सत्कार्.....तेव्हढाही.....

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सत्कार .....तेव्हढाही ..... हाय् ! मी न उरलो , माझाच एव्हढाही सलगीत कुंतलांच्या रहातोय केवडाही ! साथीस शब्द होते , होत्या भणंग गझला सर्वस्व मी उधळले , ज्या हातें.....तोकडाही ! प्रेमातली उधारी बाकी तुझीच होती ; झोळीस पेलला ना व्यवहार रोकडाही ! झालीस दूर जेंव्हा झिडकारुनी मला तू , ओठी न आला शिकवा ना शब्द वाकडाही ! माझ्याच आसवांची व्याप्ती मला कळेना माझा मला नुरावा*अधिकार तेव्हढाही ? * नुरला : न उरला पाहून मला वळताना तू दाबलास जो हुंदका , पचवीन मी स्वतःचा सत्कार तेव्हढाही ! सत्कार्.....सत्कार्.....स्..स्..स्.

छळतो अजूनही का

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाऊस कालचा तो छळतो अजूनही का जाळून काळजाला झरतो अजूनही का ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का जयश्री अंबासकर

((बेत आहे..!))

लेखनविषय:
उपटसुंभाचे 'बेत' वाचून आम्हालाही पूर्वीचे बेत आठवले, काही आमचे आणि काही दुसर्‍यांचे...;) आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे. आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे. भेटणे मजला पुन्हा ती टाळते नाक्यावरी का मज कळेना योग हा की कटवण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे! टाकली पोटात जेव्हा मी जराशी जास्त फेणी कोण वदले, आज टकुरे सडकण्याचा बेत आहे? रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?

बेत आहे..!

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज थोडेसे चुकीचे वागण्याचा बेत आहे. आज तुजला एकट्याने गाठण्याचा बेत आहे. भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला ही तुझी चाहूल की हा चांदण्याचा बेत आहे. टाकली पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी देव वदला, आज भलते मागण्याचा बेत आहे. एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे. रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे. -- अभिजीत दाते

पौर्णिमा

लेखनविषय:
प्राजुताई नि राघवदादांच्या पौर्णिमा पाहून/वाचून मला मागच्या एका कोजागिरी पौर्णिमेला लिहिलेली कविता/गझल आठवली. शिळी, उष्टी असेलही कदाचित; पण आठवण झाली नि सहज शोधून मिळाली म्हणून मग येथे चिकटवायचे ठरवले.

उजाडले तरी.....

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मि.पा.कर , सप्रे नमस्कार ! सोबत एक गझल जोडत आहे.....पहा जमली आहे का ! उजाडले तरी ..... उजाडले तरी न कां , तांबडे मला दिसे? केस मोकळें जयांत वदन गुंतले असे ! दरवळतो मोगरा अजूनही उशीवरी चुरगळल्या कांतीला गंध कसा येतसे? झुळझुळत्या साडीच स्पर्श मऊ मखमली दूर जरी झालीस तू , बोलतात की ठसे ! विचारले न मी तुला , बोललीस तू कुठे? "ये मिठीत - घे मिठीत " उभयतांस हे पिसे ! सळसळत्या बांगड्या रुमझुमती पैंजणे अजून यौवनांत तू , अजून मी असा फसे !

ब्यूटी पार्लर अर्थात यौवनफुफाटा

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सांग दर्पणा कशी मी दिसते... ..... जामानिमा साग्रसंगीत कौशल्याचे कुवलयापीड .... मन जळे जीव उरे काजळावर कृष्ण पुटे .... हल्लीच फुटलीय कोंडी अन् परतवलेत आरंभशूर हल्ले ... फसव्या क्रांतीला झालीय बाधा यच्चयावतांची विचक्षण त्रेधा ... पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? ... कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार दिव्या दिव्या दीपत्कार...

अशक्य केवळ

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझाच वावर मनात केवळ निभाव आता अशक्य केवळ नको अता ही उगाच जवळिक पुन्हा मनाचे दुभंग केवळ तुझ्यामुळे ही फितूर गात्रे अता गुलामी तुझीच केवळ तुझी जराशी झुळूक यावी कसे जगावे उन्हात केवळ नको नव्याने तुझी उधारी हिशेब नव्हते हिशेब केवळ जयश्री अंबासकर

गजल का सफर. -

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. दत्तप्रसाद रानडे आणि स्वरदा गोखले ह्यांच्या 'गजल का सफर' कार्यक्रमाचे महाराष्ट्र मंड्ळ - लंडन व इतर ठिकाणि २७ मार्च ते ८ एप्रिल या कालावधित प्रयोग होणार आहेत.रसिक मिपकरानि अवश्य आनंद घ्यावा.
Subscribe to गझल