निर्मुलनवाल्यांचे निर्मुलन
हॅहॅहॅ! अंनिस लई ट्याव ट्याव करती आहे काय? गेली कैक वर्षे साधा जादुटोणा विरोधी कायदा अजुन संमत होत नाही.त्याला अनेक पैलु आहेत. राजकीय, आर्थिक,सामाजिक,वैचारिक हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. असो शेवटी ती लोकशाही प्रक्रिया आहे. समाजात अंधश्रद्धा राहाव्यात अस कुणाही सुज्ञास वाटत नाही.या विचाराला चार्वाकापासुन परंपरा आहे.संतांनी देखील आपापल्या परीने मोठे योगदान कले आहे. तरी पण अंनिस हा नेहमी टीकेचा/चर्चेचा विषय असतो. तो असायलाही हवा. नाहीतर समाजमनाची स्पंदने कशी कळणार? वैचारिक उवांनी आमचे डोके नेहमीच खाजते. ते खाजवत खाजवत आम्ही वैचारिक रद्दी चाळत होतो. ती चाळता चाळता आम्हाला अंतर्नाद मासिकाच्या जुलै १९९८ च्या मासिकात 'विषयांतर' या सदरात मुंबईच्या अवधुत परळकरांचा हा लेख सापडला.अवधुत परळकर हे चौफेर व बहुआयामी लेखक. समाज मनाची स्पंदने टिपण्यात त्यांचा हातखंडा. साधना.अंतर्नाद,अनुभव अशा अंकांमध्ये ते सातत्याने लेखन करतात. नरेंद्र दाभोलकर संपादक असलेल्या साप्ताहिक साधनातुन त्यांनी 'अवलोकन' हे सदर चालवले होते. आपल्याला अवधुत परळकरांचे लेखन जाम आवडत ब्वॉ!
निर्मुलनवाल्यांच निर्मुलन
(अवधुत परळकर)
हातातुन उदी काढून दाखवणे आरपार सळी खुपसणे,पेटलेला कापुर स्वाहा करणे या सारख्या वैज्ञानिक जादुटोण्यांचे जाहीर प्रयोग करुन देशातील अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटण होईल असे आमच्या अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांना वाटत असेल तर ती त्यांची अंधश्रद्धा मानावी लागेल.
जमाना अंधश्रद्धावाल्यांचा आहे आणि राहील. खरी गोष्ट अशी कि अंधश्रद्धा व अंधश्रद्धावाल्यांच्या तिरस्काराने हे निर्मुलनवाले इतके अंध झाले आहेत कि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकच त्यांना कळेनासा झाला आहे. हा फरक कळण्याची डोळस युक्ती त्यांना सांगावीशी वाटते.
अगदी सोप आहे नेहमी लक्षात ठेवायचे कि आपली ती श्रद्धा, दुसर्यांची ती अंधश्रद्धा.
आपली कशावरच श्रद्धा नाही अशी प्रौढी मिरवणारे लोक सर्वाधिक अंधश्रद्धाळु असतात. त्यांची स्वत:च्या शहाणपणावर आंधळी श्रद्धा असते. आणि ही तर सर्वात खतरनाक अंधश्रद्धा.
बुद्धीप्रामाण्यवादी कमी अंधश्रद्धाळू नसतात. मुठभर चाहत्यांसमोर भाषण देताना आपण समाजपरिवर्तन घडवून आणत आहोत असं त्यांना वाटत असत.,त्यात डोळसपणा कुठे असतो?
ज्ञान जे कायम दुसर्यांकडुन मिळत असत, त्यावर विद्वानांची अपार श्रद्धा असते. श्रद्धेचही विज्ञान असतं हे लक्षात घ्यायला मात्र ते तयार नसतात.
स्वत:वर श्रद्धा ठेवायला शिका असं जेव्हा थोर लोक सांगतात. तेव्हा स्वत:च्या चरणावर मस्तक ठेवा असं त्यांना सुचवायच नसत.सर्कस सुंदरी खेरीज दुसर्याकुणाला ते जमु शकेल अस वाटत नाही.
दुसर्याच्या पायावर डोके ही मात्र सर्वांना सहज जमु शकेल अशी सर्कस. डोकी धडावर शाबुत राहण्यासाठी अनेकांना ती रोजच्या रोज करावी लागते.
श्रद्धेशिवाय माणुस नाही हे मान्य केल तर निर्मुलनवाल्यांना अमानुषच म्हटल पाहिजे.
पण हे अमानुष देखील दैनंदिन जीवनात वावरताना कळतनकळत किती अंधश्रद्धा बाळगतात हे पाहण्यासारखे आहे.
रेल्वेवरील अंधश्रद्धा असल्याने माणसे ८.३५ च्या लोकलसाठी साडे आठला स्टेशनात येउन उभी रहातात.
