मी देशासाठी काय करतो ?

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
19 Jul 2009 - 3:40 pm
गाभा: 

**

मी देशासाठी काय करतो ? खरं पाहता काहीच करत नाही. पण जे करतो ते सामान्य नागरिक म्हणून मला दुस-या देशातील नागरिकासमोर छाती फुगवून सागायला मदत होते की हा, मी भारतीय आहे.
सर्वसामान्य जे करतात तेच करतो मी पण सर्व टॅक्स भरतो, नियमीत लाईट बील / पाणी बील भरतो, फोन बिल भरतो, सरकारी / गैरसरकारी संस्थाच्या कार्यक्रमाना मदत करतो जे काही करता येईल ते करतो पण एका माझ्या गोलाकार वर्तुळामध्ये राहून, माझ्या वर्तुळाचा केंद्र बिंदू हा मी व माझे कुटुंब आहे.. त्यानंतर सर्व काही.. येस मी स्वार्थी आहे, स्वतःचाच फायदा बघतो, का बघू नये ? जेव्हा जेव्हा मला फायदा होईल / तोटा होईल तेव्हा देखील मी नियमीत कर भरत आहेच ना ? जर माझे भले झाले तर देशाचे भले होईल व माझे वाईट झाले तरी देशाचेच भले होईल.

कसे ? मी कसे काय देशाचे भले करत आहे ???

शेयर मार्केट मध्ये मी गुंतवणूक करतो व लोकांना देखील करायला लावतो हे माझे काम.

समजा मी आज एक लाखाची गुंतवणूक शेयर मार्केट मध्ये केली तर..मी संबधीत संस्थेला ब्रोकरेज (दलाली) देतो, सरकारला कर रुपाने काही हिस्सा देतो भले ही माझा फायदा होऊदे अथवा तोटा.. नियमीत गेली पाच वर्षे टॅक्स भरत आहे, हायवे वापरण्यासाठी टोल देतो, दिल्ली मध्ये खरेदी करताना मेट्रोकर / शिक्षण कर देतो, व सर्वात महत्वाचे मी जे हे करतो त्यामुळे देशात रोजगार उत्पन्न होतो असे माझे मत आहे, भले ही एक नोकरी तयार होत असेल तर त्याला मी कारण आहे हेच मला छाती फुगवायला / गर्व करायला काफी आहे... असे नाही कि मी कर चुकवत नाही अथवा पळवाटा शोधत नाही पण तरी ही आजच्या जगात कुठे ना कुठे तरी आपण कुणा ना कुणाच्या तरी नोकरी साठी / रोजगारासाठी जबाबदार आहोत हेच सुख.

***

तुम्ही काय करता आपल्या देशासाठी ??????

कधी तर तावातावाने तर कधी तर सामान्यत: हा प्रश्न कोणी ना कोणी कधी ना कधी कोणाला ना कोणाला तर नक्कीच विचारतो.
व हा प्रश्न तेव्हा समोर येतो जेव्हा अनिवासी भारतीयांना नावे ठेवली जातात ;)

जरा चर्चा करु या.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

19 Jul 2009 - 3:49 pm | विनायक प्रभू

देशासाठी कायच करत नाही बॉ.

दशानन's picture

19 Jul 2009 - 4:09 pm | दशानन

तुमच्या कडून असल्याच हि & हि ची अपेक्षा होती ;)

किडा

विजुभाऊ's picture

20 Jul 2009 - 10:07 am | विजुभाऊ

मी देशासाठी काय करतो:
इतरांच्या चांगल्या चालेल्या कामात निदान काड्या घालत नाही हेच खूप आहे.

प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही

अवलिया's picture

19 Jul 2009 - 3:51 pm | अवलिया

मी देशासाठी काहीच करत नाही.

