाज त्या बुडाची घे नाम त्या शिवाचे लाभेल गती तुला मोक्षाची ======================== सिद्धेश्वर विलास पा

नाद ब्रम्ह होई अंगी , चढे चढे भक्तिज्वर

खिलजि ·
लेखनविषय:
नाद ब्रम्ह होई अंगी चढे चढे भक्तिज्वर अरे तोच रे ईश्वर तोच तोच रे ईश्वर तुझ्या मायेची सावली आम्हा सर्व चरावर देई पर्वत ताकद जशी दुधात साखर स्वामी स्वामी राया तुम्ही तुमच्या पडतो पाया आम्ही देगा आशीर्वाद आम्हा तूच स्वामी सर्व ब्रम्हा उघडा ज्ञान दार सर्वा तुमच्या सर्वार्थ शक्तीने घालू अभिषेक आम्ही आमच्या प्रेमळ भक्तीने बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ,, स्वामी समर्थाना मनोभावे अर्पण {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

गडगडत्या बाजारातील संधी

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोक हो माझ्या "दर महा ८% ते १०% परतावा शक्य आहे का?" या धाग्यावर भवति न भवति होऊन बरीच धूळ उडाली. त्यात एक मत पुन:पुन: व्यक्त केले गेले ते असे की फक्त चढत्या बाजारात असा परतावा मिळु शकेल. गडगडत्या बाजारात असा परतावा मिळणे शक्य नाही, इ० या प्रश्नाचा पुरता छडा लावण्यासाठी अलिकडेच २०१८ मध्ये म्ह० २८ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये बाजार गडगडलेला असताना काय चित्र दिसते याचा तपास करायचा ठरवले. या अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.

अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज

युयुत्सु ·
लेखनप्रकार
शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते. सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

खिलजि ·
देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल दे ना रे मजला मी कि नई छान छान खायला करून घालेन तुजला कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून लुटेल , हो फक्त लुटेल ते सूर्यनारायणाचे ऊन तू काया बनवलीस सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट तरी बी सारे शोधत बसलेत कुठं लागतोय का ते जॅकपॉट ? झाड बघा ना, कुठंच जात नाही तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं मलाही आवडेल तसं राहायला काहीही नको , हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला स्वतःच हात

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोक हो केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत). सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो. खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत. 10pc

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

चित्रगुप्त ·
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार ·
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच