मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

shabdchitre

मरण...

Jayagandha Bhatkhande ·

गणेशा 19/02/2021 - 11:31
खूपच आर्त लिहिली आहे.. डोळयांसमोर मरण दिसते आहे, आणि मग सगळ्या घटना, चिंता, लेखाझोका समोर येताना शहारा येतो... तुमची मी पहिलीच कविता वाचली बहुतेक.. लिहीत रहा.. वाचत आहे...

मरण... रिपोर्ट वाचून झाल्यावर, यमधर्म दिसे दारावर, मग आली भानावर, केलीच पाहिजे आवराआवर... तशी होती ती गोलमटोल, हळूहळू होत गेली अबोल, चेहऱ्यावर दिसे हसरा भाव, मनात सलत असे घाव... कोणी म्हणत नव्हते सरक, पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक, मावळली गालीची हसरी खळी, आता आळीमिळी गुपचिळी... आयुष्यभराच्या आठवणींचा, कसा सोडवायचा गुंता, सतावत सारखे हेच विचार, अन् मनात दाटे चिंता... कळलं नाही तिला शेवटी, काय झाली चूक, बदल दिसे शरीरावर, मन झालं मूक... झोपली नव्हती ती, झाली होती क्लांत, दवाखान्याच्या शय्येवर, तिला मिळाली होती उसंत.. आकाशात दूर कुठेतरी, तेजस्वी तारा निखळला, गाली तिच्या एक, चुकार

चंद्रायण..!

सत्यजित... ·

अतिशय तरल. उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! मीटर पण छान मेन्टेन केलाय.

ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ६

स्वच्छंदी_मनोज ·

प्रचेतस 18/10/2019 - 09:00
सध्या खरंच भयानक अवस्था झालेली आहे सह्याद्रीची. निसर्ग ओरबाडून काढणारी माणसे हे सार्वत्रिक झालेय आणि त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार हे निश्चित. बाकी उल्हास व्हॅलीच्या ट्रेकमध्ये अजूनही पाणी असते ते मात्र लोणावळ्यातून आलेल्या सांडपाण्याचे.

लेख आवडला आणि खूप वाईट वाटले निसर्गाची, प्राणी पक्ष्यांची किंमत माणसाला कधीच कळणार नाहीये अगदी ते पूर्णपणे नष्ट झाले तरी डेस्क वर मूर्ती ठेवायची म्हणून सुळ्यांसाठी हत्तींना मारले जाते तेही रोज त्यांची पिले अनाथ केली जातात, अशा लोकांना माणूस तरी म्हणता येईल का, 4 दिवस एन्जॉय करण्यासाठी आपण कोकणात जातो पण तिथे सर्व हॉटेल मध्ये अन्न लाकडे जाळूनच शिजवलेले असते,आजूबाजूच्या जंगलातून लाकडे तोडून, पृथ्वीवर सृष्टी निर्माण होईल करोडो वर्ष लागले आणि तिने ती इतके वर्ष जपून ठेवली,वाढवली आणि माणसाने ती फक्त 200 वर्षांच्या आत तिला नष्ट होण्यापर्यंत आणून ठेवले हे माणसाचे कर्तृत्व, मला तर वाटतं कुठून या गोऱ्या लोकांना औद्योगिक क्रांतीची अवदसा सुचली काय माहीत,आपण आपल्या पृथ्वी चा अंत आपल्या डोळ्यांनी पाहात आहोत

आज खुप दिवसांनी पुढचा भाग टाकतोय.