--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

तुम्हीच सांगा राजे.
देशातील गरीब ,भुखेकंगाल,दलीत,पिळवला गेलेला कामगार,न्यायासाठी झगडणारी जी जनता आहे त्यांच्यासाठी काही करायचे की दहशत वाद्यांबरोबर,जातीयवाधांबरोबर,मस्तवाल श्रीमंत,राजकारणी,भुमाफीया,लाचखाऊ प्रशासन यांच्याबरोबर लढायचे.
आपला
कॉ.विकि

आशिष सुर्वे's picture

19 Jul 2009 - 6:42 pm | आशिष सुर्वे

अंर्तमुख करायला लावणारा प्रश्न आहे राव!
मी एक साधी सोप्पी गोश्ट करतो..
मी माझे काम प्रामाणिकपणे करतो.. कोणताही गैरप्रकार स्वत: करत नाही आणि दुसर्‍यालाही करून देत नाही..

आणि एक महत्वाची गोश्ट.. जेव्हा केव्हा देशाकडून बोलावणे येईल, तेव्हा संगणकावर ही बोटे ज्या सराईतपणे चालतात, त्याच
सराईतपणे शस्त्रावर पण चालतील.. कोई शक??
-
कोकणी फणस

शलाका's picture

19 Jul 2009 - 8:13 pm | शलाका

वर उल्लेखलेल्या गोष्टी तुम्ही स्वत:साठी करता. त्यातुन देशाला होणारा फायदा (काही होत असेल तर) हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे. तुमच्या कामाचा थेट उद्देश नाही. त्यामुळे तुम्ही देशासाठी काही करता का? ह्याचे उत्तर नाही असे आहे.

हे म्हणजे मी रोज श्वास घेतो आणि एका भारतीयाला जगायला मदत करतो हीच माझी देशाला मदत असे म्हणण्या सारखे आहे.

थोडक्यात आपण देशासाठी काहीही करत नाही ही मनातील टोचणी घालवण्यासाठी शोधलेली ही पळवाट आहे.

आण्णा चिंबोरी's picture

22 Jul 2009 - 6:06 am | आण्णा चिंबोरी

शलाकाशी सहमत.

>>हे म्हणजे मी रोज श्वास घेतो आणि एका भारतीयाला जगायला मदत करतो हीच माझी देशाला मदत असे म्हणण्या सारखे आहे.

>>थोडक्यात आपण देशासाठी काहीही करत नाही ही मनातील टोचणी घालवण्यासाठी शोधलेली ही पळवाट आहे.

बरोबर. हे म्हणजे भारतात व्याजाचा दर जास्त असल्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी पैसे पाठवायचे आणि आम्ही गंगाजळी उभी केली म्हणून तात्याने म्हंटले तसा 'गंगाजळी! गंगाजळी!! गंगाजळी!!!' असा ऊर बडवायचा. असा प्रकार वाटतो.

परंतु भारतात भारताला नाव न ठेवता गुण्यागोविंदाने राहतो.

वेताळ

Nile's picture

20 Jul 2009 - 4:58 am | Nile

आणि अनिवासी भारतीयांना मनसोक्त शिव्या देतो. =))

विकास's picture

20 Jul 2009 - 5:50 am | विकास

अनिवासी भारतीय भारतासाठी असे नाही पण भारतात (तेपण पुण्यात)काय करू शकतो हे येथे वाचा. :-)

रेवती's picture

20 Jul 2009 - 7:24 am | रेवती

तो माणूस मानसीक रुग्ण असणार असं वाटलं.
त्याच पानावर माननीय शरदचंद्ररावजींचा हिलरी क्लिंटनबरोबर असलेला फोटो पाहिला. कित्ती मैत्री आहे दोन देशांमध्ये असं वाटून गेलं.
;)

रेवती

वेताळ's picture

20 Jul 2009 - 10:10 am | वेताळ

निले शेठ आपण कधी अनिवासी भारतियाना काहीबाही बोलत नाही,अहो सगळे आपलेच आहेत. उद्या काही कामानिमित्त परदेशात गेलो तर आपले लोकच आपल्याला मदत करणार.आणि मित्र व नातेवाईकच आहेत .
वेताळ

पोलिसकाका_जयहिन्द's picture

20 Jul 2009 - 1:35 am | पोलिसकाका_जयहिन्द

परदेशातुन भारतीय अंतरजालावरील गुगल जाहिरातीवर टिचक्या मारतो, आणि भारतीयांना आर्थिक मदत करतो....