मतपेटीतुन क्रांती होईल या श्रद्धेतुन दर पाच वर्षांनी स्वतंत्र भारताचे नागरीक मतदानकेंद्रांपुढे रांगा लावतात.
एका ठराविक वयात स्त्री पुरुष प्रेमिकांना आपण एकमेकांसाठी जन्माला आलो आहोत असे वाटत असते तो परस्परांवरील अंधश्रद्धेचा भाग असतो.
भर उन्हात छत्री घेउन फिरणारे लोक आपल्या वेधशाळेवरील अंधश्रद्धचे जाहीर प्रदर्शन करीत असतात. तर करमणुकीसाठी तासंतास टीव्ही समोर बसणारे लोक आपल्या दुरदर्शनवरील अंधश्रद्धेचे दर्शन घडवीत असतात.
न्यायालयीन कामकाजाचे वर्णनाखेरीज दुसरे काही वाचायला मिळेल या श्रद्धेपोटी लोक रोज वर्तमानपत्र घेतात आणि पस्तावतात. पालिकेच्या कामकाजावर श्रद्धा असणारे वृत्तपत्रात पत्र लिहुन कचर्याचे ढीग हलवण्याची विनंती करतात.
सेलमधुन किरकोळ वस्तु खरेदी करणार्यांची दुकानदारांच्या प्रामाणिकपणावर होलसेल श्रध्दा असते.
शाळा मुलांना शिक्षण देतील या अंधश्रद्धेपोटी पालक मुलांना शाळेत घालतात.
या देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्रीही अंधश्रद्धाळु; त्यांना वाटत मोठाली धरणे बांधली प्रकल्प उभारले, देशात मोबाईल फोनचे जाळे उभारले,सर्व सेवांचे संगणकीकरण केले, फॊरेन कंपन्यांना देशाच्या प्रगतीचे कंत्राटे दिली म्हणजे देशाची भरभराट झाली.एकेकाच एकेक.
थोडक्यात इथल्या श्वासा-निश्वासात अंधश्रद्धा आहे; संपुर्ण देशाचे वाईट दिवस सरुन चांगले दिवस येतील या अंधश्रद्धेवर जगतो आहे. श्रद्धा आहे म्हणुन सामान्यांचे जीवन सुसह्य बनुन गेल आहे आणि अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी रस्तोरस्ती हे काय जादुचे प्रयोग चालवले आहेत? माणसाच्या जगण्याचा एकमेव आधार ते का नष्ट करु पाहताहेत?
ते काही नाही. निर्मुलन करायचे तर ते पहिल्यांदा या निर्मुलनवाल्यांचच करायला पाहिजे!
वाचने
11217
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
हा हा हा
आचरट लेख
In reply to आचरट लेख by मेघना भुस्कुटे
जाम विनोदी
In reply to जाम विनोदी by प्रकाश घाटपांडे
शिळ्या
In reply to शिळ्या by JAGOMOHANPYARE
शिळा विषय
In reply to शिळा विषय by प्रकाश घाटपांडे
पण न
In reply to आचरट लेख by मेघना भुस्कुटे
टारगेट
...........??
In reply to ...........?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
वेधशाळा पावसाप्रमाणे दिवस
अहो प्रकाशराव...
In reply to अहो प्रकाशराव... by श्रावण मोडक
परिहार
In reply to परिहार by प्रकाश घाटपांडे
असं होय...
भंगार लेख!
In reply to भंगार लेख! by ज्ञानेश...
..... आणि तो
ए
In reply to ए by विसोबा खेचर
हॅहॅ
लेख फारसा
मूळ लेख
कोणत्याही
In reply to कोणत्याही by विजुभाऊ
आणि
परळकरांचा
हुश्श !
In reply to हुश्श ! by आशु जोग
काहो...
In reply to काहो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हौ ना भौ! तितं खरड केली तं
In reply to हौ ना भौ! तितं खरड केली तं by बिपिन कार्यकर्ते
डायरिया झालाय त्यांना.
In reply to काहो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं त्यांचं रोजचं असतंय.
बरुटे काय झालं, सांगाल का !
In reply to बरुटे काय झालं, सांगाल का ! by आशु जोग
आपण आवरा नाही तर आम्हाला आपल्याला आवरावे लागेल.
बरुटे आता या बाकीच्या लोकांना
In reply to बरुटे आता या बाकीच्या लोकांना by आशु जोग
तुम्ही तुमच्या पुरतं बोला!
In reply to तुम्ही तुमच्या पुरतं बोला! by बिपिन कार्यकर्ते
निषेध!
त्या एकीला सांगा की आता
समर्थ
In reply to समर्थ by आशु जोग
हे असं लेकी बोले सुने लागे का
बिपिन कार्यकर्ते , >> कृपया
पण याकडेही पहा हा असा मेसेज