मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चंद्रायण..!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार! पाहून चंद्र-मेळा, क्षितिजास ये उमाळा... नक्षत्र बांधतात तारांस एक-तार! स्वप्नील चंद्र-गाणे मधु-मीलनी उखाणे... गातात फूल, वारे छेडीत गंध-तार! एकांत चंद्र-वेडा, वितळून जात थोडा... देतो अनामिकेला अलगूजशी पुकार! उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! — सत्यजित

वाचने 12773 वाचनखूण प्रतिक्रिया 16

चांदणे संदीप 03/12/2020 - 00:47
अप्रतिम, नितळ! सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार 03/12/2020 - 08:43
कविता अतिशय आवडली पैजारबुवा,

गोंधळी 03/12/2020 - 09:30
मस्त 👍

सत्यजित... 04/12/2020 - 09:24
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

तुषार काळभोर 03/01/2021 - 16:30
अतिशय तरल. उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! मीटर पण छान मेन्टेन केलाय.

सत्यजित... 07/01/2021 - 17:44
धन्यवाद तुषार!