स्वयंपाकी देता का हो कोणी ??
लेखनप्रकार
- Read more about स्वयंपाकी देता का हो कोणी ??
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
स्वयंपाकी देता का हो कोणी ??
।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।।
बंग़ळूर
ज्येष्ठ कृष्ण १
पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही
बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली.
आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो.
नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती.
तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स
अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती.