निर्मुलनवाल्यांचे निर्मुलन

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
12 Aug 2009 - 10:40 am
गाभा: 

हॅहॅहॅ! अंनिस लई ट्याव ट्याव करती आहे काय? गेली कैक वर्षे साधा जादुटोणा विरोधी कायदा अजुन संमत होत नाही.त्याला अनेक पैलु आहेत. राजकीय, आर्थिक,सामाजिक,वैचारिक हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. असो शेवटी ती लोकशाही प्रक्रिया आहे. समाजात अंधश्रद्धा राहाव्यात अस कुणाही सुज्ञास वाटत नाही.या विचाराला चार्वाकापासुन परंपरा आहे.संतांनी देखील आपापल्या परीने मोठे योगदान कले आहे. तरी पण अंनिस हा नेहमी टीकेचा/चर्चेचा विषय असतो. तो असायलाही हवा. नाहीतर समाजमनाची स्पंदने कशी कळणार? वैचारिक उवांनी आमचे डोके नेहमीच खाजते. ते खाजवत खाजवत आम्ही वैचारिक रद्दी चाळत होतो. ती चाळता चाळता आम्हाला अंतर्नाद मासिकाच्या जुलै १९९८ च्या मासिकात 'विषयांतर' या सदरात मुंबईच्या अवधुत परळकरांचा हा लेख सापडला.अवधुत परळकर हे चौफेर व बहुआयामी लेखक. समाज मनाची स्पंदने टिपण्यात त्यांचा हातखंडा. साधना.अंतर्नाद,अनुभव अशा अंकांमध्ये ते सातत्याने लेखन करतात. नरेंद्र दाभोलकर संपादक असलेल्या साप्ताहिक साधनातुन त्यांनी 'अवलोकन' हे सदर चालवले होते. आपल्याला अवधुत परळकरांचे लेखन जाम आवडत ब्वॉ!
निर्मुलनवाल्यांच निर्मुलन
(अवधुत परळकर)

