मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उत्तर दे पण...

प्राची अश्विनी ·

मूळ कविता पत्र लिही पण नको पाठवू शाईमधुनी काजळ गहिरे, लिपिरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवईमधली नको पाठवू वेलांटीतुन, नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतुन. शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन, नको पाठवू कागदातुनी स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतुन, नको पाठवू असे कितिकदा सांगितले मी, तू हट्टी पण ! पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते, पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते.....

जुन्या कवितेला नवा आधुनिक साज चढवण्याचा प्रयत्न केलेला आवडला. पण आपल्या माणसाने हाताने शाई किंवा रक्त (जे उपलब्ध असेल ते) वापरुन लिहिलेल्या पत्रात जी मजा आहे ती मजा या व्हर्च्युअल दुनियेत नाही. इथे एकच मेसेज अनेक जणांना / जणींना फॉर्वर्ड / कॉपी करुन पाठवणारे महाभाग आहेत. कितिही लपवले तरी ओरीजनल आणि कॉपी पेस्ट मधला फरक लपता लपत नाही. दोन्ही कवितांच्या काळात झालेला हा जबरदस्त बदल आणि कविते मधल्या भावना यांचा मेळ बसत नाही.... म्हणून प्रयत्न आवडला असे म्हटले पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खरंय ती पत्र आणि हस्ताक्षराची सर इमोजीत नाही. पण आता जी भाजी भाकरी पदरी पडली ती गोड मानण्याशिवाय पर्याय नाही ना पैजारबुवा?

शानबा५१२ 16/10/2021 - 20:31
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन, व्वा!! नको पाठवू इमोजीतले लाजाळू अन् सुमुख हासरे, खुलता हासू ओठांवरती प्रश्न विचारत बसती सारे.हे 'मॉडीफीकेशन' खुप आवडले. कवितांमध्ये मुड फ्रेश करायची जी क्षमता असते, ती लेखात नसते. खुप काही, खुप कमी शब्दात फक्त कविता सांगु शकते. ही कविता वाचताना 'अनु मलिक' हे नाव मधेच आठवले. :-)

Bhakti 18/10/2021 - 07:03
सुंदर गुंफण झाली आहे,शेवट तोच ठेवला . मस्त केले :) जरा अजून डिजिटल,सहजच! नको पाठवू फुले हळूच गुलाब ,चमेली अनामिक अजूनी सुवासिक स्पर्शाचा भासच मनवेल अलगद तुझ्या अंगणी!

श्रीगणेशा 18/10/2021 - 20:29
छान! थोडंसं अजून डिजिटल (आपली कविता वाचल्या-वाचल्या सुचलं :-)) नको पाठवू शब्दकोडे ते इंग्रजी लिपीतील मराठीचे अबोल्यातही सोबत असते माझ्या तू 'शेवटचे पाहिलेले' शेवटचे पाहिलेले -- last seen :-)

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा 19/10/2021 - 13:55
Ingraji lipit lihilele मराठी वाचणे म्हणजे शब्दकोडे सोडवण्यासारखेच आहे. त्या अर्थाने "शब्दकोडे" शब्द वापरला आहे :-)

प्रसंग तोच पण कालानुरूप पोशाख(शब्द) बदली होतात हे बा भ बोरकर आणी संदिप खरे याच्या खालील कवितेतून प्रकर्षाने जाणवले. दोघेही आवडते पण तुलना नाही. बोरकरांची कविता माला जास्त जवळची वाटते खरे यांच्या,"नसतेस " पेक्षा. तू गेल्यावर फिके चांदणे... तू गेल्यावर फिके चांदणे घरपरसू हि सुने सुके मुले मांजरापरी मुकी अन दर दोघांच्या मध्ये धुके तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके कसे अचानक, झाले नकळे अवघे जग परके-परके नसतेस घरी तू जेव्हा, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो

लेखनविषय:
काव्यरस
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून. इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.

#तू म्हणालास...

प्राची अश्विनी ·

आवडला पाऊस. आशय तर थेट पोहचला. काल आभाळ भरून आल्यावर अशाच आठवणींचे ढग धावत होते. क्लास माहोल होता. आणि ही कविताही तितकीच आवडली. उसकी यादें कांच के टुकड़े और मेरा ईश्क नंगे पैर...! -दिलीप बिरुटे

Bhakti 18/05/2021 - 13:01
छानच! वातावरणच भारीये सध्या मलापण काल तुझ्याकडे येणारी वादळवाट/वारा प्यायलेली मुलगी अशा काही कविता सुचत होत्या ;)

माणूस मीच आहे जणू. खरंच मला पाऊस आवडत नाही. ओलं, चिखल, न संपणारी सर्दी वगैरे ह्या मुद्द्यांशिवाय, आतून जे काही हिरवे कोंब फुटू पाहतात, हॉर्मोन्स जो नाच करतात ह्या वातावरणात त्यांच्यामुळे पुढे एखादं पाऊल घसरण्याची भिती जास्त वाटते. मेंदू कडून निर्णयक्षमता मनाकडे सरकू लागते. कविता मस्त जमलीय, आधीचं मी का लिहिलं? कुणास ठाऊक.

