मागील भाग - http://misalpav.com/node/16729
***
लहानपणी आई, काकू, मावशी, आत्या ह्या महिला मंडळाच्या एकंदर सरंजामी वृत्तीमूळे, काही आणायचे असले की जा रे नाना हे आणुन दे, काही करायचे असले की जा रे नाना ते करुन दे असल्या हुकुमांचे पालन करता करता केव्हातरी महिला ह्या कुणी भयानक प्राणी आहेत हे माझ्या मनाने पक्के धरले होते. पण हळू हळू केव्हातरी वर्गात नेहमी ड्रेसमधे दिसणारी दोन वेण्या घातलेली दोन बेंच पलिकडे बसणारी मुलगी एका लांबलचक कापडात गुंडाळुन समोर आली की भलती चिकणी दिसते आणि मनाची घालमेल अचानक वाढते हे लक्षात आलं.