हातातुन उदी काढून दाखवणे आरपार सळी खुपसणे,पेटलेला कापुर स्वाहा करणे या सारख्या वैज्ञानिक जादुटोण्यांचे जाहीर प्रयोग करुन देशातील अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटण होईल असे आमच्या अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांना वाटत असेल तर ती त्यांची अंधश्रद्धा मानावी लागेल.
जमाना अंधश्रद्धावाल्यांचा आहे आणि राहील. खरी गोष्ट अशी कि अंधश्रद्धा व अंधश्रद्धावाल्यांच्या तिरस्काराने हे निर्मुलनवाले इतके अंध झाले आहेत कि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकच त्यांना कळेनासा झाला आहे. हा फरक कळण्याची डोळस युक्ती त्यांना सांगावीशी वाटते.
अगदी सोप आहे नेहमी लक्षात ठेवायचे कि आपली ती श्रद्धा, दुसर्‍यांची ती अंधश्रद्धा.
आपली कशावरच श्रद्धा नाही अशी प्रौढी मिरवणारे लोक सर्वाधिक अंधश्रद्धाळु असतात. त्यांची स्वत:च्या शहाणपणावर आंधळी श्रद्धा असते. आणि ही तर सर्वात खतरनाक अंधश्रद्धा.
बुद्धीप्रामाण्यवादी कमी अंधश्रद्धाळू नसतात. मुठभर चाहत्यांसमोर भाषण देताना आपण समाजपरिवर्तन घडवून आणत आहोत असं त्यांना वाटत असत.,त्यात डोळसपणा कुठे असतो?
ज्ञान जे कायम दुसर्‍यांकडुन मिळत असत, त्यावर विद्वानांची अपार श्रद्धा असते. श्रद्धेचही विज्ञान असतं हे लक्षात घ्यायला मात्र ते तयार नसतात.
स्वत:वर श्रद्धा ठेवायला शिका असं जेव्हा थोर लोक सांगतात. तेव्हा स्वत:च्या चरणावर मस्तक ठेवा असं त्यांना सुचवायच नसत.सर्कस सुंदरी खेरीज दुसर्‍याकुणाला ते जमु शकेल अस वाटत नाही.
दुसर्‍याच्या पायावर डोके ही मात्र सर्वांना सहज जमु शकेल अशी सर्कस. डोकी धडावर शाबुत राहण्यासाठी अनेकांना ती रोजच्या रोज करावी लागते.
श्रद्धेशिवाय माणुस नाही हे मान्य केल तर निर्मुलनवाल्यांना अमानुषच म्हटल पाहिजे.
पण हे अमानुष देखील दैनंदिन जीवनात वावरताना कळतनकळत किती अंधश्रद्धा बाळगतात हे पाहण्यासारखे आहे.
रेल्वेवरील अंधश्रद्धा असल्याने माणसे ८.३५ च्या लोकलसाठी साडे आठला स्टेशनात येउन उभी रहातात.
मतपेटीतुन क्रांती होईल या श्रद्धेतुन दर पाच वर्षांनी स्वतंत्र भारताचे नागरीक मतदानकेंद्रांपुढे रांगा लावतात.
एका ठराविक वयात स्त्री पुरुष प्रेमिकांना आपण एकमेकांसाठी जन्माला आलो आहोत असे वाटत असते तो परस्परांवरील अंधश्रद्धेचा भाग असतो.
भर उन्हात छत्री घेउन फिरणारे लोक आपल्या वेधशाळेवरील अंधश्रद्धचे जाहीर प्रदर्शन करीत असतात. तर करमणुकीसाठी तासंतास टीव्ही समोर बसणारे लोक आपल्या दुरदर्शनवरील अंधश्रद्धेचे दर्शन घडवीत असतात.
न्यायालयीन कामकाजाचे वर्णनाखेरीज दुसरे काही वाचायला मिळेल या श्रद्धेपोटी लोक रोज वर्तमानपत्र घेतात आणि पस्तावतात. पालिकेच्या कामकाजावर श्रद्धा असणारे वृत्तपत्रात पत्र लिहुन कचर्‍याचे ढीग हलवण्याची विनंती करतात.
सेलमधुन किरकोळ वस्तु खरेदी करणार्‍यांची दुकानदारांच्या प्रामाणिकपणावर होलसेल श्रध्दा असते.
शाळा मुलांना शिक्षण देतील या अंधश्रद्धेपोटी पालक मुलांना शाळेत घालतात.
या देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्रीही अंधश्रद्धाळु; त्यांना वाटत मोठाली धरणे बांधली प्रकल्प उभारले, देशात मोबाईल फोनचे जाळे उभारले,सर्व सेवांचे संगणकीकरण केले, फॊरेन कंपन्यांना देशाच्या प्रगतीचे कंत्राटे दिली म्हणजे देशाची भरभराट झाली.एकेकाच एकेक.
थोडक्यात इथल्या श्वासा-निश्वासात अंधश्रद्धा आहे; संपुर्ण देशाचे वाईट दिवस सरुन चांगले दिवस येतील या अंधश्रद्धेवर जगतो आहे. श्रद्धा आहे म्हणुन सामान्यांचे जीवन सुसह्य बनुन गेल आहे आणि अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी रस्तोरस्ती हे काय जादुचे प्रयोग चालवले आहेत? माणसाच्या जगण्याचा एकमेव आधार ते का नष्ट करु पाहताहेत?
ते काही नाही. निर्मुलन करायचे तर ते पहिल्यांदा या निर्मुलनवाल्यांचच करायला पाहिजे!

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 Aug 2009 - 10:44 am | अवलिया

हा हा हा

पकाशेट तुम्ही दोन्ही बाजुने बोलत असता अशी आमची 'श्रद्धा' आहे ;)

--अवलिया

मेघना भुस्कुटे's picture

12 Aug 2009 - 11:29 am | मेघना भुस्कुटे

आचरट लेख आहे झालं.
यावर काय बोलणार?
एखाद्या कामाचा आवाका, उद्दिष्ट आणि टारगेट ऑडियन्स (मराठी शब्द सुचवेल का कुणी?) लक्षात न घेता अकलेचे तारे तोडण्याची नुसती अहमहमिका आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 11:32 am | प्रकाश घाटपांडे

जाम विनोदी लेख आहे ब्वॉ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

12 Aug 2009 - 12:00 pm | JAGOMOHANPYARE

शिळ्या कढीला किती ऊत आणणार ? आधी दाभोळ्करान्चा २००७ की कुठला तरी असाच जुना लेख.. आता ही १९९८ मधली बखर....

