कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
- Read more about कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
- 27 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
<सवयीने मंद >
- Read more about
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद)
होळीची याद देऊन जाणारे
विविध नावांचे विरविरीत धागे...
काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ
काही नेहमी व्यस्त
काही सुस्त
तेच वळण तेथेच नेणारे फक्त
कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ...
तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ...
पोळीची साद घालून जाणारे
विविध आचार्यांचे सुनसान धाबे...
काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट
काही स्वस्त
काही फस्त
काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त
चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले
कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले ,
उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ
लेखनविषय:
- Read more about उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ
- 64 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ढुस्क्लेमर्स : सदर लेखाचा कोणशीही वैयक्तिक संबंध नाही, संबंध वाटल्यास आपण स्वतःला जालिय हुच्चभ्रू म्हणून मिरवायला हरकत नाही. लेख पचायला अंमळ जड आहे , जमालगोटा जवळ ठेवल्यास वाचल्यानंतरचे त्रास टाळू शकता. जालावर फिरताना एक जड लेख वाचनी पडला , सहज विचार केला ... हे लोकं आपल्या घरी सुद्धा असंच बोलत असतील ? तर ? आणि कथा सुचली ! कथा काल्पनिक , पात्र वातावरणातली !!
पाणीपुरी
- Read more about पाणीपुरी
- 49 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती.
पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत.
चवीने खाणार त्याला...
- Read more about चवीने खाणार त्याला...
- 62 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात.
साबुदाण्याच्या गोळ्यांच्या लोणच्याच्या भाकरीच्या मटणाच्या पुरणाच्या पोळीचे शिकरणासाठीच्या रेसीपीची निवीदा सुचना
- Read more about साबुदाण्याच्या गोळ्यांच्या लोणच्याच्या भाकरीच्या मटणाच्या पुरणाच्या पोळीचे शिकरणासाठीच्या रेसीपीची निवीदा सुचना
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
निवीदा सुचना
साबुदाण्याच्या गोळ्यांच्या लोणच्याच्या भाकरीच्या मटणाच्या पुरणाच्या पोळीचे शिकरणासाठीच्या रेसीपीची निवीदा सुचना
"अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" त्यांच्या तुरुंगातील बांघवांसाठी खाणावळ चालवणार्या बचत गटातर्फे वरील नावाच्या रेसीपीसाठी खालील खाद्य पदार्थ तयार रेसीपी, दर माणशी प्रमाणानुसार (कैद्याचे अॅव्हरेज वजन: 60783489 मिलीग्राम, उंची: 0.001041 माईल्स, उमर: 14600 दिवस, १३.५२ महिने) मागवण्यात येत आहेत.जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!
- Read more about जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
राम राम मंडळी,
तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो...
परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक!
आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्या होणार्या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो.