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

बट्ट्याबोळ's picture

20 Jul 2009 - 2:26 am | बट्ट्याबोळ

..

विकास's picture

20 Jul 2009 - 5:09 am | विकास

मी एक गोष्ट नक्की करत नाही - इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स आणि त्यांचे प्रोग्रॅमिंग ;)

बाकी काय करतो?: शक्य तिथे सेवाभावी कार्याला मदत करतो. भारतातून इथे जेंव्हा सामाजिक संस्था (social entrepreneurs) येतात तेंव्हा त्यांचे काम इथल्या लोकांना समजून देण्यासाठी त्यांचे कार्यक्रम ठेवतो. त्या व्यतिरीक्त अजून पण अशाच अनेक गोष्टी...

स्लमडॉग पेक्षा वेगळा(पण) असलेला भारत हा भारताबाहेरील अभारतीयांना एक भारताचा भारताबाहेरील सामान्य प्रतिनिधी म्हणून ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो - माहीती देऊन आणि स्वत:च्या वागण्यातून.

विंजिनेर's picture

20 Jul 2009 - 7:54 am | विंजिनेर

कशाला काही करायला पाहिजे स्वतःच्या देशासाठी कुणीही?
पोटापाण्याची खळगी भरा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या , जमलेच तर घटकाभर गफा मारा, एखादे शिरू भाउ नाहीतर पुलंचे पुस्तक संपवा , किशोरीताईंच्या "सहेला रे" वर जीव ओवाळून टाका... यातून वेळ उरलाच तर कायद्याचे पालन-बिलन करा.. बस्स उसीमे जिंदगी निकल जाती है!
आणि या इथे घटोऽयं पटोऽयं करण्यापेक्षा बरे नाही का?

काहिही न करून (नंतर झालेला गोंधळ निस्तरायची गरज न पडणारा) देशाचे भले करणारा.

(निष्क्रिय) विंजिनेर
बाय द वे, वेलकम ब्याक फ्रॉम ऑब्लिव्हियॉन राजे..

नीधप's picture

20 Jul 2009 - 8:32 am | नीधप

मुळात हा विचारच चुकीचा वाटतो.
टॅक्स भरणे, नियम पाळणे, मतदान करणे इत्यादी गोष्टी देशासाठी करायच्या नव्हेत तर देशाचा नागरीक म्हणून ती आपली कर्तव्ये आहेत.
देशासाठी काही करतो हे म्हणणे देशावर उपकार करणे या भावनेपोटी आल्यासारखे आहे. या ठिकाणी आपण स्वत:ला देशापेक्षा मोठे मानत असतो.
या देशात आपण जन्मलो, वाढलो, जगतोय. तो देश वा समाज अजून चांगला करण्यासाठी प्रयत्न करणे हा संपूर्णपणे स्वार्थी (चांगल्या अर्थाने) विचारच झाला. कारण देश, समाज चांगला झाला तर आपल्या जगण्याचा दर्जा वाढतो. पर्यायाने आपलाच फायदा किंवा कदाचित आपल्या पुढच्या पिढीचा.
असा 'स्वार्थी' विचार करणे ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने केले पाहीजेच.
जे काही आपण करत असतो ती आपली समाजामधली contribution असते. समाजाचा भाग असण्याची जाणीव असते.
पण जेव्हा मी हे करतो असं आपण म्हणायला लागतो तेव्हा समाजापासून स्वतःला वेगळे काढून घेत असतो, इतरांपेक्षा वरती समजत असतो. त्याला काही अर्थ नाही असे माझे प्रामाणिक मत.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन's picture

20 Jul 2009 - 1:28 pm | दशानन

+१

सहमत.

सुबक ठेंगणी's picture

21 Jul 2009 - 8:07 am | सुबक ठेंगणी

शेवटी देश देश म्हणजे तरी काय हो! तिथे रहाणारी माणसेच ना!
प्रत्येकजण धोरणी राजकारणी, कलाकार, समाजसेवक, सैनिक इ.इ. नसला तरीही तो देशाचाच घटक असतो.
अगदी सामान्य माणूस असूनही प्रत्येकानेच जर आपले काम जास्तीतजास्त चोख करण्याचा प्रयत्न केला तर आपले सगळ्यांचेच आणि पर्यायाने देशाचे भले होईल ह्यात काय शंका!

