शोक कुणाला? खंत कुणाला?
- Read more about शोक कुणाला? खंत कुणाला?
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?
चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?
पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?
पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?
कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....
-शिवकन्या
चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ...
तिकडे दूर इस्माईल बसला आहे...
केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...
एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...
आणि एक वाळूचे घड्याळ...
अजुनही मागे मागे....
जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र