मागचा लेखसुद्धा कुठल्या तरी दुसर्‍या वे ब साइट वरचा कॉपी पेस्ट होता... त्यातली एक तुमची प्रतिक्रिया देखील कॉपी पेस्ट होती... आता हा एक नवा ( !) लेख पुन्हा एकदा कॉपी पेस्ट... तुम्हाला 'टर्मिनेटर' चा डायरेक्टर चावलाय का ? एका भागात शिणेमा सम्पवता येत नाही का ? :)

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 12:18 pm | प्रकाश घाटपांडे

अनेक विषय शिळे असतात. खर तर विषय तोच असतो बदलतो तो फक्त समोरचा वाचक/श्रोतृ/प्रेक्षक वर्ग.काहींसाठी ती पुनरावृत्ती असते. पण न वाचण्याचा/ ऐकण्याचा/पहाण्याचा पर्याय त्यांना खुला असतो. काही सामाजिक प्रश्न तर असे असतात कि साल शतकांनी बदलल तरी ते तसेच असतात. हे चर्‍हाट वा गुर्‍हाळ चालूच असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

12 Aug 2009 - 1:49 pm | JAGOMOHANPYARE

पण न वाचण्याचा/ ऐकण्याचा/पहाण्याचा पर्याय त्यांना खुला असतो

एकदम बरोबर... आता हा पर्याय इथे घाऊकमध्ये खुला होवो, हीच अं.नि.स.स्थापक प.पू. श्री सद्गुरु दाभोळकर महाराज यांचे चरणी प्रार्थना.. :)

विजुभाऊ's picture

13 Aug 2009 - 12:27 am | विजुभाऊ

टारगेट ऑडियन्स (मराठी शब्द सुचवेल का कुणी?)
अपेक्षीत श्रोतृवर्ग हा एक शब्द आहे.
संबंधीत श्रोतृवर्ग आणि संबोधीत श्रोतृवर्ग हे दोन्ही शब्दसुद्धा चपखल बसतात
नुसता "श्रोतृवर्ग" हा शब्दसुद्धा चालेल

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2009 - 11:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही वाक्य, उदाहरणं विषयांतर करणारी आणि/किंवा अस्थानी वाटतात (यावर माझी श्रद्धा आत्तातरी आहे!) उदाहरणार्थः

भर उन्हात छत्री घेउन फिरणारे लोक आपल्या वेधशाळेवरील अंधश्रद्धचे जाहीर प्रदर्शन करीत असतात. तर करमणुकीसाठी तासंतास टीव्ही समोर बसणारे लोक आपल्या दुरदर्शनवरील अंधश्रद्धेचे दर्शन घडवीत असतात.

भर उन्हात काही लोकं उन्हामुळे त्वचा काळवंडू नये म्हणूनही छ्त्री घेऊन फिरतात. काही लोकांची करमणूक होत असेल टी.व्ही.मुळे, त्याला आपण श्रद्धा-अंधश्रद्धा कसं म्हणणार?

धरणं, मोबाईलचं जाळं, संगणकीकरण यांचा उल्लेख तर अतिशय अस्थानी वाटला. धरणांमुळे कित्येक कोटी लोकांना पिण्याचं पाणी बारा महिने मिळत आहे हा विश्वास, ही श्रद्धा/अंधश्रद्धा का माहिती? बसल्या जागी माझ्यासारख्या अनेकांना संगणकाच्या सहाय्याने रेल्वेचं तिकीट काढता येतं, रेल्वे स्टेशनला न जाण्यामुळे जीवन अधिक सुसह्य झालं ही माझी श्रद्धा आहे का माहिती? अर्थात लेख १४ वर्षांच्यावर जुना(ट?) आहे त्यामुळे तंत्रज्ञानाच्या उदाहरणांबद्दल लेखन बघण्यात काही अर्थ नाही. पण (अवघ्या) १४ वर्षांमधे तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सुसह्य होईल यावर लेखकाची लेख लिहितेवेळी श्रद्धा नसावी असं दिसत आहे.

असो. श्रद्धा-अंधश्रद्धा वगैरे गोष्टी फार जड आहेत मला पचण्यासाठी. त्यामुळे मी त्यांच्या नादी लागणं सोडून देण्यावर विश्र्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

अदिती

वेधशाळा पावसाप्रमाणे दिवस ढगाळ असेल कि नाही ते सांगते आणि ते कधी कधी चूक निघते.
दूर्दर्शन्वर लोक मनोरंजनासाठी पाहत असतात. पण तसे करण्यापूर्वी आपले मनोरंजन होणारच आहे ही अंधश्रद्धा आहे.