माहितगार 18/05/2021 - 18:53
:)) कविता वाचून छान हसू आले. डोक्यावर कामाचे दडपण नसेल तर पावसाळी वातावरणासारखे वातावरण नाही. पण कामाचे दडपण असेल तर पावसाळी हवा केव्हा एकदा संपते आणि नेहमी पाऊस पडतो त्या चेरापुंजी का काय तिथले लोक कसे काम करत असतील असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपववून झाल्यावर पावसाळा सिझन मस्त असला तरी काम असतेच असते :)

उत्तम ! विषय छन आहे , कविता उत्तम आहे , पण अजुन जास्त रोम्यँटिक करता आली असती . अवांतर : बाकी आजकाल वृत्तबध्द कविता आणि गझल येत नसल्याने अन मुक्तछंदाचे विडंबन करण्यात मजा नसल्याने मिपावरील कुशल विडंबकांची कुचंबणा होत आहे हे जाताजाता नमूद करु इछितो . :)

तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही. चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही. ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले. बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले. पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत, पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत. पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री. पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का? भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का? तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही वाटलं तुझा येईल ..

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!

तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

चंद्रायण..!

सत्यजित... ·

अतिशय तरल. उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! मीटर पण छान मेन्टेन केलाय.

ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

अंतर

aanandinee ·

aanandinee 18/06/2020 - 13:34
ही प्रेमकविता नाही. माझ्या इथल्या एका मैत्रिणीची आई काल रात्री अचानक गेली. आई भारतात, मुंबईत होती. तिथे तिच्या वडलांचं वय जवळ जवळ ऐशी. इथे हिच्या नवर्याला diabetes आणि blood pressure, दहा वर्षांच्या हिच्या मुलीची immunity extremely low! तिने आईला शेवटचं बघायला जावं की या साऱ्यांच्या काळजीने प्रवासाची risk न घ्यावी. मी रात्री तिच्या घरी गेले होते. ती रडत होती, मी तिला समजावलं की वडलांना आधार म्हणून भाऊ आहे ना तिथे, तू आत्ता न गेलेलं बरं म्हणून. आणि घरी येऊन मी स्वतःच रडत होते. त्यातलं किती रडणं तिच्यासाठी होतं आणि किती माझ्या स्वतःसाठीच काय माहीत!

चित्रगुप्त 19/11/2021 - 10:31
कविता आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण दोन्ही निशब्द करून गेले. कोरोना काळात अश्या असंख्य घटना घडत असतील. कठीण आहे हे सगळे.

तुझं माझं हे दूर असणं जसे नकाशावरचे दोन ठिपके. आठवण करून द्यायला जणू, की कितीही म्हटलं तरी झालोय परके. तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते. पण सरळसोट नाहीच ती, नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते. मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते... डॉ. माधुरी ठाकूर

मरण

कौस्तुभ भोसले ·
लेखनविषय:
काळाच्या उंबरठ्यावर अस्पृश्य सावली हलते. श्वासांच्या झुळूकेसरशी प्राणज्योत मिणमिणते. साऱ्यांच्या अधरांवरती तुझ्या रूपाची नावे. हा प्रवास अटळ माझा नि मागे पडती गावे. इवल्याशा ज्योतीचा विझून भडका झाला. जो इथवर घेऊन आला तो क्षणात परका झाला. -कौस्तुभ

यंत्र

निखिल आनंद चिकाटे ·
लेखनविषय:
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. क्षणासाठी वाटतय गोड, मित्रांची संगत. इथे दर दिसते मला , फक्त यंत्रांची पंगत. इथे आहे माणूस, फक्त यंत्रासाठी घडलेला . दिस रात फक्त, या यंत्रांच्या वजा. बाकीत गुंतलेला , घडीचा काट्या सोबत , धावतोय त्पाचा जीव रे . विचारलं तर म्हणतो , हे जिंदगानीची निव रे.

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

परकीमिलन

माहितगार ·

कवितेत शिरकाव ? भारी. :) लिहिते राहा सेठ. विडंबनातील भावना पोहोचल्या. पण विविधतेत एकता आपला हा खरा चेहरा आहे. -दिलीप बिरुटे

नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना? हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती? देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ? भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई परप्रेमा

माहेर, सासर

पाषाणभेद ·
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९