नितिन थत्ते's picture

20 Jul 2009 - 8:34 am | नितिन थत्ते

नीधप यांच्याशी सहमत.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

आशिष सुर्वे's picture

20 Jul 2009 - 11:09 am | आशिष सुर्वे

माझी प्रतिक्रिया ही पळवाट नसून ती माझी कार्यपद्धती आहे.
त्याचा निश्कर्श तुम्ही आपापल्या द्रुश्टिकोनातून कसाही काडू शकता.

माझ्या मते प्रत्येकाचा आपापल्या कामातील प्रामाणि़कपणा आणि 'भ्रश्टाचारा'ला वेसण ही आज आपल्या देशाची गरज आहे.

ह्याव्यतिरिक्त, तुम्ही काही सुचवत असाल तर आम्ही आनंदाने एकू.

-
कोकणी फणस

ज्ञानेश...'s picture

20 Jul 2009 - 12:23 pm | ज्ञानेश...

शलाकाशी सहमत.
मी सध्या तरी देशासाठी काहीच करत नाही. तेवढा मोठा अजून झालेलो नाही.
सध्या मी माझ्यासाठी काही करू बघतो आहे.
पण तशी वेळ आली, आणि सामर्थ्य आले की नक्कीच काहीतरी करेन.

(कार्यरत)
ज्ञानेश.

"Great Power Comes With Great Responsibilities"

JAGOMOHANPYARE's picture

20 Jul 2009 - 1:25 pm | JAGOMOHANPYARE

पुण्यात 'कार चेसिंग'चा थरार!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4796866.cms

आता याचा एन आर आय असण्याशी काय सम्बन्ध? सलमान खान कुठे एन आर आय आहे? :)

विकास's picture

20 Jul 2009 - 4:51 pm | विकास

आता याचा एन आर आय असण्याशी काय सम्बन्ध? सलमान खान कुठे एन आर आय आहे?

एकदम मस्त!

रेवती's picture

21 Jul 2009 - 7:04 am | रेवती

राजेसाहेब,
मी देशासाठी काहीही करत नाही याचे फार वाईट वाटते.
सध्या जे कोणी फ्रस्ट्रेटेड आहेत त्या माझ्या देशदादा व देशतायांना बरे वाटावे म्हणून जरा कोल्हापूरी पायताणं घालून बाहेर फिरून येते झालं!
राहूनराहून वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचं. तिथे असेपर्यंत पान खाउन पिचकार्‍या मारायला नाही शिकले. तेंव्हा नाही शिकले तर आता साठी सत्तरीमध्ये काय शिकणार?

रेवती

छोटा डॉन's picture

21 Jul 2009 - 8:18 am | छोटा डॉन

अजुन तेवढा अनुभव नसल्याने अथवा तेवढे योग्य वय नसल्याने देशासाठी नक्की काय आणि कसे करावे ह्याची खरोखर कल्पना नाही, मात्र तरीही जमेल तेवढे करत असतोच.
देशासाठी काहितरी करणे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या देशात राहणार्‍या सामान्य जनतेसाठी काहितरी करणे असे आम्हाला वाटते, मग आम्ही तेच करतो ...