श्रावण मोडक's picture

12 Aug 2009 - 11:52 am | श्रावण मोडक

काय हे 'पाप'? तुम्ही असं करावं? छ्या बुवा. आम्हाला काही पटलंच नाही. :)

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 11:58 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ
पाप केली कि मग
शास्त्रापुरता का होईना 'परिहार' करता येतो.:))
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

12 Aug 2009 - 12:04 pm | श्रावण मोडक

म्हंजे हे तर पुन्यच की. मंग चालंल!!!

ज्ञानेश...'s picture

12 Aug 2009 - 12:25 pm | ज्ञानेश...

'अंतर्नाद'च्या संपादकांनी परळकरांच्या मागे लागून बळजबरी लिहून घेतलेला लेख असावा अशी शंका/असा अंदाज/ अशी श्रद्धा आहे.

"Great Power Comes With Great Responsibilities"

JAGOMOHANPYARE's picture

12 Aug 2009 - 1:52 pm | JAGOMOHANPYARE

..... आणि तो लेख वाचून संपादकांच्या नादाचा अंत झाला असावा...:)

विसोबा खेचर's picture

12 Aug 2009 - 3:29 pm | विसोबा खेचर

ए प्रकाश,

अरे ते श्रद्धा/अंधश्रद्धा वगैरे सोड रे सगळं..

दारू केव्हा पाजतोस तेवढं सांग. दारू आणि मटण मिळून तुला किमान ३०० रुपायाला तरी कापायचा, अशी श्रद्धा अलिकडे मी बाळगली आहे! :)

वाटल्यास त्या नरेंद्रालाही बोलावू बैठकीला.. :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे

तात्या ल्यका कंचा बी मुहुर्त हा शुभ मुहुर्त असतोय शास्त्रात, श्रद्धेचा आमी आदरच करतो
शास्त्रापुरती का होईना दवा-दारु ही घेतलीच पायशेल . यखांदा इरॅशनल डे साजरा केला तरच इतर वेळी रॅशनली वागता येईल असे भाकीत पुरोगामी वर्तुळात आम्ही वर्तवले आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 6:23 pm | लिखाळ

लेख फारसा आवडला नाही. सरकारी यंत्रणांवर त्रागा करणारा लेख वाटला :) (किंवा मला समजला नाही.)

मागे एकदा कालनिर्णयच्या मागल्या पानांवर लेख असतात त्यात दत्तप्रसाद दाभोळकर यांचा श्रद्धा-अंधश्रद्धा-अंनिस या वरती लेख होता. साल मला आठवत नाही पण ९४ च्या आसपास असावे असे वाटते. तो लेख आपल्या पोतडीमध्ये असेल तर इथे देता येईल का?

अनिंस ज्या साठी काम करते त्याची गरज आहेच. पण.....

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

विकास's picture

12 Aug 2009 - 8:59 pm | विकास

परळकरांचा मूळ लेख मला वाटते "विरंगुळा" सदरात मोडणारा असावा, अर्थात सार्कॅस्टिक :-)

बाकी या लेखाला प्रत्युत्तर देयला वेळ नाही आहे, पण माझा पण असा लेख लिहायचा अनेक दिवसांचा (खर्‍या अर्थाने) मानस होता/आहे: "हिंदू / भारतीय हाच सगळ्यात कमी अंधश्रद्ध असलेला आणि पापभिरू नसलेला समाज आहे" असे माझे ठाम म्हणणे आहे.

आम्ही देवळात रांगा लावून उभे राहू, कुठल्याही म्हसोबासमोर नारळ फोडू, कुठल्याही बाबा/बुवा/महाराजाला हार घालू , आरत्या ओवाळू. पण इतके सर्व केले तरी आमचा एकाच गोष्टीवर ठाम विश्वास आहे, की कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. पैसे मिळवताना पैशाचाच विचार करायचा (अभ्यास, क्वालीटी, एथिक्स वगैरे नंतर). दुकानात सकाळी बालाजी, लक्ष्मी वगैरे देव देवतांच्या फोटोंसमोर उदबत्या ओवाळल्या तरी मग भेसळ, माल लपवा लपवी करताना काही वाटून घेयचे नाही. धंद्यांमधे बालाजीला सहावा समभागी (पार्टनर) म्हणून ठरवू पण उरलेल्या पाच पार्टनर्सबरोबर धंदा मिळवताना, त्यातून सेवा/उत्पन्न देताना कसलाही विधिनिषेध (कायद्याचा अथवा धर्माचा) मानणार नाही. सरकारी कचेरीत साधे दरवाजावर पैसे देण्याची वेळ आली तरी महादेवाकडे जायच्या आधी नंदीचे दर्शन घ्यावे लागते म्हणत सहज समर्थन करू, परीक्षेला जायच्या दिवशी अथवा आदल्या असे एकाच दिवशी देवळात जाऊ, पण खरी भिस्त त्या देवळातल्या देवापेक्षा ट्यूशन घेणारा मास्तर त्याला दिलेले पैसे आणि त्याला माहीत असलेली अंदरकी बात यावरच ठेवू... असे खूप काही आहे.

