मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आशादायक

आशा

निनाद ·
लेखनविषय:
काव्यरस
नौका ही बांधलेली राहील का बांधलेली उरात भरूनी वारे ही पाहतो निघालेली वादळे येती तरी लाटा फोडून ती गेली थांबलो तेथेच मी ती निघून गेलेली मी असेन येथेच वेळ नाही गेलेली परत कधी येईल ती आशा न विझलेली

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.

कसाही बरसला, तरी मजा ती संपली.

Sanjay Uwach ·
लेखनविषय:
काव्यरस
कसाही बरसला, तरी मजा ती संपली. मन घाबरे घाबरे, जीव झाला व्याकुळ कुठे दिसेना रस्ता, सर्व अंधार अंधार. कधी शित सरी मध्ये, नाहुनी निघालो सवगड्यांच्या संगे, चिंब चिंब झालो कधी थंड वारा अंगास झोंबला अंगातल्या रगेने,तो ही तिथे शमला पण आज तुला पाहताना, दूर दूर पळालो जीवाच्या आकांताने, घरा मधे धावलो कुठे आशेचा किरण, हळुच डोकावला काळया कुट्ट ढगा मध्ये, लख्ख विजेचा प्रकाश रोज ऐकुन नवीन नवीन, माणूस सरावला जीवाचा काय तो मोल, गेलेे सारे विसरून कोडग्या मनाला, आता काय ती भीती कसा ही बरसला, तरी मजा ती संपली.

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी ·
लेखनविषय:
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

वाट..

मन्या ऽ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वाट.. जुन्याच एका वाटेवर वाट चुकले होते मी आज पुन्हा मी त्याच वळणावर नवी वाट शोधते आहे मी भांबावलेली आहे मी गोंधळले ही आहे मी पुन्हा पुन्हा वाट ती शोधुन दमले आहे मी अशी कशी मी ही वेडी इतकी कशी मी बावरलेली; वाट स्पष्ट समोर असुनही वाट शोधत भटकणारी मी वाट हरवली आहे म्हणुन जीवनात माझ्या निराशेचा हा काळोख देईल का मज करून कोणी माझ्या नव्या वाटेची ओळख अखेरीस कोणीतरी हाक मजला दिली हिच आहे ती वाट तुझी अशी खात्री मजला दिली ती हाक ऐकुन धीर आता मजला आला हाक देणारा तो आवाज मला आता ओळखीचा वाटला उमजले मला नंतर ही हाक तर आहे माझ्याच अंर्तमनाची त्यानेच तर शोध