प्रो कबड्डी - सिझन ५ - ले पंगा

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, प्रो. कबड्डीच्या चौथ्या मोसमाचे मी जवळपास संपुर्ण महिनाभर वार्तांकान केले होते. जवळपास ३३ दिवस ! मागील वर्षापेक्षा या ५ वर्षाच्या सामन्यांची सुरुवात जवळपास एक महिना उशीराने सुरुवात होत आहे. उद्या २८ जुलै २०१७ पासुन सामने सुरु होतील. ३ महिने सलग वार्तांकन करणे हे माझ्यासाठी मोठेच आव्हान असणार आहे. सगळे सामने बघून मगच त्यावर लिहायचा विचार आहे. मागील वर्षी देखील सामना पाहुन झाल्यानंतर लगेच वार्तांकन लिहून इथे प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता तो सुफळ झाला. असो. तुणतुणे पुरे ! मागील वर्षांपेक्षा या वेळचे वेगळेपण म्हणजे तब्बल १२ संघ आणि जवळपास ३ महिने हे सामने चालणार आहेत.

महिला क्रिकेट वर्ल्ड कप - २०१७

लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : खालील लेखातील काही टीका-टिप्पणी ही माझी वैयक्तिक मते आहेत.अशा लेखात "मी आणि माझी मते", होणे स्वाभाविकच आहे.तस्मात माझ्या ह्या मतांकडे दूर्लक्ष करावे, ही विनंती. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच.

(why is there nothing rather than something ???????)

लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल (११ जुन २०१७ - पुणे)

लेखनविषय:
लेखनप्रकार
. नमस्कार मंडळी.. "BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल" बघण्याचा रविवारी योग आला. अचाट साहस आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवरील शॉर्ट फिल्म्स दाखवल्या गेल्या. आणखी फारसे वर्णन न करता सरळ फिल्म आणि त्यासंबंधी माहिती देतो. तसेच, या धाग्यामध्ये खूप व्हिडीओ द्यावे लागणार आहेत - धागा लोड होण्यास वेळ लागू शकतो.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

द अंडरटेकर रिटायर्स

आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं. कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - आणखीन काही... (अंतिम भाग)

लेखनविषय:
लेखनप्रकार
१९७५ ते २०१५ या चाळीस वर्षांमधल्या ११ वर्ल्डकप्समधल्या अविस्मरणीय आणि थरारक अशा ४२ मॅचेसनंतर आणि वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्स ठरलेल्या मॅचेसबद्दल लिहील्यावर विचार करताना असं जाणवलं की अद्यापही बरंच काही बाकी राहीलेलं आहे. एखाद्या बॅट्समनची अप्रतिम इनिंग्ज, एखाद्या बॉलरचा अचूक आणि तितकाच घातक स्पेल, अप्रतिम आणि अविश्वसनीय फिल्डींग, एखाद्या कॅप्टनची कल्पनेपेक्षाही यशस्वी ठरलेली चाल किंवा बूमरँगप्रमाणे उलटलेला निर्णय अशा कित्येक गोष्टी वर्ल्डकपमध्ये घडल्या आहेत.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - जायंट किलर्स

लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्ल्डकपच्या इतिहासात अनेक अविस्मरणीय आणि थरारक मॅचेसबरोबरच काही कमालीच्या कंटाळवाण्या आणि एकतर्फी मॅचेसही अनेकदा झालेल्या आहेत. खासकरुन टेस्ट दर्जा असलेल्या संघांबरोबरच आयसीसीने क्रिकेटचा प्रसार करण्याच्या हेतूने टेस्ट दर्जा नसलेल्या संघांचाही वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यास सुरवात केल्यावर हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं, इतकं की २०१९ चा इंग्लंडमधला वर्ल्डकप हा १० देशांमध्येच खेळवण्याचा आयसीसी ने निर्णय घेतला आहे! हा निर्णय काहीसा वादग्रस्तं असला तरी निरर्थक मॅचेसची संख्या कमी होण्यास हातभार लावणारा आहे हे देखिल तितकंच खरं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - सेमीफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

लेखनविषय:
लेखनप्रकार
२४ मार्च २०१५ इडन पार्क, ऑकलंड ऑकलंडच्या इडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलमध्ये मार्टीन गप्टीलच्या २३७ रन्सच्या इनिंग्जमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला १४३ रन्सनी धूळ चारली होती तर श्रीलंकेविरुद्धची क्वार्टरफायनल आरामात जिंकून दक्षिण आफ्रीकेने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. १९९२ मधल्या आपल्या पहिल्या वर्ल्डकपपासून अखेर ७ व्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रीकेने नॉकआऊट स्टेजमध्ये आपली पहिली मॅच जिंकण्यात यश मिळवलं होतं. न्यूझीलंडची ही ७ वी सेमीफायनल तर दक्षिण आफ्रीकेची ४ थी!
Subscribe to क्रीडा