विचार करा, आपण जर खरेच पापभिरू असतो, अंधश्रद्धाळू असतो तर रोजच्या जगण्यात अशा गोष्टी करू शकू का? आम्ही कसले अंधश्रद्ध? आम्हाल तसे म्हणणारेच आंधळे! :-(

डिसक्लेमरः (चांगल्या अर्थाने) वरील वर्णनात न मोडणारे भारतीय ही आहेत याची मला कल्पना आहे. पण ते ना धड आंधळे, ना धड अंधश्रद्ध... कदाचीत डोळस भारतीय असेच म्हणावे लागेल. :-)

विजुभाऊ's picture

13 Aug 2009 - 12:30 am | विजुभाऊ

कोणत्याही गोष्टीमागे शास्त्र असते ते जोपर्यन्त उलगडत नाही तोपर्यन्त चमत्कार आणि चमत्कार करणाराना मरण नाही.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 5:21 am | मिसळभोक्ता

आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टींमागे शास्त्र आहे असे मानले जात नाही, तोवर अनेक गोष्टींमागले शास्त्र उलगडणार नाही. त्यामुळे चमत्कार आणि चमत्कार करणारांना कधीच मरण नाही. जोवर चमत्कार आणि चमत्कार करणारे आहेत, तोवर सगळ्या गोष्टींमागे शास्त्र आहे, असे मानल्या जाणार नाही, आणि त्यामुळे .... इ इ.

खुद्द आईन्स्टाईन म्हणून गेला "देव फासे टाकत नाही" म्हणून आणि तरीही क्वांटम थियरी गेली शंभर वर्षे टिकलीच आहे ना ! त्यामुळे एक तर क्वांटम थियरी हा चमत्कार आहे, किंवा आईनस्टाईनची जनरल थियरी तरी.

-- मिसळभोक्ता

कपिल काळे's picture

13 Aug 2009 - 1:50 pm | कपिल काळे

परळकरांचा हा लेख वाचनात आला होता. तसा पटण्यासारखा आहे.

ह्या सगळ्या वादाला अजून एक ट्वीस्ट देता येतो.

अंनिस वाले फक्त हिंदूंच्याच मागे का लागतात? महिम च्या चर्चात मेणाच्या बाहुल्या अर्पण करणे, विशाळ गड दर्ग्याला चोरीचा आरोप असणार्‍या व्यक्तीने हातकड्या घालून फेर्‍या मारणे ह्या सुद्धा अंधश्रद्धाच आहेत. मग का नाही ते चर्च आणि दर्ग्यांच्या वाटेला जात?

की हिंदू सहिष्णू आहेत म्हणून दाभोलकर सारख्यांचे फावते?

बाय द वे, सध्या ते शाम मानव कुठे आहेत? आणखी एक सातार्‍याचे डॉ. सुद्धा ह्यांच्याबरोबर काम करतात, नाव आठवत नाही.

दाभोलकर काही बाही उपक्रम हाती घेउन फोकस मध्ये राहतात. सध्या त्यानी नाग- सापांचे विष काढण्याबद्दल मोहिम हाती घेतली आहे. ह्याच रविवारच्या पेप्रात लेख छापवून आणलाय.

मास्क बांधून फिरण्यामुळे स्वाइन फ्लू ची लागण होत नाही, ही अंधश्रद्धा आहे का? असल्यास दाभोलकर तिच्या निर्मूलनाचे कार्य कधी अंगीकारणार?

आशु जोग's picture

28 Sep 2011 - 11:27 pm | आशु जोग

हुश्श !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2011 - 11:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज तुमचा वेळच जात नाही का ?

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2011 - 11:44 pm | बिपिन कार्यकर्ते

हौ ना भौ! तितं खरड केली तं त्याचं उत्तर नाही! आन हितं बसले उकरत!