  • देशातील नागरिकांच्या करातुन उभारलेल्या शिक्षणसंस्थांमधुन उच्च शिक्षण घेतले असल्याने एक जबाबदारी म्हणुन देशाला उपयोगी पडेल अशा उद्योगात काम करतो, अर्थात त्यात वैयक्तिक स्वार्थ आहेच पण तरीही आमच्या कामामधला अगदी नगण्य का होईना पण काही तरी भाग देशासाठी उपयोगी पडतो असा आमचा विश्वास आहे.
  • देशाच्या न्याय आणि इतर सरकारी व्यवस्थेबद्दल नेहमीच आदर ठेऊन वागतो, शक्य तितके त्यांना सहकार्य करायचे प्रयत्न करतो.
  • ग्रास रुट लेव्हलवर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना शक्य तितकी मदत नेहमीच करत असतो.
  • पुढची येणारी शिकलेली पिढीच देशाचे आधारस्तंभ असल्याचा आमचा विश्वास असल्याने त्यांना शक्य तितके मार्गदर्शन व मदत करत असतो.
  • नोकरशाही अथवा राजकारण हे एक "गटार" न मानता जरी आज जमले नाही तरी भविष्यात त्यात सामील होईन देशासाठी मेनस्ट्रीममध्ये काहितरी भरिव काम करु अशी इच्छा बाळगतो.
  • देशपातळीवर घडणार्‍या व दुरगामी परिणाम करणार्‍या विवीध घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यातुन दुसर्‍यांना काय समजवता येईल हे नेहमीच पहात असतो. इतर सामान्य व जास्त माहिती नसलेल्या लोकांना हे सोप्या भाषेत समजावुन देण्याचा प्रयत्न करतो.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे "माझा देश नक्की पुढे जाईल व त्याला आमच्यासारखे तरुनच नक्की हातभार लावतील " ह्या तत्वावर नितांत श्रद्धा ठेवतो ...

मला वाटते सध्या तरी एवढेच करतो ...

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

कर भरणे वगैरे करणे ही देश सेवा नव्हे (असे मला वाटते). तो तर नियम आहे. उद्या जर कोणी सांगितले की जर इच्छा असेल तर आणि जितकी इच्छा असेल तितका कर भरा.. तर ह्या देशप्रेमी करदात्यांपैकी किती जण कर भरतील?

मग मी देशासाठी असे खास काहि करतो का? तर नाहि. फार तर मी भारतात असेन तर प्रत्येक स्तराच्या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत मत देतो.

शिवाय घटनेमध्ये जी नागरीकांची कर्तव्ये दिली आहेत त्याचे यथायोग्य पालन करतो. (अर्थात ही कर्तव्ये आहेत ती पाळून फार काहि देशासाठी करतो असे नाहि)

भारतीय नागरीकाची कर्तव्ये
१. घटनेचे पालन करणे; तसेच राष्ट्रध्वज, राष्ट्रीय संस्था, राष्ट्रापुढील आदर्श व्यक्ती व राष्ट्रगिताचा सन्मान करणे
२. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतून उदयाला आलेल्या विविध उपयुक्त संकल्पना आचरणात आणणे, त्यांना बळकटी देणे
३. भारताची स्वायत्तता, एकात्मता आणि अखंडता पाळणे व त्याचे रक्षण करणे
४. भारताचे रक्षण करणे व राष्ट्रीय सेवेमध्ये गरज असताच रुजू होणे
५. विविध धर्म, भाषा, विभाग आणि सामाजिक भिन्नतेच्या या समाजात सलोखा व बंधुभाव राखणे; तसेच स्त्रियांच्या अधिकारांचा आब राखणे
६. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतींचे व इमारतींचे महत्त्व जाणून त्याचे रक्षण करणे
७. भारतातील जंगले, तलाव, नद्या, प्राणी इत्यादी नैसर्गिक संपदेचे रक्षण करणे व त्याला वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करणे
८. आचरणाद्वारे माणुसकी, शास्त्रीय दृष्टिकोन, चौकसबुद्दी व चांगल्या परिवर्तनाची आस बाळगणे
९. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेचा (अहिंसेने) विरोध करणे
१०. स्वतःचे तसेच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने प्रयत्न करणे, ज्यामुळे राष्ट्र सतत प्रगतिपथावर राहील

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सूहास's picture

21 Jul 2009 - 3:25 pm | सूहास (not verified)

8>
पाहतो आहे..
सुहास

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2009 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

देशाच्या नगरीकांची व पर्यायाने देशाची शत्रु असलेली दारु मी रोज थोडी थोडी पिउन संपवायचा प्रयत्न करतो आहे.

इन्कलाब झिंदाबाद

देशभक्त
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य