ह्या मेडिकल कंडिशनला डायरीया असे म्हणतात.

शिल्पा ब's picture

29 Sep 2011 - 12:05 am | शिल्पा ब

असं त्यांचं रोजचं असतंय. तुम्ही आजकाल गायबल्यामुळे माहीत नसावं.

आशु जोग's picture

29 Sep 2011 - 12:12 am | आशु जोग

बरुटे काय झालं, सांगाल का !

>>>> बरुटे काय झालं, सांगाल का !

विनाकारण जुने धागे वर आणत आहात म्हणून म्हटलं तुमचा वेळ जात नाही का..! जुने धागे वर यायलाही हरकत नसते, जुन्या धाग्यात एखादा वाचायचा राहीलेला लेख वाचून आनंद होतो. किंवा एखाद्या धाग्यात उत्तम प्रतिक्रिया लिहावी वाटते, कधी प्रतिसाद आवडलेला असतो. कधी लेखनातल्या एखाद्या प्रतिसादाला खास दाद द्यायची असते, इ.इ. आपण यातलं काहीही करत नाही असे वाटते. विनाकारण जुने धागे वर आणत आहात असं माझं वैयक्तिक मत आहे, तेव्हा तुम्ही सारखं- सारखं असं करु नये म्हणून म्हटलं आपला वेळ जात नाही का असे म्हटले आहे.

बाकी, माझ्या आडनावाची वाट लावल्याबद्दल मी आपला आभारी आहे. :)

-दिलीप बिरुटे

बरुटे आता या बाकीच्या लोकांना काय करणार !

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Sep 2011 - 12:33 am | बिपिन कार्यकर्ते

तुम्ही तुमच्या पुरतं बोला! आधी हे धागे खणून खणून वर काढताय त्याबद्दल तुम्हाला जी विचारणा केली आहे त्याचे उत्तर द्या. बरुटे (की बिरुटे?) काय करायचे ते ठरवायला स्वतः समर्थ आहेत.

कृपया सहकार्य करा!

प्रियाली's picture

29 Sep 2011 - 12:52 am | प्रियाली

आशु जोगसारख्या व्यक्तींची या संकेतस्थळाला निकड आहे असे मागे एकीकडे वाचले होते. त्यांना असे विन्मुख करणे पटले नाही. ;)

आता पळते!

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Sep 2011 - 12:56 am | बिपिन कार्यकर्ते

त्या एकीला सांगा की आता फुट्टा! ;)

आशु जोग's picture

29 Sep 2011 - 1:51 am | आशु जोग

हे असं लेकी बोले सुने लागे का होतय !

हे असं लेकी बोले सुने लागे का होतय !

महाशय........
उपरोलेखित(तुम्हाला तडका देणाऱ्या) तीनही मान्यवर व्यक्ती मिपाच्या संपादक आहेत.

आशु जोग's picture

29 Sep 2011 - 9:16 pm | आशु जोग

बिपिन कार्यकर्ते ,

>> कृपया सहकार्य करा!

बिपिनराव नक्की करू सहकार्य

पण याकडेही पहा

हा असा मेसेज मला शिल्पा ब यांच्याकडून आला होता २३ सप्टें ला

>> काय हो जोग? तुम्हाला जरा जास्त अक्कल आहे अशी स्वतःची गैरसमजुत झाली का? व्यक्तिगत पातळीवर न उतरता प्रतिसाद देता येत नसतील तर आम्हालाही लोकांची पिसं काढायला वेळ लागत नाही हे आधीच्या इतर धाग्यांवरुन कळेल <<

त्याला माझे उत्तर होते

"तुम्ही इतरांची पिसे काढता की
स्वतः स्वतःची काढता ते जैनांच्या धाग्यावर दिसले.

--

बरं जरा सांगा मी वैयक्तिक पातळीवर कधी उतरलो, कुठली व्यक्तिगत गोष्ट काढली मी
विचार करा, तस करायला तुमची माझी ओळख तरी आहे का !

--

चुकलं असेल तर जरूर मान्य करेन. मला त्यात जरासाही कमीपणा वाटत नाही
काय झालं ते नक्की सांगा.

आणि जास्त अक्कल म्हणाल तर माझा तसा अजिबात समज नाही
उलट इतरांपेक्षा कमीच आहे हे मला फार पूर्वीच पटले आहे
(हा माझा खोटा विनय नाही)"